search
×

SIP साठी 5 स्टार रेटिंगच्या सर्वोत्कृष्ट 5 योजना, वार्षिक 33 % परतावा मिळू शकतो

Mutual Fund, SIP : एसआयपीसह तुम्हाला एकरकमी रक्कम गुंतवण्याऐवजी मासिक आधारावर पैसे गुंतवण्याची सुविधा मिळते. याद्वारे तुम्ही दरमहा ठराविक रक्कम गुंतवू शकता.

FOLLOW US: 
Share:

Mutual Fund, SIP : इक्विटी हा गुंतवणुकीचा असा पर्याय आहे, ज्यामध्ये तुमचे पैसे कमी वेळात तिप्पट होऊ शकतात. परंतु बरेच लोक थेट इक्विटीमध्ये पैसे गुंतवणे टाळतात. म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून इक्विटीमध्ये गुंतवणूक करणे हा त्यांच्यासाठी सुरक्षित पर्याय आहे. सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच म्युच्युअल फंडातील एसआयपी आजच्या युगात खूप लोकप्रिय झाली आहे. एसआयपीसह तुम्हाला एकरकमी रक्कम गुंतवण्याऐवजी मासिक आधारावर पैसे गुंतवण्याची सुविधा मिळते. याद्वारे तुम्ही दरमहा ठराविक रक्कम गुंतवू शकता. तुम्ही ठरवलेल्या टार्गेट नुसार कालमर्यादा असू शकते. यामध्ये तुम्ही वेळोवेळी तुमच्या गुंतवणुकीचे मूल्यांकन करू शकता.

तुम्ही कोणत्याही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणार असाल, तर त्या योजनेच्या मागील परताव्यांनाच आधार बनवू नये. त्यापेक्षा त्या फंडाचे रेटिंगही पाहिले पाहिजे. म्युच्युअल फंडाचे रेटिंग मजबूत असेल तर त्या योजनेतील जोखीम कमी असते. दुसरीकडे, रेटिंग चांगले असल्यास, अधिक परतावा मिळण्याची शक्यता देखील वाढते. येथे आम्ही व्हॅल्यू रिसर्चने दिलेल्या 5 स्टार रेटिंगसह काही योजना निवडल्या आहेत, ज्यांनी 5 वर्षांत एकरकमी गुंतवणूक किंवा SIP वर उच्च परतावा दिला आहे.

याच योजना कुठल्या आहेत त्या पाहुया
Quant Tax Plan

5 वर्षात एकरकमी गुंतवणुकीवर परतावा: 25% p.a.
5 वर्षांत 1 लाख रुपयांचे मूल्य: 3 लाख रुपये
5 वर्षांमध्ये SIP वर परतावा: 33% p.a.
5 वर्षात 5000 रुपये मासिक SIP चे मूल्य: 6.7 लाख रुपये

या फंडात किमान रु 500 सह एकरकमी गुंतवणूक करता येते. त्याच वेळी, एसआयपी केवळ 500 रुपयांपासून सुरू करता येते. 31 जानेवारी 2022 रोजी फंडाची एकूण मालमत्ता 789 कोटी रुपये होती. ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत खर्चाचे प्रमाण ०.५७ टक्के होते.

Axis Small Cap Fund

5 वर्षात एकरकमी गुंतवणुकीवर परतावा: 23% p.a.

5 वर्षांत 1 लाख रुपयांचे मूल्य: 2.8 लाख रुपये

SIP वर 5 वर्षात परतावा: 28.5% p.a.

5 वर्षात 5000 रुपये मासिक SIP चे मूल्य: 6 लाख रुपये

या फंडात किमान 5000 रुपयांची एकरकमी गुंतवणूक केली जाऊ शकते. त्याच वेळी, एसआयपी 500 रुपयांपासून सुरू केली जाऊ शकते. 31 जानेवारी 2022 पर्यंत फंडाची एकूण मालमत्ता 8411 कोटी रुपये होती. तर खर्चाचे प्रमाण ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत ०.३६ टक्के होते.

PGIM India Midcap Opportunities

5 वर्षात एकरकमी गुंतवणुकीवर परतावा: 22% p.a.

5 वर्षात 1 लाख रुपयांचे मूल्य: 2.68 लाख रुपये

5 वर्षांमध्ये SIP वर परतावा: 31% p.a.

5 वर्षात 5000 रुपये मासिक SIP चे मूल्य: 6.3 लाख रुपये

या फंडात किमान 5000 रुपयांची एकरकमी गुंतवणूक केली जाऊ शकते. त्याच वेळी, एसआयपी 1000 रुपयांपासून सुरू करता येते. 31 जानेवारी 2022 रोजी फंडाची एकूण मालमत्ता 4363 कोटी रुपये होती. तर 31 डिसेंबर 2021 पर्यंत खर्चाचे प्रमाण 0.42 टक्के होते.

Mirae Asset Tax Saver

5 वर्षात एकरकमी गुंतवणुकीवर परतावा: 21% p.a.
5 वर्षात 1 लाख रुपयांचे मूल्य: 2.57 लाख रुपये
SIP वर 5 वर्षात परतावा: 22.5% p.a.
5 वर्षात 5000 रुपये मासिक SIP चे मूल्य: 5.2 लाख रुपये

या फंडात किमान रु 500 सह एकरकमी गुंतवणूक करता येते. त्याच वेळी, एसआयपी 500 रुपयांपासून सुरू केली जाऊ शकते. 31 जानेवारी 2022 रोजी फंडाची एकूण मालमत्ता 10,972 कोटी रुपये होती. तर 31 डिसेंबर 2021 पर्यंत खर्चाचे प्रमाण 0.41 टक्के होते.

BOI AXA Tax Advantage

5 वर्षात एकरकमी गुंतवणुकीवर परतावा : 20% p.a.
5 वर्षांत 1 लाख रुपयांचे मूल्य : 2.49 लाख रुपये
5 वर्षात SIP वर परतावा : 22% p.a.
5 वर्षात 5000 रुपये मासिक SIP चे मूल्य: 5.2 लाख रुपये

या फंडात किमान रु 500 सह एकरकमी गुंतवणूक करता येते. त्याच वेळी, एसआयपी 500 रुपयांपासून सुरू केली जाऊ शकते. 31 जानेवारी 2022 रोजी फंडाची एकूण मालमत्ता 546 कोटी रुपये होती. तर ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत खर्चाचे प्रमाण १.५७ टक्के होते.

(सूचना- गुतंवणूक करण्यापूर्वी माहितगारांचा आणि तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या )

Published at : 18 Feb 2022 06:29 PM (IST) Tags: Mutual Fund IPO SIP

आणखी महत्वाच्या बातम्या

नव्या वर्षात अंबानी मोठा धमाका करण्याच्या तयारीत; आता 'या' क्षेत्रात दबदबा वाढवण्यासाठी सज्ज

नव्या वर्षात अंबानी मोठा धमाका करण्याच्या तयारीत; आता 'या' क्षेत्रात दबदबा वाढवण्यासाठी सज्ज

Investment Tips : दोन वेळचा चहा सोडून द्या आणि करोडपती व्हा! जाणून घ्या कसं?

Investment Tips : दोन वेळचा चहा सोडून द्या आणि करोडपती व्हा! जाणून घ्या कसं?

May 2023 New Rule: LPG सिलेंडर स्वस्त, GST च्या नियमांतही बदल; आज 1 मेपासून बदलले 'हे' 5 नियम

May 2023 New Rule: LPG सिलेंडर स्वस्त, GST च्या नियमांतही बदल; आज 1 मेपासून बदलले 'हे' 5 नियम

Pune-Bengaluru Expressway Accident : पुणे-बंगळुरु महामार्गावर भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू तर 22 जखमी

Pune-Bengaluru Expressway Accident : पुणे-बंगळुरु महामार्गावर भीषण अपघात, 4 जणांचा मृत्यू तर 22 जखमी

Mumbai Crime News : मुंबईत प्रेम, दिल्लीत हत्या, 35 तुकडे करुन लावली मृतदेहाची विल्हेवाट; पाच महिन्यांनी उलगडा

Mumbai Crime News : मुंबईत प्रेम, दिल्लीत हत्या, 35 तुकडे करुन लावली मृतदेहाची विल्हेवाट; पाच महिन्यांनी उलगडा

टॉप न्यूज़

Higher Education : मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत

Higher Education : मुलींना मोफत उच्च शिक्षणाचा शासन निर्णय जारी, शैक्षणिक आणि परीक्षा शुल्कामध्ये 100 टक्के सवलत

Ratnagiri Rain: गुहागरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणीच पाणी, भरतीची वेळ महत्त्वाची, प्रशासन सतर्क

Ratnagiri Rain: गुहागरमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग, शहरातील मुख्य बाजारपेठेत पाणीच पाणी, भरतीची वेळ महत्त्वाची, प्रशासन सतर्क

Majha Impact: माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद; आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात

Majha Impact: माझाचा दणका, पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद;  आता विठुरायाचे दर्शन अवघ्या चार ते पाच तासात

Pench Tiger Reserve : तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त

Pench Tiger Reserve : तोतलाडोह धरणात अवैध मासेमारी करणार्‍यांवर मोठी कारवाई; दोन बोटीसह मासेमारी साहित्य जप्त