एक्स्प्लोर
Womens World Cup Final नवी मुंबईत भारत विरुद्ध द. आफ्रिका लढत रंगणार, विश्वविजयासाठी टीम इंडिया सज्ज
आज तमाम भारतीयांच्या नजरा नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर (DY Patil Stadium) होणाऱ्या महिला विश्वचषक फायनलकडे (Women's World Cup Final) लागल्या आहेत. यजमान भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका (South Africa) पहिल्यांदाच विश्वविजेतेपदावर नाव कोरण्यासाठी आमनेसामने आहेत. एका माजी क्रिकेटपटूच्या मते, 'सेमीफायनलचा तो विजय माझ्यासाठी मला वाटतयं विश्वकरंडकापेक्षाही मोठा होता, कारण आपल्या महिलांनी एक बेंचमार्क सेट केला आहे'. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Australia) उपांत्य फेरीतील ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावला आहे. हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur), स्मृती मानधना (Smriti Mandhana) आणि जेमिमा रॉड्रिग्स (Jemimah Rodrigues) यांसारख्या खेळाडूंकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. देशभरातील क्रिकेटप्रेमी, चाहते आणि सेलिब्रिटींनी टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या असून, संघ विश्वचषक नक्की जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















