संधी चुकवू नका! 'हा' नवा आयपीओ तुम्हाला करणार मालामाल, पैसे ठेवा तयार
सध्या शेअर बाजारावर दाखल होण्यासाठी अनेक कंपन्या सज्ज आहेत. त्याआधी या कंपन्या आपले आयपीओ घेऊन येत आहेत. सध्या अशाच एका आयपीओची सगळीकडे चर्चा होत आहे.
Nephro Care IPO: सध्या शेअर बाजारावर (Share Market) रोजच नवनव्या कंपन्या दाखल होत आहेत. विशेष म्हणजे शेअर बाजारावर दाखल होताच या कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न्स देत आहेत. काही कंपन्या तर वर्षभराच्या काळात थेट मल्टिबॅगर ठरल्या आहेत. दरम्यान, आता आणखी एक कंपनी शेअर बाजारावर सूचिबद्ध होण्याच्या तयारीत आहे. त्याआधी या कंपनीने आपला आयपीओ (IPO) आणला असून जास्तीत जास्त लोकांना यात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले आहे. 2 जुलैपर्यंत तुम्हाला या कंपनीच्या आयपीओत गुंतवणूक करता येईल
28 जूनला आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला
नव्याने आयपीओ दाखल होणाऱ्या या कंपनीकडून मुत्रपिंडशी (किडनी) संबंधित आजारांवर उपचार पुरवले जातात. नेफ्रो केअर इंडिया लिमिटेड (Nephro Care India) ही कंपनी IPO च्या माध्यमातून 41 कोटी रुपये उभे करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार 28 जून 2024 रोजी हा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. 2 जुलै 2024 रोजीपर्यंत तुम्हाला या आयपीओत पैसे गुंतवता येतील. या आयपीओचा किंमत पट्टा 85-90 रुपये प्रति शेअर ठेवण्यात आला आहे.
अँकर गुंतवणूकदारांना 27 जूनपासून गुंतवणूक करता येईल. या आयपीओत 41.26 कोटी रुपये मूल्य असलेले एकूण 45.84 लाख शेअर्स जारी केले जातील. ही कंपनी एनएसई ईमर्ज (NSE Emerge) या मंचावर सूचिबद्ध होणार आहे.
आयपीओतून उभारलेला निधी नेमका कुठे वापरला जाणार?
आयपीओच्या माध्यमातून उभारलेल्या या निधीपैकी 26.17 कोटी रुपये हे पश्चिम बंगालच्या (West Bengal) कोलकाता येथे व्हिवासिटी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलची स्थापना वापरण्यात येणार आहेत. तर उर्वरित निधी हा प्रशासकीय कामसाठी वापरला जाईल.
Nephro Care IPO कमीत कमी किती रुपये गुंतवावे लागणार?
या आयपीओत (IPO) गुंतवणूक करताना तुम्हाला कमीत कमी1600 शेअर्स घ्यावे लागणार आहेत. हा एक लॉट 1,44,000 रुपयांचा असेल. रकोळ गुंतवणूकदारांसाठी 35 टक्के शेअर्स राखीव असतील. तर 6.19 लाख शेअर्स HNI ना अलॉट केले जातील. 8.25 लाख शेअर्स QIBs तर 14.45 लाख शेअर्स हे रिटेल गुंतवणूकदारांना दिले जातील.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
'या' कंपन्यांनी अनेकांना केलं श्रीमंत, एका वर्षात ठरल्या मल्टिबॅगर्स!
अजय देवगणने लाखो गुंतवलेल्या 'या' कंपनीने अनेकांना केलं करोडपती; पाच वर्षांत शेअर बनला रॉकेट!