Aadhaar Card: आधार कार्ड हरवलंय? काळजी करु नका, जाणून घ्या ऑनलाइन आधार कार्ड काढण्याची प्रक्रिया
प्रत्येक महत्त्वाच्या कामासाठी लागणारा पुरावा म्हणजे आधार कार्ड. हे आधार कार्ड हरवले तर घाबरुन जाण्याचे कारण नाही. जाणून घ्या नवीन आधार कार्ड काढण्याची प्रक्रिया.
Aadhaar Card: प्रत्येक महत्त्वाच्या कामासाठी लागणारा पुरावा म्हणजे आधार कार्ड (aadhaar card). बँक खाते उघडण्यापासून ते शाळेत प्रवेश घेणे, सरकारी योजनांचा लाभ मिळवणे या सर्व कामांसाठी ही कागदपत्रे आवश्यक आहेत. अशा परिस्थितीत आधार कार्ड असणे अत्यंत गरजेचे आहे. अनेकवेळा आधार कार्ड हरवले जाते. अशा परिस्थितीत तुमची अनेक महत्त्वाची कामे थांवू शकतात. त्यामुळं नवीन आधार कार्ड काढण्याची प्रक्रिया काय ते जाणून घ्या.
आजकाल, आधारशी संबंधित फसवणूक प्रकरणे खूप वेगाने वाढत आहेत. अशा परिस्थितीत, जर तुमचे आधार कार्ड हरवले असेल, तर प्रथम त्याबद्दल टोल फ्री क्रमांकावर (UIDAI टोल फ्री क्रमांक) तक्रार करा. यामुळं तुमच्या आधारचा गैरवापर टाळता येईल. आधार हरवल्यानंतर, सर्वप्रथम तुम्ही टोल फ्री क्रमांक 1947 वर कॉल करून माहिती द्यावी.
असे मिळवा नवीन आधार कार्ड
आधार कार्ड हरवल्यास, सर्वप्रथम https://uidai.gov.in/ ला भेट द्या.
येथे My Aadhaar टॅबवर क्लिक करा.
यानंतर, ऑर्डर आधार पीव्हीसी कार्डवर क्लिक करा आणि ऑर्डर नाऊ निवडा.
येथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा भरावा लागेल.
पुढे, Proceed वर क्लिक करा आणि तुमचा पत्ता आणि मोबाईल नंबर टाका. यानंतर सबमिट करा.
यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर OTP येईल, तो टाका.
यानंतर पीव्हीसी बेससाठी 50 रुपये द्या.
पेमेंट केल्यानंतर, त्याच्या स्वरूपाबद्दल एक संदेश येईल.
तुम्हाला एक आयडी देखील मिळेल ज्याद्वारे तुम्ही आधार मिळवण्याची स्थिती तपासू शकता.
तुम्हाला हे PVC आधार कार्ड 15 दिवसात मिळेल.
महत्त्वाच्या बातम्या: