मद्यनिर्मिती करणाऱ्या कंपनीच्या IPO चर्चा, मालामाल होण्याची नामी संधी; कधीपर्यंत गुंतवणूक करता येणार?
सध्या ग्रे मार्केटमध्ये ही कंपनी चांगली कामगिरी करत आहे. आगामी काळात अशीच स्थिती राहिल्यास या कंपनीचा शेअर स्टॉक मार्केटवर 361 रुपयांच्या मूल्यावर सूचिबद्ध होऊ शकतो.
Allied Blenders and Distillers IPO: मद्यनिर्मिती करणाऱ्या एका दिग्गज कंपनीने आपला आयपीओ आणला आहे. या कंपनीत पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याची ही नामी संधी आहे. अलायड ब्लेंडर्स अँड डिस्टिलर्स असे या कंपनीचे नवा आहे. आज म्हणजेच 25 जून रोजी हा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. या आयपीओच्या माध्यमातून कंपनी एकूण 1500 कोटी रुपये उभे करण्याच्या प्रयत्नात आहे. या कंपनीच्या आयपीओबद्दल सविस्तर जाणून घेऊ या...
आयपीओचा किंमत पट्टा नेमका काय?
अलायड ब्लेंडर्स अँड डिस्टिलर्स या कंपनीने हा आयपीओ आणताना त्यासाठी किंमत पट्टा 267 ते 281 रुपये प्रति शेअर ठेवला आहे. तुम्हाला या आयपीओत गुंतवणूक करायची असेल तर कमीत कमी 53 शेअर्सचाल लॉट खरेदी करावा लागेल. म्हणजेच या आयपीओत गुंतवणूक करायची असेल तर तुमच्याडे कमीत कमी 14,893 रुपये असणे गरजेचे आहे. किरकोळ गुंतवणूकदार एका वेळी 13 लॉट म्हणजेच 689 शेअर्सवर बोली लावू शकतात. म्हणजेच किरकोळ गुंतवणूकदार एका वळी जास्तीत जास्त 1,93,609 रुपयांची गुंतवणूक करू शकतात. या कंपनीने आयपीओच्या माध्यमातून 1,000 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर्स तर 500 कोटी रुपयांचे ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून शेअर्स जारी केले आहेत. ही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना गुंतवणुकीसाठी 26 रुपये प्रति शेअर्सच्या हिशोबाने सवलत देत आहे.
आयपीओची संपूर्ण माहिती?
आयपीओ लॉन्च होण्यची तारीख - 25 जून 2024
आयपीओ बंद होण्याची तारीख - 27 जून 2024
शेअर्सचा किंमत पट्टा - 267 रुपये ते 281 रुपये प्रति शेअर
आयपीओच्या माध्यमातून किती रक्कम जमा केली जाणार -1500 कोटी रुपये
शेअर्स अलॉट कधी होणार - 28 जून 2024
अयशस्वी गुंतवणूकदारांना 1 जुलै 2024 रोजी रिफंड मिळणार
एक जुलै रोजी डी-मॅट खात्यावर शेअर्स क्रेडिट होणार
2 जुलै 2024 रोजी ही कंपनी BSE आणि NSE वर लिस्ट होणार आहे.
ग्रे मार्केटची परिस्थिती काय आहे?
आज खुल्या झालेल्या आयपीओला दुपारी 12 वाजेपर्यंत 0.18 पट सबस्क्राईब करण्यात आलंय. ग्रे मार्केटमध्येही हा आयपीओ चांगली कामगिरी करताना दिसतोय. investorgain.com या संकेतस्थळाच्या माहितीनुसार या कंपनीचा शेअर 80 रुपयांच्या जीएमपी म्हणजेच 28.47 टक्क्यांच्या प्रीमियवर ट्रेंड करत आहे. हीच स्थिती आगामी काही दिवसांत कायम राहिल्यास लिस्टिंगच्या दिवशी ही कंपनी 361 रुपयांच्या मूल्यावर सूचिबद्ध होऊ शकते.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
तीन रुपयांच्या पेनी स्टॉकची हवा, तुम्हाला मालामाल करणार का?
अजय देवगणने लाखो गुंतवलेल्या 'या' कंपनीने अनेकांना केलं करोडपती; पाच वर्षांत शेअर बनला रॉकेट!
'या' कंपन्यांनी अनेकांना केलं श्रीमंत, एका वर्षात ठरल्या मल्टिबॅगर्स!