(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Investment: 5000 ची गुंतवणूक परतावा 2 कोटींहून अधिक! 25 वर्षांचं calculation, एकदा पहाच..
जर तुम्ही ५००० रुपये महिना या हिशोबात साधारण १५ टक्के परतावा असणाऱ्या SIP मध्ये गुंतवणूक करत असाल तर दरवर्षी मुळ रकमेत १० टक्के वाढ करणं गरजेचं आहे.
Investment: भारतात म्यूच्यूअल फंड, SIP ची लोकप्रीयता वाढत आहे. पण बाजारात होणाऱ्या चढउताराकडे लक्ष ठेवत आपल्या पैशांचं योग्य नियोजन आणि गुंतवणूक करणं महत्वाचं आहे.मुलांच्या शिक्षणापासून घर खरेदीपर्यंत सर्व महत्वाच्या खर्चांसाठी SIP गुंतवणूक हा सर्वोत्तम पर्याय समजला जातो. SIP हा गुंतवणूकीचा एक सोपा मार्ग आहे. यात कोणतंही करारात्मक बंधन नसतं. त्यामुळे लहान गुंतवणूकदारांसाठीही SIP ची गुंतवणूक फायद्याची समजली जाते. सेविंग बँक) खाते असणारी जवळजवळ प्रत्येक व्यक्ती म्युचुअल फंड स्कीम्समध्ये गुंतवणूक सुरु करू शकते. तुम्हाला केवळ ५००० रुपये म्यूच्यूअल फंड SIP सुरु करून चांगला फायदा मिळू शकतो. यासाठी SIP दीर्घकाळ चालवल्यास चक्रवाढीनं अधिक लाभ होऊ शकतो. जर दरवर्षी SIP ची रक्कम 10 टक्क्यांनी वाढवून स्टेपअप कराल तर एक मोठा फंड तुम्हाला तयार करता येऊ शकतो. कसं पाहूया..
25 वर्षांचं Calculation
साधारण १२ टक्के अपेक्षित परताव्यावर २५ वर्षांसाठी जर 5000 रुपयांची गुंतवणूक केलीत तर २५ वर्षात 2.13 कोटी रुपयांचा निधी तयार होऊ शकतो. तर १५ टक्के सरासरी परतावा देणाऱ्या म्यूच्यूअल फंडात SIP काढल्यास २५ वर्षांत मिळणारा फंड हा तब्बल 3.२९ कोटी रुपयांचा होऊ शकतो. म्हणजे दरमहिन्याला ५००० रुपये या हिशोबाने ५९ लाख रुपये गुंतवून तुम्ही 1.54 रुपयांपर्यंत परतावा मिळवू शकता.
दरवर्षी १० टक्क्यांनी रक्कम वाढवा
जर तुम्ही ५००० रुपये महिना या हिशोबात साधारण १५ टक्के परतावा असणाऱ्या SIP मध्ये गुंतवणूक करत असाल तर दरवर्षी मुळ रकमेत १० टक्के वाढ करत २५ वर्ष SIP केली तर हा फंड साधारण ३.२९ कोटी कॉपर्स तयार केला जाईल. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्याआधी विचार करण्याच्या सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यांपैकी एक म्हणजे तुमचा "अपेक्षित कालावधी", म्हणजेच दिवस, महिने किंवा वर्षांचा काळ ज्यासाठी तुम्हाला गुंतवणूक करायची आहे. जितक्या अधिक काळासाठी गुंतवणूक तितका त्यावर मिळणारा चक्रवाढ परतावा अधिक असे गणित. त्यामुळे SIP मध्ये गुंतवणूक करताना अधिक कालावधी असेल तर फायदा अधिक होण्याची शक्यता वाढते.
एसआयपीत मिळतो 12 टक्क्यांनी परतावा
नोकरी करून मिळणारे पैसे जर एसआयपीत गुंतवले तर तुम्ही नक्कीच लखपती होऊ शकता. त्यासाठी एसआयपी करताना तुम्हाला 5X12X20 हा फॉर्म्यूला पाळावा लागेल. एसआयपी हा एक दीर्घकालीन गुंतवणुकीचा पर्याय आहे. म्युच्यूअल फंड म्हणजेच एसआयपीत हा शेअर बाजाराशी निगडीत असतो. त्यामुळे तुम्ही गुंतवलेल्या पैशांवर कमी-अधिक प्रमाणात परतावा मिळू शकतो. पण दीर्घकालीन एसआयपी गुंतवणुकीवर सरासरी 12 टक्क्यांनी परतावा मिळतो असे ग्रहीत धरले जाते.