पुत्र व्हावा ऐसा! देशासाठी सोडली लाखोची नोकरी, पहिल्याच प्रयत्नात झाला DSP
आज आपण एका जिद्दी तरुणाची यशोगाथा पाहणार आहोत. सय्यद अरीब अहमद (syed areeb ahmad) असं उत्तर प्रदेशमधील प्रयागराजच्या (Prayagraj) या तरुणाचं नाव आहे.
Success Story: अनेक तरुणांचं देशाची सेवा करण्याचं स्वप्न असतं. यासाठी ते खूप मेहनत घेतात. पण देशसेवेचं कोणाचं स्वप्न पूर्ण होतं तर कोणाला यामध्ये अपयश येतं. अनेक असे तरुण आहेत की, जे लागलेली नोकरी (Job) सोडून देशसेवत नोकरी करण्याची तयारी करतात. आज आपण अशाच एका जिद्दी तरुणाची यशोगाथा पाहणार आहोत. सय्यद अरीब अहमद (syed areeb ahmad) असं उत्तर प्रदेशमधील प्रयागराजच्या (Prayagraj) या तरुणाचं नाव आहे. 1 लाख रुपये पगाराची नोकरी सोडून नागरी सेवा परीक्षांचा अभ्यास सुरु केला. पहिल्याच प्रयत्नात या तरुणाने पोलीस उपअधीक्षक होण्याचा सन्मान मिळवला.
1 लाख रुपये पगाराची संधी सोडली
सय्यद अरीब अहमदला 1 लाख रुपये पगार आणि परदेशात जाण्याची संधी मिळाली होती. मात्र, या तरुणाने ही नोकरी नाकारुन सैन्यात भरती होण्याची तयारी सुरु केली होती. नागरी सेवा परीक्षांचा अभ्यास करुन सय्यद अहमद पोलीस उपअधीक्षक (Deputy Superintendent of Polic) झाला आहे. सय्यद अहमद यांचे आयआयटी कानपूरमधून बीटेक झाले आहे. त्यानंतर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमधून त्यांनी एमएससी केलं आहे. 2018 मध्ये ते पीपीएस अधिकारी झाले होते.
कानपूरमधून बीटेक पूर्ण
सय्यद अहमद यांनी आयआयटी कानपूरमधून बीटेक पूर्ण केल्यानंतर परदेशात जाऊन चांगली नोकरी करावी अशी त्यांच्य वडिलांची इच्छा होती. त्यांचे वडील व्यवसायानं वकिल होते. पण सय्यद अहमदला सैन्यात भरती होऊन देशसेवा करायची होती. सय्यद अहमदला लोकांना सहकार्य करायला आवडे, यामुळेच त्यांनी लागलेली 1 लाख रुपयांची नोकरी डावलून पोलीस अधिकाऱ्याची नोकरी करणं पसंत केलं आहे.
नागरी सेवा परीक्षेसाठी सय्यद अहमदने गाठली होती दिल्ली
सुरुवातीच्या काळात सय्यद अहमद प्रयागराजमध्ये राहून नागरी सेवांच्या परीक्षांची तयारी करत होता. त्यानंतर काही काळानंतर तो दिल्लीला गेला. 2018-19 मध्ये पहिल्याच प्रयत्नात सय्यद अहमद DSP झाला. त्यापूर्वीच तो PPS ची परीक्षा पास झाला होता.
सय्यद अहमद यांचे खूप पारदर्शक काम
कर्तव्यावर असताना सय्यद अहमद हे खूप पारदर्शक काम करत आहेत. अनेक घटना त्यांनी उघड केल्या आहेत. दरोडे असतील, गांजा तस्करी असेल या घटनांचा त्यांनी छडा लावला आहे. अनेक गुन्हेगारांनी त्यांनी अटकही केलीय. सय्यद अहमद यांच्याकडे ताज महलची सुरक्षा आणि आग्रा शहरातील वाहतूक व्यवस्थेची जबाबदारी देण्यात आलीय. तंत्रज्ञानाचा वापर करुन त्यांनी ही जबाबदारी पेलली आहे.
महत्वाच्या बातम्या: