NSE | तांत्रिक बिघाडामुळे राष्ट्रीय शेअर बाजाराचे कामकाज काही वेळ ठप्प
सकाळी 11 वाजून 40 मिनीटांनी राष्ट्रीय शेअर बाजाराचे (National Stock Exchange) कामकाज काही वेळेसाठी ठप्प झाल्याचं दिसून आलंय. नंतर 3.45 नंतर पुन्हा कामकाज पूर्ववत झालं.
मुंबई: काही तांत्रिक बिघाडामुळे नॅशनल स्टॉक एक्सचेन्ज (एनएसई) वरची ट्रेडिंग काही काळासाठी थांबली होती. एनएसईच्या इंन्डेक्स फीडच्या अपडेशनमध्ये काही अडचणी येत होत्या. एनएसईच्या अधिकाऱ्यांनी सिस्टमला लवकरात लवकर पू्र्ववत करण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगितलं. सगळ्या विभागाचे काम सकाळी 11 वाजून 40 मिनीटांनी बंद करण्यात आलं होतं.
शेअर मार्केटवरचा व्यवहार बंद झाल्यानंतर सर्व्हिस प्रोव्हाडरशी चर्चा करण्यात आली. एनएसईला अनेक टेलिकॉम लिंक्स जोडण्यात आल्या आहेत. या लिंक्सची सर्व्हिस दोन कंपन्यांकडून पुरवली जातात. त्याच्यामध्ये काही बिघाड झाली आहे का याचीही तपासणी करण्यात येत होती.
NSE has multiple telecom links with two service providers to ensure redundancy. We have received communication from both the telecom service providers that there are issues with their links due to which there is an impact on NSE system.
— NSEIndia (@NSEIndia) February 24, 2021
Stock Market News: शेअर मार्केटचा नवा विक्रम, निर्देशांक पहिल्यांदाच 52 हजारांच्या पार
एनएसईमध्ये आलेला तांत्रिक बिघाड सुधारल्यानंतर पुन्हा कामकाज सुरु करण्यात आले. सायंकाळी 3.45 वाजल्यानंतर पुन्हा कामकाज सुरु झाल्यानंतर सायंकाळी पाच वाजता शेअर मार्केट बंद करण्यात येणार असल्याचं एनएसईच्या ट्विटर हॅन्डलवरुन सांगण्यात आलं. राष्ट्रीय शेअर बाजारात तांत्रिक बिघाड झाला असला तरी बॉम्बे स्टॉक एक्सचेन्जमध्ये कोणताही बिघाड झाला नव्हता. तरीही काळजी म्हणून बॉम्बे स्टॉक एक्सचेन्ज बंद करण्यात आलं होतं. एनएसई प्रमाणे सायंकाळी 3.45 वाजता त्याचं कामकाज सुरु करण्यात आलं.
Please note the market timings for only today:
F&O Segment Normal Market will Re-open as follows: Normal Market open time : 15:45 hrs Normal Market close time : 17:00 hrs Trade Mod cut off time: 17:30 hrs — NSEIndia (@NSEIndia) February 24, 2021
आज सकाळी शेअर मार्केट सुरु झाल्यानंतर मार्केट 200 अंकांनी वधारलं. जगभरातील शेअर मार्केटमध्ये मंदी असताना भारतात रिलायन्स, एचडीएफसी आणि अॅक्सिस बॅंकच्या शेअर्सची खरेदी मोठ्या प्रमाणात करण्यात आल्याने शेअर मार्केट वधारल्याचं दिसून आलं.
अशा घटना पूर्वीही घडल्या आहेत आजची राष्ट्रीय शेअर मार्केट बंद पडल्याची घटना ही काही पहिल्यांदाच घडली नाही. गेल्या काही वर्षात दरवर्षी एखाद्या वेळी अशा पद्धतीचा तांत्रिक बिघाड झाल्याचं पहायला मिळालंय. या आधी जुलै 2017, मे 2018, सप्टेंबर 2019 आणि जून 2020 साली अशा प्रकारचा तांत्रिक बिघाड झाल्याने राष्ट्रीय शेअर बाजार बंद पडलं होतं. पण प्रत्येक वेळी शेअर मार्केटचे कामकाज बंद पडलं असं झालं नव्हतं. पण त्या वेळी गुंतवणूकदारांवर त्याचा परिणाम मात्र जाणवला. कारण काहीच अपडेट्स दिसत नसल्याने त्यांना शेअर्सची खरेदी-विक्री करण्यास अडचण येत होती.
जगातला दुसरा सर्वात मोठा शेअर मार्केट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नॅसडॅकला अशा प्रकारचा अनुभव 2012 आणि 2013 साली दोनदा आला होता. ऑक्टोबर 2020 साली जगातला तिसरे सर्वात मोठे शेअर मार्केट अशी ख्याती असलेल्या टोक्यो शेअर मार्केटही तांत्रिक बिघाडामुळे काही काळ बंद पडलं होतं. लंडन स्टॉक एक्सचेन्जही अशाच पद्धतीने 2019 साली खूप मोठ्या वेळेसाठी बंद पडलं होतं.
चूक झाली! नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या ट्विटरवर अभिनेत्रीचे बोल्ड फोटो