एक्स्प्लोर
Aadhaar Card New Rules : आधार कार्डमध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर एका क्लिकवर अपडेट होणार, नवा नियम लागू, जाणून घ्या
Aadhaar Card Update : आधार कार्ड अपडेट करायचं असल्यास त्यासाठी द्याव्या लागणाऱ्या शुल्कात वाढ करण्यात आली आहे. याबाबतची नवी माहिती असणं आवश्यक आहे.
आधार कार्ड अपडेट
1/5

Aadhaar Card New Rules : आधार कार्ड संदर्भातील नियमांमध्ये मोठे बदल झाले आहेत. आता आधार कार्ड धारक, नाव, पत्ता, जन्मतारीख आणि मोबाईल नंबर केव्हाही अपडेट करु शकतात.
2/5

नव्या बदलांमुळं नाव, पत्ता, जन्मतारीख आणि मोबाईल नंबर बदलण्यासाठी आधार नोंदणी केंद्रात जाण्याची गरज राहणार नाही.
3/5

आधार कार्डमध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल नंबर यासारख्या डिटेल्स आधार केंद्रावर न जाता ऑनलाईन अपडेट करता येऊ सकतात. ही प्रोसेस आता पॅन कार्ड किंवा पासपोर्ट सारख्या लिंक केलेल्या सरकारी रेकॉर्डच्या डेटासंबंधित डेटा वेरिफाय करेल. डॉक्यूमेंट अपलोड करणे किंवा केंद्रावर जाण्याची गरज नाही.
4/5

आधार सेवांसाठी नवं शुल्क लागू करण्यात आलं आहे. डेमोग्राफिक डिटेल्स अपडेट करण्यासाठी 75 रुपये शुल्क द्यावं लागेल. बायोमेट्रिक अपडेट करण्यासाठी 125 रुपये शुल्क द्यावं लागेल. ऑनलाईन अपडेट 14 जून 2026 पर्यंत मोफत असतील. त्यानंतर शुल्क लागू केलं जाईल. 5-7 आणि 15-18 वर्ष वयोगटातील मुलांसाठी मोफत बायोमेट्रिक अपडेट सुरु राहतील.
5/5

आधार पॅनकार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2025 आहे. जर आधार आणि पॅन कार्ड लिंक केलं नाही तर 1 जानेवारी 2026 पासून पॅन कार्ड रद्द समजलं जाईल. नव्या पॅनकार्ड साठी आधार प्रमाणीकरण आवश्यक आहे.
Published at : 01 Nov 2025 11:51 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
कोल्हापूर
महाराष्ट्र
क्राईम























