एक्स्प्लोर

Russia Ukraine War : रशिया-युक्रेन हल्ल्यांनतर क्रिप्टोकरन्सी मार्केट कोसळले, बिटकॉइनच्या किंमतीतही घसरण

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युक्रेनवर युद्धाची घोषणा केल्यामुळे बिटकॉइनची किंमत कोसळली.

Russia Ukraine War : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन (Vladimir Putin) यांनी युक्रेनवर (Ukaraine) युद्धाची घोषणा केल्यामुळे बिटकॉइनची (Bitcoin) किंमत कोसळली. युक्रेनची राजधानी कीवमध्ये (Kyiv explosion) स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचे अनेक माध्यमांनी सांगितले. दरम्यान युनायटेड स्टेट्समधील स्टॉक मार्केटच्या (stock market) अनुषंगाने बिटकॉइनची किंमत $35,000 च्या खाली गेली आहे. जाणून घ्या सविस्तर

तणाव वाढल्याने बिटकॉइनची किंमत घसरली
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी "विशेष लष्करी ऑपरेशन" जाहीर केल्यानंतर बिटकॉइनच्या किमतीत मोठी घसरण झाली. पुतीन यांनी युक्रेनवर युद्ध घोषित केल्यानंतर मीडिया आउटलेट्सने राजधानी कीवमध्ये स्फोट झाल्याचे वृत्त दिले आहे. युक्रेनमधील खार्किव शहरात स्फोटांच्या मालिका ऐकू आल्याचेही वृत्त आहे. एकूण क्रिप्टोकरन्सी मार्केट कॅपिटलायझेशन गेल्या 24 तासांमध्ये जवळपास 5% घसरले आहे. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल अॅव्हरेज 1.38% घसरल्याने यूएस स्टॉक मार्केट घसरले आहे.बिटकॉइनची किंमत मागील 12 तासांमध्ये 7% घसरून $35,000 च्या खाली आली, रशिया-युक्रेन हल्ल्यांनतर सर्व पाच क्रिप्टोकरन्सी सर्व घसरत आहेत, बिटकॉइन दोन तासांपेक्षा कमी कालावधीत 5.6% घसरून US$34,958 वर आले, तर CoinGecko च्या मते, Ethereum 7.7% ने US$2,382 वर घसरले.

युक्रेनमधील 7 जणांचा मृत्यू

रशियाने केलेल्या हल्ल्यात युक्रेनमधील 7 लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. अहवालानुसार, रशियाच्या हल्ल्यात 7 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 9 लोक जखमी झाले आहेत. क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर रशियाचे सैन्यदल आता युक्रेनमध्ये घुसले असून रणगाड्यांसह हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. अहवालानुसार, युक्रेनमधील मारियुपोल शहरात अनेक रणगाडे घुसले आहेत. विमानतळाजवळून धूर निघत असल्याचेही वृत्त आहे. युक्रेनच्या इतर शहरांमध्येही विमानतळावर हल्ले झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

रशियाच्या हल्ल्यानंतर युक्रेनमध्ये खळबळ

रशियाने युक्रेनची राजधानी कीववरदेखील हल्ला केला. डोन्बास प्रांतावर हल्ला करण्यासह युक्रेनच्या राजधानीवर हल्ला केल्याने मोठी खळबळ उडाली. रशियाच्या हल्ल्याचा युक्रेनच्या सैन्याने प्रतिकार सुरू केला आहे. दरम्यान, युक्रेनच्या सैन्यानेही रशियन हवाई दलाला झटका दिला आहे. रशियाची पाच विमाने पाडली असल्याचा दावा युक्रेनच्या सैन्याने केला आहे. युक्रेनने नागरी विमानांसाठी हवाई वाहतूक बंद केली आहे. रशियाने हल्ला केल्यानंतर कीवमध्ये गोंधळाची स्थिती आहे. शहर सोडून जाण्यासाठी नागरिकांची धावपळ सुरू आहे. रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांग रांगासह मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashish Shelar PC : उद्धव ठाकरे...फेकमफाक बंद करा; आशिष शेलार संतापलेOne Minute One Constituency :  01 मिनिट 01 मतदारसंघ :  07 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 5 PM TOP Headlines 5 PM 07 November 2024TOP 25 | टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामा, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Pusad Assembly Election:  पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
Embed widget