एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source:  ECI | ABP NEWS)

Mhada Lottery 2024 : म्हाडाच्या 2030 घरांची सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते, विजेत्यांची यादी कधी जाहीर होणार?

Mhada Lottery 2024 : म्हाडाकडून मुंबई मंडळाच्या 2030 घरांसाठीच्या विक्रीची सोडत आज काढण्यात येणार आहे. विजेत्यांची यादी म्हाडाच्या वेबसाईटवर प्रकाशित केली जाईल.

मुंबई : म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबईतील विविध गृहनिर्माण योजनांतर्गत उभारण्यात आलेल्या 2030 सदनिकांच्या विक्रीसाठीची सोडत (Mhada Lottery 2024) आज सकाळी 10.30 वाजता काढली जाणार आहे. म्हाडाकडे संगणकीय प्रणालीद्वारे अनामत रकमेसह प्राप्त 1,13,811 अर्ज सादर झाले होते. राज्याचे  मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काढण्यात येणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह  गृहनिर्माण मंत्री अतुल सावे उपस्थित असतील. यासह इतर मंत्री आणि अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत.  

विजेत्यांची यादी कधी जाहीर होणार?

म्हाडाकडे 2030 घरांसाठी 1,13,811 अर्ज प्राप्त झाले होते. अर्जदारांची संख्या लक्षात घेता, सोडतीच्या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. म्हाडाच्या @mhadaofficial या युट्यूब चॅनल आणि फेसबूक पेजवरून करण्यात येणार आहे. वेबकास्टिंगची लिंक म्हाडाच्या  https://housing.mhada.gov.in या वेबसाइटवर व समाजमाध्यम प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. सोडतीचे थेट प्रक्षेपण वेबकास्टिंगद्वारे करण्यात येणार असल्याने नागरिकांना अल्पावधीतच सोडतीचा निकाल जाणून घेता येणार आहे. सोडतीमधील विजेत्या अर्जदारांची यादी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या वेबसाईटवर सायंकाळी 6.00 वाजता प्रसिद्ध केली जाणार असून विजेत्या अर्जदारांना एसएमएसद्वारेही विजेता ठरल्याबाबतची माहिती तात्काळ कळविली जाणार आहे.

म्हाडाकडून सोडत प्रक्रिया नवीन संगणकीय प्रणाली IHLMS 2.0 (Integrated Housing Lottery Management System) द्वारे होत आहे. या नूतन प्रणालीनुसार अर्ज नोंदणीकरण व पात्रता निश्चिती झाल्यानंतरच अर्जदार सोडत प्रक्रियेत सहभाग घेत आहे. सोडतीत विजेता ठरल्यानंतर, अर्जदारास  सूचना पत्र पाठविले जाणार असून त्यातील तरतुदींची पूर्तता केल्यानंतर विजेत्या अर्जदारांना तात्पुरते देकार पत्र पाठविले जाणार आहे. ही सर्व प्रक्रिया अत्यंत सोपी व सुलभ ठरल्यामुळे यंदाच्या वर्षी नागरिकांनी सोडतीस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.

म्हाडानं मुंबईतील नव्याने बांधकाम चालू असलेल्या गटामध्ये 1327 सदनिकांचा समावेश आहे तर दुसर्‍या गटामध्ये विकास नियंत्रण नियमावली 33(5 ),(7), 58 अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून म्हाडाला प्राप्त झालेल्या 370 सदनिकांचा समावेश आहे. तसेच तिसऱ्या गटांतर्गत मागील सोडतीतील विविध वसाहतीतील  विखुरलेल्या 333 सदनिकांचा समावेश आहे. उत्पन्न गट निहाय या सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटातील एकूण 359 सदनिकांकरीता 47,134 अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाले आहेत. अल्प उत्पन्न गटातील एकूण 627 सदनिकांकरीता 48,762 अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाले आहेत.

मध्यम उत्पन्न गटातील एकूण 768 सदनिकांकरीता 11461 अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाले आहेत. तसेच उच्च उत्पन्न गटातील एकूण 276 सदनिकांकरीता 6454 अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाले आहेत. सोडत प्रक्रियेमध्ये अर्जदारांचा लाभलेला प्रतिसाद पाहता विकास नियंत्रण निमयमावली 33 (5) अंतर्गत गटातील नेहरू नगर, कुर्ला या योजनेतील 14 सदनिकांकरीता 3124 अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाले आहेत. तर ओशिवरा येथील योजनेतील एका सदनिकेकरीता 546 अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाले आहेत. तसेच सिद्धार्थ नगर, गोरेगाव येथील 2 सदनिकांकरीता 602 अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाले आहेत. तसेच कन्नमवार नगर , विक्रोळी (492 ) या योजनेतील 2 सदनिकांकरीता 446 अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाले आहेत. तसेच विकास नियंत्रण नियमावली ३३ (७) अंतर्गत भुलेश्वर विभाग वेलकर स्ट्रीट या योजनेअंतर्गत एका सदनिकेकरिता 422 अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाले आहेत. तसेच मुंबई मंडळातर्फे नव्याने बांधकाम चालू असलेल्या गटामध्ये शिवधाम जुनी दिंडोशी,  म्हाडा कॉलनी मालाड (486) या योजनेतील एका सदनिकेकरिता 291 अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाले आहेत. शिवधाम कॉम्प्लेक्स जुनी दिंडोशी, म्हाडा कॉलनी मालाड (477) या योजनेतील 45 सदनिकांकरीता 9,519 अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाले आहेत.

इतर बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर : 08 OCT 2024 : 10 PM : ABP MajhaVinesh Phogat: विनेश फोगाटने हरियाणाच्या निवडणुकीत मारली बाजी; भाजपाच्या उमेदवाराला केलं चितपटABP Majha Headlines : 11 PM : 08 October 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सHaryana Assembly Election Result 2024 : हरियाणा सेट, महाराष्टात इफेक्ट होणार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
सकाळचा नऊचा भोंगा तयारी करुन बसला होता, पण आता कसं वाटतंय; हरियाणा निकालावरुन फडणवीसांचा हल्लाबोल
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
रेल्वेच्या भोंग्याने 15 फूट पुलावरून पडून PSI गंभीर जखमी; रुग्णालयात उपचार सुरू
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
धक्कादायक! कॉलेज विद्यार्थ्यांचा रंग रास गरबा स्कॅम; 600 बनावट पास, पोलिसांना असा लागला छडा
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
मराठीजनांसाठी अयोध्येत 12 मजली भक्त निवासाचे भूमिपूजन; 650 पर्यंटकांची सोय; 96 खोल्या, 40 डॉर्मिटरी
Madha : माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला
माढ्यात इच्छुकांची भाऊगर्दी, अभिजीत पाटील पोहोचले 'तुतारी'च्या मुलाखतीला
जमिनीवरील परिस्थिती आज लोकांसमोर आली; हरियाणा, काश्मीरच्या निकालाचं प्रफुल्ल पटेलांकडून विश्लेषण
जमिनीवरील परिस्थिती आज लोकांसमोर आली; हरियाणा, काश्मीरच्या निकालाचं प्रफुल्ल पटेलांकडून विश्लेषण
पुण्यातील खंडोबा मंदिरासाठी 24 एकर जमीन, शासन निर्णय जारी; जाणून घ्या किंमत किती?
पुण्यातील खंडोबा मंदिरासाठी 24 एकर जमीन, शासन निर्णय जारी; जाणून घ्या किंमत किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Embed widget