Stock Market News: शेअर मार्केटचा नवा विक्रम, निर्देशांक पहिल्यांदाच 52 हजारांच्या पार
Stock Market News: मुंबई शेअर मार्केटने (BSE) नवीन विक्रम प्रस्थापित केला असून पहिल्यांदाच तो 52 हजारांच्या पार गेला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पानंतर (BUDGET) सातत्याने शेअर मार्केटचा निर्देशांक उंचावताना दिसतोय.
Stock Market: केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आल्यानंतर मुंबई शेअर मार्केटमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. आज मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 359.87 अंकाची म्हणजे 0.70 टक्क्यांची वाढ झाल्याचं दिसून आले. त्यामुळे शेअर मार्केटचा निर्देशांक पहिल्यांदाच 52 हजारांच्या पलिकडे गेला आहे.
निफ्टीही 107 अंकानी वाढून 15,297.10 अंकावर पोहचली आहे. शेअर मार्केटमधील तज्ज्ञांच्या मते, परदेशी शेअर मार्केटमध्ये तेजी पहायला मिळाल्याने त्याचा परिणाम मुंबई शेअर मार्केटवरही झाल्याचं दिसून आलंय. केंद्रीय अर्थसंकल्पाचा शेअर मार्केटवर सकारात्मक परिणाम झाला असून सातत्याने दुसऱ्या आठड्यात शेअर मार्केट वधारल्याचं दिसून येतंय.
Labour Code: लेबर कोडला केंद्र सरकारचे अंतिम स्वरुप, लवकरच लागू होणार नवे कामगार कायदे
सोमवारी मुंबई शेअर मार्केट सकाळी 9.23 मिनीटांनी 51,907.75 या अंकावर सुरु झाला आणि तो 52,022.57 अंकावर पोहचला. निफ्टीतही वाढ झाली असून ती 15,297.10 अंकावर पोहचली. मुंबई शेअर मार्केटचा सेन्सेक्स प्रमुख 30 शेअर्सवर आधारित आहे.
प्रमुख 50 शेअर्सवर आधारित असलेल्या नॅशनल स्टॉक एक्सचेन्जच्या निफ्टीमध्ये 107 अंकांची वाढ झाली आणि ती 15,270.30 च्या तुलनेत 15,297.10 अंकावर पोहचली.
जानेवारी महिन्यातील महागाईची आकडेवारी आज जाहीर होणार असून त्यावर अनेक गुंतवणूकदारांची नजर असल्याचं समजतंय. गेल्या शुक्रवारी डिसेंबर महिन्यातील औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी जाहीर करण्यात आली असून ती समाधानकारक असल्याची दिसते. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यातील औद्योगिक उत्पादनात 1.04 टक्क्यांची वाढ झाल्याचं पहायला मिळतंय.
शेअर मार्केटमधील मुलाची गुंतवणूक जीवावर बेतली, सावकारांच्या कर्जामुळे सांगलीत कुटुंबाची आत्महत्या