एक्स्प्लोर

धीरूभाईंचा वारसा मुकेश अंबानींनी नेला पुढे, 20 वर्षांत 20 पटींनं वाढवला रिलायन्स इंडस्ट्रीचा नफा

Mukesh Ambani: रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) संस्थापक धीरूभाई अंबानी (Dhirubhai Ambani) यांची आज 90 वी जयंती आहे. आजच्याच दिवशी मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी रिलायन्सची सुत्रे हाती घेतली होती. याला आज 20 वर्ष पूर्ण झाले आहेत. कसा राहिला त्यांचा हा 20 वर्षांचा (Mukesh Ambani Success Story) प्रवास हे जाणून घेऊ...

Mukesh Ambani: रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) ही देशातील सर्वात आघाडीची कंपनी आहे. याचा व्यवसाय भारतासह अनेक देशांमध्ये पसरलेला आहे. कपड्यांच्या उद्योगापासून सुरू झालेला रिलायन्स इंडस्ट्रीजचा व्यवसाय आज ऊर्जा, रिटेलपासून मीडिया-मनोरंजन आणि डिजिटल सेवांपर्यंत अनेक क्षेत्रात पसरला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) संस्थापक धीरूभाई अंबानी (Dhirubhai Ambani) यांची आज 90 वी जयंती आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजसाठी आजचा दिवस आणखी एका कारणामुळे खास आहे, आजच्याच दिवशी मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी रिलायन्सची सुत्रे हाती घेतली होती. याला आज 20 वर्ष पूर्ण झाले आहेत. या 20 वर्षात त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजला एका विशिष्ट उंचीवर पोहोचवलं आहे. कसा राहिला त्यांचा हा 20 वर्षांचा प्रवास (Mukesh Ambani Success Story) हे जाणून घेऊ...

Mukesh Ambani Completes 20 Years As Reliance Chairman and MD: 20 वर्षांत 20 पट वाढला रिलायन्स इंडस्ट्रीचा नफा 

वडिलांच्या मृत्यूनंतर आजच्याच दिवशी मुकेश अंबानी (Mukesh Ambani) 20 वर्षांपूर्वी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (Reliance Industries) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदाची सुत्रे हाती घेतली. त्यांनी रिलायन्सची धुरा हाती घेताच कंपनीला आधीपेक्षाही अधिक यश मिळू लागलं आणि रिलायन्स इंडस्ट्रीज ही जगातील सर्वात मोठ्या उद्योग समूहा पैकी एक आहे. आज  मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन दशकात कंपनीने महसूल, नफा तसेच बाजार भांडवलात सतत दुहेरी अंकी वाढीचा दर गाठला आहे. या कालावधीत कंपनीचे बाजार भांडवल 42 पटीने वाढले, तर नफा जवळपास 20 पटीने वाढला.

Mukesh Ambani Completes 20 Years As Reliance Chairman and MD: मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली गुंतवणूकदारांना मिळाला चांगला नफा 

मुकेश अंबानींच्या (Mukesh Ambani) नेतृत्वाखाली म्हणजेच गेल्या 20 वर्षांत गुंतवणूकदारांच्या कमाईतही प्रचंड वाढ झाली आहे. प्रतिवर्षी 87 हजार कोटी या दराने गुंतवणूकदारांच्या खिशात 17.4 लाख कोटी रुपये आले आहेत. दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीजला (Reliance Industries) जगभरातील मोठ्या कंपन्यांकडून गुंतवणूक मिळाली आहे. 

Mukesh Ambani: मुकेश अंबानी यांनी टेलिकॉम आणि रिटेल उद्योगातही मिळवलं मोठं यश 

मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या नेतृत्वात कंपनीने तेलापासून सुरुवात केल्यानंतर, टेलिकॉम आणि रिटेल उद्योगातही हात घातला आणि यश मिळवलं. 

Mukesh Ambani: रिलायन्स जिओ

मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी रिलायन्स जिओला (JIo) देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठ्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक बनवले आहे. जिओ (JIo) आल्यानंतर देशाने डिजिटल जगात मोठी घोडदौड केली. आज सर्वाधिक डिजिटल व्यवहारांचा विक्रम भारताच्या नावावर आहे. हातगाडीपासून ते पंचतारांकित हॉटेलपर्यंत डिजिटल पेमेंटची सुविधा आहे. यामागे सरकारचे प्रयत्न आहेत, पण बरेच श्रेय रिलायन्स जिओलाही जाते. जिओच्या आगमनानंतर सुमारे 250 रुपये प्रति जीबी दराने उपलब्ध असलेला डेटा जवळपास 10 रुपयांपर्यंत घसरला आहे. देशाने डेटा वापरातही मोठी झेप घेतली आहे. 2016 मध्ये भारताने 150 व्या क्रमांकावरून झेप घेत इतर सर्वांना मागे टाकून जगात पहिले स्थान मिळवले आहे.

Mukesh Ambani's journey was in Reliance Industries in 20 years : 20 वर्षात मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वात कंपनीने अशी केली प्रगती 

  • 6 जुलै 2002 रोजी त्यांचे वडील आणि रिलायन्सचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांच्या निधनानंतर मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारला.
  • 2022 मध्ये त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या प्रमुखपदी दोन दशके पूर्ण केली. या 20 वर्षांमध्ये कंपनीने महसूल, नफा, निव्वळ संपत्ती, मालमत्ता तसेच बाजार भांडवल यामध्ये सातत्यपूर्ण मजबूत दुहेरी अंकी वाढ झाली आहे.
  • रिलायन्सचे बाजार भांडवल गेल्या 20 वर्षात वार्षिक 20.6% दराने वाढले आहे. जे मार्च 2002 मध्ये 41,989 कोटी रुपये होते ते मार्च 2022 मध्ये 17,81,841 कोटी रुपये झाले.
  • रिलायन्सचा महसूल 2001-02 मधील 45,411 कोटी रुपयांवरून 2021-22 मध्ये 792,756 कोटी रुपये वार्षिक दराने 15.4% वाढला.
  • रिलायन्सचा निव्वळ नफा 16.3% च्या वार्षिक दराने वाढला आहे. जो आर्थिक वर्ष 2001-02 मध्ये 3,280 कोटी रुपयांवरून 2021-22 मध्ये 67,845 कोटी रुपये झाला आहे.
  • रिलायन्सची निर्यात वार्षिक 16.9% दराने वाढली आहे. ती आर्थिक वर्ष 2001-02 मधील 11,200 कोटींवरून आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 254,970 कोटी झाली आहे.
  • रिलायन्सची एकूण मालमत्ता 18.7% वार्षिक दराने मार्च 2002 मध्ये  48,987 कोटींवरून मार्च 2022 मध्ये 14,99,665 कोटी झाली.
  • रिलायन्सची निव्वळ मालमत्ता वार्षिक 17.0% दराने मार्च 2002 मध्ये 27,977 कोटींवरून मार्च 2022 मध्ये 645,127 कोटी झाली.
  • रिलायन्सने या दोन दशकांमध्ये गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 17.4 लाख कोटींची भर घातली, जी दरवर्षी सरासरी 87,000 कोटी आहे.
  • रिलायन्सने या दोन दशकांमध्ये अनेक नवीन व्यवसाय सुरू केले.
  • रिलायन्स जिओने 2016 मध्ये ऑपरेशन सुरू केले.
  • रिलायन्स रिटेलने 2006 मध्ये ऑपरेशन सुरू केले.
  • रिलायन्सचे रिफायनिंग आणि पेट्रोकेमिकल्सचे पारंपारिक व्यवसायही गेल्या दोन दशकात अनेक पटींनी भरभराटीला आले आणि विस्तारले.
  • 2012 ते 2016 पर्यंतच्या J3 विस्ताराने जगातील काही सर्वात मोठ्या आणि सर्वात अद्वितीय डाउनस्ट्रीम युनिट्स जोडल्या. उदाहरणार्थ, रिलायन्सने जामनगर येथे जगातील सर्वात मोठी रिफायनरी ऑफ-गॅस क्रॅकरची स्थापना केली. यात जगातील सर्वात मोठे पेटकोक गॅसिफिकेशन युनिट देखील जोडले गेले. फीडस्टॉकमध्ये विविधता आणण्यासाठी यूएसमधून इथेन आयात करण्यासाठी जगभरातील जगातील पहिली-वहिली व्हर्च्युअल पाइपलाइन देखील सेट केली आहे.
  • Jio लॉन्च केल्यानंतर भारत जगातील डेटा कॅपिटल बनला आणि डेटा / GB ची किंमत 500 रुपयांवरून घसरून 12 रुपयांवर आली. ब्रॉडबँड डेटा वापरामध्ये भारताची रँकिंग 2016 मध्ये 150 वरून 2018 मध्ये पहिल्या क्रमांकावर आली आहे.
  • रिलायन्सने भारताच्या निव्वळ कार्बन शून्य मोहिमेत योगदान देत 2035 पर्यंत नेट कार्बन न्यूट्रल होण्याचे लक्ष ठेवले आहे. रिलायन्स 2024 पर्यंत 10GW चा सोलर PV सेल आणि मॉड्यूल फॅक्टरी सुरू करेल, 2026 पर्यंत 20GW पर्यंत वाढवला जाईल. 2025 पर्यंत RIL ची संपूर्ण राउंड-द-क्ॉक (RTC) पॉवर आणि ग्रीन हायड्रोजनसाठी कॅप्टिव्ह सोलापूर पॉवर प्लांट्समधून ऊर्जा निर्माण करण्याची योजना आहे. 
  • रिलायन्सने 2020-21 मध्ये कोविड लॉकडाउनच्या सर्वात कठीण काळात भांडवली निधी उभारणीचा विक्रम केला. राईट्स इश्यू आणि जिओ प्लॅटफॉर्म आणि रिलायन्स रिटेल व्हेंचर्स मधील अल्पसंख्याक भागभांडवल विक्रीद्वारे जागतिक बाजारातील गुंतवणूकदारांना 2.5 लाख कोटींहून अधिक रक्कम जमा केली. FY2021 मध्ये, रिलायन्स ही भारतासाठी सर्वात मोठी FDI जनरेटर होती.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shaktipeeth Expressway : शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी कोणता निर्णय झाला?
शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी कोणता निर्णय झाला?
Nashik News : धरण उशाला अन्‌ कोरड घशाला! नाशिक शहरात 700 कुटुंबांची पाण्यासाठी वणवण, संतप्त महिलांचा मनपाला इशारा; 'आठवड्याभरात...'
धरण उशाला अन्‌ कोरड घशाला! नाशिक शहरात 700 कुटुंबांची पाण्यासाठी वणवण, संतप्त महिलांचा मनपाला इशारा; 'आठवड्याभरात...'
8 th Pay commission: मोठी बातमी! मोदी सरकारकडून 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी; सरकारी कर्मचारी मालामाल, होऊ दे खर्च
मोठी बातमी! मोदी सरकारकडून 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी; सरकारी कर्मचारी मालामाल, होऊ दे खर्च
गृहमंत्रीपद सांभाळण्यात फडणवीस अपयशी; सैफवरील हल्ल्यानंतर काँग्रेसचा संताप, मुंबईच्या खासदारही चिडल्या
गृहमंत्रीपद सांभाळण्यात फडणवीस अपयशी; सैफवरील हल्ल्यानंतर काँग्रेसचा संताप, मुंबईच्या खासदारही चिडल्या
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 16 January 2025100 Headlines | शंभर हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP MajhaDoctors On Saif ali Khan : सैफ अली खानला ऑपरेशन शिएटरमधून आयसीयूमध्ये हलवलंDhananjay Munde Vaijnath Mandir : धनंजय मुंडे परळी वैजनाथ मंदिरात, वैजनाथाची विधीवत पूजा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shaktipeeth Expressway : शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी कोणता निर्णय झाला?
शक्तीपीठ महामार्गाला वळसा घातला जाणार! कोल्हापूर, सांगली जिल्ह्यासाठी कोणता निर्णय झाला?
Nashik News : धरण उशाला अन्‌ कोरड घशाला! नाशिक शहरात 700 कुटुंबांची पाण्यासाठी वणवण, संतप्त महिलांचा मनपाला इशारा; 'आठवड्याभरात...'
धरण उशाला अन्‌ कोरड घशाला! नाशिक शहरात 700 कुटुंबांची पाण्यासाठी वणवण, संतप्त महिलांचा मनपाला इशारा; 'आठवड्याभरात...'
8 th Pay commission: मोठी बातमी! मोदी सरकारकडून 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी; सरकारी कर्मचारी मालामाल, होऊ दे खर्च
मोठी बातमी! मोदी सरकारकडून 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी; सरकारी कर्मचारी मालामाल, होऊ दे खर्च
गृहमंत्रीपद सांभाळण्यात फडणवीस अपयशी; सैफवरील हल्ल्यानंतर काँग्रेसचा संताप, मुंबईच्या खासदारही चिडल्या
गृहमंत्रीपद सांभाळण्यात फडणवीस अपयशी; सैफवरील हल्ल्यानंतर काँग्रेसचा संताप, मुंबईच्या खासदारही चिडल्या
शुभमन गिल, सारा तेंडुलकरच्या डेटिंग रूमर्समध्ये व्हेकेशन PHOTOS झालेत Viral? क्रूझवर स्पेंड केला क्वॉलिटी टाईम
शुभमन गिल, सारा तेंडुलकरच्या डेटिंग रूमर्समध्ये व्हेकेशन PHOTOS झालेत Viral? क्रूझवर स्पेंड केला क्वॉलिटी टाईम
Nashik News : ड्युटी संपली! घरी जायला निघाली पण...; नाशिकमध्ये नायलॉन मांजाने महिला कॉन्स्टेबलचा कापला गळा
ड्युटी संपली! घरी जायला निघाली पण...; नाशिकमध्ये नायलॉन मांजाने महिला कॉन्स्टेबलचा कापला गळा
Saif ali khan attack in Mumbai: लिमाच्या तक्रारीवरुन हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल; सैफच्या घरी मध्यरात्री काय घडलं, पोलिसांनी दिली माहिती
लिमाच्या तक्रारीवरुन हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल; सैफच्या घरी मध्यरात्री काय घडलं, पोलिसांनी दिली माहिती
Beed News: वैजनाथाचं दर्शन घेऊन धनुभाऊ थेट जगन्मित्र कार्यालयात; वाल्मिक कराडच्या समर्थकांची गर्दी
Beed News: वैजनाथाचं दर्शन घेऊन धनंजय मुंडे परळीतील जगन्मित्र कार्यालयात पोहोचले
Embed widget