म्युच्युअल फंड गुंतवणुकीकडे लोकांचा वाढता कल, आतापर्यंत किती टक्क्यांची वाढ?
Mutual Fund : म्युच्युअल फंड गुंतवणुकीकडे लोकांचा वाढता कल असल्याचं पाहायला मिळत आहे. AMFI ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, केवळ मार्च महिन्यातच देशातील म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांच्या संख्येत सुमारे 44 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
Mutual Fund : अलीकडच्या काळात म्युच्युअल फंड (Mutual Funds) गुंतवणुकीत लोकांची आवड वाढली आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे बाजारात सातत्यानं घसरण होत आहे. पण, यानंतरही लोकांनी म्युच्युअल फंडात मोठी गुंतवणूक केली आहे. AMFI ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, केवळ मार्च महिन्यातच देशातील म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांच्या संख्येत सुमारे 44 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडाच्या इक्विटीमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. 13 महिन्यांपासून, इक्विटी म्युच्युअल फंड लोकांना सतत नफा देत आहे.
म्युच्युअल फंडातील लोकांचा नफा वाढतोय
Association of Mutual Funds in India (AMFI) च्या आकडेवारीनुसार, गुंतवणूकदारांना 2022 मध्ये म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करून चांगला नफा मिळाला आहे. जानेवारीमध्ये म्युच्युअल फंडचा नफा 14,888 कोटी रुपये होता. फेब्रुवारीमध्ये हा नफा वाढून 19,705 कोटी रुपये इतका झाला होता. आता मार्च महिन्यात या नफ्यात सुमारे 44 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
SIP कडे गुंतवणूकदारांचा वाढत कल
गेल्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात रशिया-युक्रेन युद्धामुळे बाजारात प्रचंड गोंधळ उडाला होता. पण, दरम्यानच्या काळात म्युच्युअल फंडातील गुंतवणूकदारांची आवड वाढतच गेली. अनेकजण म्युच्युअल फंडमध्ये SIP द्वारे गुंतवणूक करायला प्राधान्य देतात. एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडमध्ये करण्यात आलेली गुंतवणूक सुमारे 12,328 कोटींवर पोहोचली आहे. फेब्रुवारीमध्ये ते केवळ 11,438 कोटी रुपये होते. फेब्रुवारी ते मार्च महिन्यात एसआयपीद्वारे म्युच्युअल फंड गुंतवणुकीत 8 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. मार्च महिन्यात एसआयपींसोबत मल्टी-कॅप फंडांमध्येही वाढ झाली आहे.
डेट फंडात घट नोंदवली
डेट फंडाबद्दल बोलायचं झालं तर त्यात घट झाली आहे. केवळ मार्च महिन्यातच सुमारे 1.15 लाख कोटी रुपये काढले गेले आहेत. याआधीही फेब्रुवारी 2020 ते 2021 पर्यंत डेट फंडमधून सातत्यानं पैसे काढले गेले आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :