महिन्याला फक्त 600 रुपयांची बचत करा, कमी काळात लाखो रुपये मिळवा, गुंतवणुकीसाठी 'ही' आहे भन्नाट योजना
स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने बचतकर्त्यांसाठी 'हर घर लखपती' योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून लहान गुंतवणूकदारांना पैशांची बचत करून मोठा निधी निर्माण करण्याचा सोपा मार्ग आहे.
Investment Plan : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने बचतकर्त्यांसाठी 'हर घर लखपती' योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून लहान गुंतवणूकदारांना पैशांची बचत करून मोठा निधी निर्माण करण्याचा सोपा मार्ग आहे. या योजनेअंतर्गत, केवळ 600 रुपयांपेक्षा कमी मासिक बचतीसह, गुंतवणूकदार 10 वर्षांत 1 लाख रुपये किंवा त्याहून अधिक निधी तयार करू शकतात. ही योजना त्यांच्यासाठी आहे ज्यांना कोणताही धोका न घेता निश्चित परतावा हवा आहे.
'हर घर लखपती' योजनेच्या माध्यमातून सामान्य ग्राहकांसाठी 6.75 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7 टक्के आकर्षक व्याजदर मिळत आहे. यामुळं तुमच्या लहान बचतीचे मोठ्या उद्दिष्टांमध्ये रूपांतर करण्यास मदत करते.
कमी बचत करुन मोठा फंड
तुम्हाला दर महिन्याला थोडी बचत करून मोठा फंड तयार करायचा असेल, तर SBI ची हर घर लखपती योजना तुमच्यासाठी योग्य पर्याय असू शकते. ही एक विशेष प्रकारची आवर्ती ठेव (RD) योजना आहे, ज्यामध्ये तुम्हाला दरमहा एक निश्चित रक्कम जमा करावी लागते. योजनेच्या कालावधीच्या शेवटी, बँक तुम्हाला व्याजासह एकरकमी पैसे परत करते. या योजनेचा उद्देश ग्राहकांना छोट्या मासिक गुंतवणुकीद्वारे मोठी बचत करण्याची संधी देणे हा आहे. आरडी खात्यात, बँक तिमाही आधारावर चक्रवाढ व्याज देते, ज्यामुळे तुमची बचत जलद वाढते.
योजनेचा कालावधी 3 वर्ष ते 10 वर्षांपर्यंत
SBI च्या हर घर लखपती योजनेतील व्याजदर सामान्य लोक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळे आहेत. योजनेचा कालावधी 3 वर्ष ते 10 वर्षांपर्यंत आहे. आरडी खाते उघडताना ग्राहकांना मॅच्युरिटी कालावधी निवडावा लागतो. मुदतीपूर्वी पैसे काढणे किंवा खाते बंद करणे आवश्यक असल्यास, थोडासा दंड भरावा लागेल.
या योजनेत व्याजदर किती मिळतो?
सामान्य लोकांसाठी
3 आणि 4 वर्षांच्या कार्यकाळावर 6.75 टक्के आणि उर्वरित कार्यकाळावर 6.50 टक्के व्याज मिळते.
ज्येष्ठ नागरिकांसाठी
3 आणि 4 वर्षांच्या कार्यकाळावर 7.25 टक्के आणि उर्वरित कार्यकाळावर 7.00 टक्के व्याज मिळते.
या योजनेत किती गुंतवणूक करावी?
सामान्य लोक
तुम्हाला SBI च्या हर घर लखपती योजनेत 1 लाख रुपये जमवायचे असतील तर तुमची मासिक गुंतवणूक योजना अशी असेल. पाहुयात सविस्तर माहिती
3 वर्षांत: 6.75 टक्के व्याजदरासाठी तुम्हाला दरमहा 2,502 जमा करावे लागतील.
4 वर्षांत: 6.75 टक्के व्याज दरासाठी तुम्हाला मासिक गुंतवणूक 1,812 असेल.
5 वर्षांमध्ये: 6.50 टक्के व्याजदरासाठी तुम्हाला 1,409 ची प्रत्येक महिन्याला गुंतवणूक करावी लागेल.
10 वर्षांमध्ये: 6.50 टक्के व्याज दरासाठी मासिक ठेव फक्त 593 असणार आहे.
ज्येष्ठ नागरिक
3 वर्षात 1 लाख रुपये उभे करण्यासाठी: 7.25 टक्के व्याजादरासाठी दरमहा फक्त 2,482 रुपये जमा करावे लागतील.
4 वर्षांत 1 लाख रुपयांसाठी: 7.25 टक्के व्याजदरासाठी मासिक गुंतवणूक 1,793 असणार आहे.
5 वर्षांत 1 लाख रुपये: 7 टक्के व्याजदरासाठी दरमहा फक्त 1,391 भरावे लागतील.
10 वर्षांत 1 लाख रुपये मिळवण्यासाठी: 7 टक्के व्याजासह मासिक फक्त 576 रुपये जमा करावे लागतील.
योजना मुदतपूर्व बंद केल्यास दंड
बँकेच्या आरडी योजनेत “हर घर लखपती” मुदतपूर्व बंद केल्यास, गुंतवणूकदाराला दंड आकारला जाईल. 5 लाखांपर्यंतच्या मुद्दलावर 0.50 टक्के दंड आणि 5 लाखांपेक्षा जास्त मुद्दलावर 1 टक्के दंड लागू होईल. ठेवीच्या कालावधीनुसार व्याज दर 0.50 टक्के किंवा 1 टक्के असणार आहे. यामध्ये जे कमी असेल ते. परंतू, 7 दिवसांपेक्षा कमी ठेवींवर कोणतेही व्याज दिले जाणार नाही. जर हप्ता लवकर जमा केला असेल, तर मॅच्युरिटी रकमेवर कोणताही परिणाम होणार नाही, परंतु जर हप्ता उशीरा जमा केला असेल, तर मॅच्युरिटी रकमेतून दंड वजा केला जाईल.
योजना कशी सुरू करावी?
SBI च्या हर घर लखपती योजनेत खाते उघडण्याची प्रक्रिया सोपी आणि सोयीस्कर आहे. ग्राहक त्यांच्या जवळच्या एसबीआय शाखेला भेट देऊन किंवा ऑनलाइन मोडद्वारे अर्ज करू शकतात. यामध्ये ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा आणि पासपोर्ट आकाराचा फोटो अशी कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. खाते उघडल्यानंतर, मासिक जमा रकमेचा निर्णय घेतला जाऊ शकतो. गुंतवणुकीसाठी ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत, ज्यामुळे ही योजना सहज उघडली जाऊ शकते.