एक्स्प्लोर

LIC Share News: एलआयसीची निराशाजनक सुरुवात; गुंतवणुकदारांना 42 हजार कोटींचा फटका

LIC Share News : एलआयसीच्या गुंतवणुकदारांसाठी पहिला दिवस निराशाजनक राहिला. अपेक्षे प्रमाणे लिस्टिंग न झाल्याचा परिणाम एलआयसीच्या मार्केट कॅपिटलवरही झाल्याचे दिसून आले.

LIC Share News : बहुप्रतिक्षित असलेल्या एलआयसीचा आयपीओ शेअर बाजारात आज सूचीबद्ध (लिस्टिंग) झाला. शेअर बाजारात लिस्ट होताना एलआयसीचा शेअर जवळपास 9 टक्के डिस्काउंटमध्ये लिस्ट झाला. एलआयसीच्या या निराशाजनक लिस्टिंगचा फटका गुंतवणुकदारांना बसला आहे. एलआयसीने आपल्या प्रति शेअरची किंमत 949 रुपये निश्चित केली होती. मात्र, डिस्काउंट लिस्टिंगमुळे गुंतवणुकदारांना 42 हजार 500 कोटींचा फटका बसला आहे. 

एलआयसीने निश्चित केलेल्या इश्यू प्राइसनुसार  कंपनीचे बाजार भांडवल मूल्य हे 6 लाख कोटींपेक्षा अधिक होते. मात्र कमकुवत लिस्टिंगमुळे यामध्ये 42 हजार 500 कोटींची घट झाली. आयपीओमध्ये पॉलिसीधारकांना 60 रुपये प्रति शेअर सवलत देण्यात आली होती. 

आज शेअर बाजारात लिस्टिंग झाल्यानंतर एलआयसी ही सर्वाधिक बाजार भांडवल (मार्केट कॅपिटल) असलेली देशातील पाचवी कंपनी ठरली आहे.  मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीचे बाजार भांडवल 16.42 लाख कोटी रुपये आहे. त्यानंतर टाटा समुहाची टीसीएस, एचडीएफसी बँक आणि देशातील दुसरी मोठी आयटी कंपनी इन्फोसिसचा क्रमांक येतो. 

एलआयसीच्या शेअरचा दर वधारणार?

मोतीलाल ओस्वाल फायनान्शियल सर्व्हिसच्या हेमांग जानी यांनी म्हटले की, एलआयसीची लिस्टिंग कमी किंमतीत झाली. मात्र, आकर्षक मूल्यांकन आणि बाजारातील स्थिरता लक्षात घेता किरकोळ आणि संस्थात्मक गुंतवणुकदार एलआयसीकडे वळू शकतात असे त्यांनी म्हटले. 

1000 रुपयांपर्यंत शेअर दर?

Macquarie या परदेशी ब्रोकरेज फर्मने एलआयसीला टार्गेट प्राइस 1000 रुपये सांगितले आहे. त्याशिवाय न्यूट्रल रेटिंगही दिली आहे. Macquarie चे टार्गेट प्राइसिंग  इश्यू किंमतीपेक्षा 5.37 टक्के अधिक आहे. 

दरम्यान, एलआयसीचा आयपीओ (LIC IPO) विक्रमी सहा दिवस बोलीसाठी खुला होता. एलआयसीच्या आयपीओला मोठा प्रतिसाद लाभला. मागील आठवड्यात एलआयसी आयपीओचे वाटप करण्यात आलं होतं. परदेशी गुंतवणुकदारांनी एलआयसीच्या आयपीओकडे पाठ फिरवली होती. मात्र, भारतातील गुंतवणुकदारांनी चांगला प्रतिसाद दिला होता. ग्रे मार्केटमध्ये एलआयसी आयपीओ प्रीमियमचा दर सुरुवातीच्या काही दिवसांत चांगला वधारला होता. त्यानंतर हा प्रीमियम दर घसरू लागला होता. एलआयसीची लिस्टिंग सवलतीच्या दरात होण्याचे संकेत ग्रे मार्केटमधून मिळत होते. त्यानंतर आज एलआयसी शेअर डिस्काउंटमध्ये लिस्ट झाल्याने गुंतवणुकदारांमध्ये काही निराशेचे वातावरण आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tahawwur Rana : मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यार्पण करण्यास मंजुरी; अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यार्पण करण्यास मंजुरी; अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
'या' 17 धार्मिक शहरांमधील दारूची दुकाने पूर्णपणे बंद होणार; इतरत्र हलवण्यास सुद्धा परवानगी नाहीच!
'या' 17 धार्मिक शहरांमधील दारूची दुकाने पूर्णपणे बंद होणार; इतरत्र हलवण्यास सुद्धा परवानगी नाहीच!
Donald Trump Ends Birth right Citizenship : डिलीव्हरी करा, अमेरिकन व्हायचंय! ट्रम्प यांच्या निर्णयाने अमेरिकत सात ते आठ महिन्यांच्या भारतीय गर्भवती महिलांची रुग्णालयात रांग लागली
डिलीव्हरी करा, अमेरिकन व्हायचंय! ट्रम्प यांच्या निर्णयाने अमेरिकत सात ते आठ महिन्यांच्या भारतीय गर्भवती महिलांची रुग्णालयात रांग लागली
जेष्ठ साहित्यिक व निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकरांचं निधन, छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतला अखेरचा श्वास
जेष्ठ साहित्यिक व निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकरांचं निधन, छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतला अखेरचा श्वास
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Manoj Jarane Protest : मनोज जरांगेंचं सराटीत सातवं आमरण उपोषण,  सराटीत परिस्थिती काय?Narendra Chapalgaonkar Passes Away:माजी न्यायमूर्ती आणि ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकरांचं निधनसकाळी ८ च्या हेडलाईन्स ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 25 January 2025Thane Station Washroom : कॉन्ट्रॅक्ट संपल्यामुळे थेट शौचालय बंद, ठाणे रेल्वे स्थानकावरील प्रकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tahawwur Rana : मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यार्पण करण्यास मंजुरी; अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यार्पण करण्यास मंजुरी; अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
'या' 17 धार्मिक शहरांमधील दारूची दुकाने पूर्णपणे बंद होणार; इतरत्र हलवण्यास सुद्धा परवानगी नाहीच!
'या' 17 धार्मिक शहरांमधील दारूची दुकाने पूर्णपणे बंद होणार; इतरत्र हलवण्यास सुद्धा परवानगी नाहीच!
Donald Trump Ends Birth right Citizenship : डिलीव्हरी करा, अमेरिकन व्हायचंय! ट्रम्प यांच्या निर्णयाने अमेरिकत सात ते आठ महिन्यांच्या भारतीय गर्भवती महिलांची रुग्णालयात रांग लागली
डिलीव्हरी करा, अमेरिकन व्हायचंय! ट्रम्प यांच्या निर्णयाने अमेरिकत सात ते आठ महिन्यांच्या भारतीय गर्भवती महिलांची रुग्णालयात रांग लागली
जेष्ठ साहित्यिक व निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकरांचं निधन, छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतला अखेरचा श्वास
जेष्ठ साहित्यिक व निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकरांचं निधन, छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतला अखेरचा श्वास
Taxi -Auto Fare Hike : टॅक्सी अन् ऑटो रिक्षाची 3 रुपयांची भाडेवाढ, मूळ भाड्यानंतर प्रत्येक किलोमीटरला किती रुपये द्यावे लागणार? 
टॅक्सी अन् ऑटो रिक्षाची 3 रुपयांची भाडेवाढ, मूळ भाड्यानंतर प्रत्येक किलोमीटरला किती रुपये द्यावे लागणार? 
Walmik Karad Beed: वाल्मिक कराडची सर्व मालमत्ता जप्त करण्याच्या हालचाली, एसआयटीने डेटा काढला, कोर्टात परवानगीचा अर्ज
मोठी बातमी: वाल्मिक कराडला 'मकोका'पेक्षा मोठा झटका; एसआयटी सर्व मालमत्ता जप्त करण्याच्या तयारीत
Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा मैदानात, अंतरवाली सराटीत आजपासून आमरण उपोषण, सरकारचं टेन्शन वाढणार?
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पुन्हा मैदानात, अंतरवाली सराटीत आजपासून आमरण उपोषण, सरकारचं टेन्शन वाढणार?
Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, तीन दिवसांचा ब्लॉक, वाहतुकीत कोणते बदल होणार?
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, तीन दिवसांचा ब्लॉक, वाहतुकीत कोणते बदल होणार?
Embed widget