म्हाडात घर मिळालं तरी एक गोष्ट लक्षात ठेवावी लागणार, 10 दिवसांत 'हे' काम न केल्यास सदनिका रद्द होणार!
म्हाडाने मुंबईच्या 2030 घरांसाठी सोडत जाहीर केली आहे. या सोडतीत घर मिळालेल्या यशस्वी अर्जदारांना घराचा ताबा मिळण्यासाठी अनेक कामे करावी लागणार आहेत.
मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाची 2030 घरांसाठीची सोडत आज जाहीर झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या सोडतीला सुरुवात होईल. दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून या सोडतीमध्ये सहभागी होण्यासाठी अर्जप्रक्रिया राबवली जात होती. 1 लाख 13 हजार भाग्यवंत अर्जदारांना ही घरे मिळणार आहेत. मात्र सोडतीत नाव आले म्हणजे काम संपले असा अनेकांचा समज आहे. सोडतीनंतरही कागदपत्रांची अनेक कामे करावी लागतात. ती नकेल्यास मिळालेली सदनिका तुमच्या हातून जाऊ शकते. विशेष म्हणजे घर ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेत दहा दिवसांच्या आत करावयाचे एक काम फारच महत्त्वाचे आहे.
...तर सदनिका रद्द करण्याचा म्हाडाला अधिकार
म्हाडाच्या घरांच्या सोडतीत नंबर लागल्यास इतरही काही बाबींची काळजी घेणे गरेजेच आहे. कारण म्हाडाचे घर मिळाल्यानंतर इतरही बऱ्याच प्रक्रिया राबवाव्या लागतात. सोडतीनंतर अर्जदाराने सादर केलेले दस्ताऐवज, प्रमाणपत्र, पुरावे इतर माहिती असत्य, खोटी, बनावट आढळून आल्यास अर्जदाराचे सदनिका वितरण कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्याचा अधिकार म्हाडाकडे आहे.
दहा दिवसांच्या आत हे काम करावे लागणार
अर्जदारा सोडतीमध्ये यशस्वी ठरल्यानंतर त्याला म्हाडाकडे स्वीकृतीपत्र सादर करणे गरजेचे आहे. हे स्वीकृतीपत्र कार्यालयीन कामकाजांच्या 10 दिवसांच्या आत सादर करावे लागेल. विशेष म्हणजे हे स्वीकृतीपत्र ऑनलाईन सादर करावे लागेल. अन्यथा तुमचा अर्ज आपोआप रद्द होईल. यासह अर्जदाराने जाम केलेल्या अनामत रक्कमेतून 1000 रुपये कापून उर्वरित रक्कम विना व्याज अर्जदाराला परत केली जाईल. अर्जदाराने अर्ज दाखल करताना दिलेल्या बँक खात्यावर RTGS / NEFT व्दारे ही अनामत रक्कम परत केली जाईल. हा अर्ज बाद झाल्यानंतर बदल्यात प्रतीक्षा यादीवरील अर्जदाराचा अर्ज संगणकीय प्रणालीव्दारे आपोआप (by default) कार्यान्वित होईल. त्यामुळे यशस्वी अर्जदाराने स्वीकृतीपत्र विहित मुदतीत देणं गरजेचं आहे.
सोडतीमध्ये विजेता अर्जदाराला नेमकं काय करावं लागणार?
>>>> विजेत्या अर्जदाराला म्हाडातर्फे प्रथम सूचनापत्र देण्यात येईल.
>>>> त्यानंतर प्रथम सूचनापत्र मिळाल्यानंतर अर्जदाराने 10 दिवसांत ऑनलाईन पद्धतीने स्वीकृतीपत्र दर्शवने बंधनकारक आहे.
>>>> त्यानंतर म्हाडाकडून अर्जदाराला तात्पुरते देकारपत्र देण्यात येईल.
>>>> अर्जदाराने सदनिकेची 25 टक्के रक्कम 45 दिवसांत भरणे बंधनकारक आहे.
>>>> त्यानंतर उर्वरित 75 टक्के रक्कम 60 दिवसांमध्ये भरणे बंधनकारक राहील.
>>>> अर्जदाराने सदनिकेची 10 टक्के रक्कम भरल्यानंतर बँक ना-हरकत प्रमाणपत्रासाठी अर्ज करता येईल.
>>>> या अर्जानंतर म्हाडा अर्जदारांना तत्काळ ना-हरकत प्रमणापत्र ऑनलाईन पद्धतीने देईल.
>>>> त्यानंतर अर्जदाराने सर्व रक्कम भरल्यानंतर तसेच सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर घर अर्जदाराच्या नावावर केले जाईल.
हेही वाचा :