एक्स्प्लोर

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मिळाली दिवाळी भेट; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा, KYC न करणाऱ्यांना हप्ता मिळणार की नाही?

Ladki Bahin Yojana: आतापर्यंत १ कोटी महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. ज्यांनी केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांनाही यावेळचा हप्ता मिळाला आहे.

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) सप्टेंबरचा हप्ता थेट पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सरकारकडून दिवाळी मिळालेली ही भेटच आहे. अतिवृष्टी व पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीपूर्वी ही रक्कम महिलांच्या खात्यात जमा होणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले होते. मात्र सामाजिक न्याय विभागाने यासाठीचा ४१० कोटी रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाला वर्ग केला आहे. त्यानंतर कालपासून (शुक्रवारी, ता11) सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा होण्यास सुरूवात झाली आहे.(Ladki Bahin Yojana) 

महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी या योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी दोन महिन्यांत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार आतापर्यंत १ कोटी महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. ज्यांनी केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांनाही यावेळचा हप्ता मिळाला आहे.

Ladki Bahin Yojana EKYC:  लाडकी बहीण योजनेसाठी EKYC बंधनकारक

लाडकी बहीण योजनेसाठी EKYC बंधनकारक करण्यात आलीये. आता लाडक्या बहि‍णींना (Ladki Bahin Yojana) दरवर्षी केवायसी करावी लागणार आहे. त्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आलीये. पण केवायसी करताना फक्त शासनाच्या अधिकृत वेबसाईट https://ladakibahin.maharashtra.gov.in/ekyc यावरच केवायसी पूर्ण करावी. 

गुगलवर केवायसी करण्याच्या अनेक फेक वेबसाईट देखील समोर आल्या आहेत. त्यापैकी https://hubcomuat.in/ ही वेबसाईट गुगलवर सर्चमध्ये येत आहे. पण ही सरकारची वेबसाईट नसून फेक वेबसाईट आहे. त्याने तुमचा डेटा चोरीला जाऊ शकतो. त्यामुळे केवायसी करताना काळजीपूर्वक लक्ष द्या. लाडकी बहीण योजेनेसाठी केवायसी करताना अनेक अडचणी येत आहे. त्यात काही जणांना ओटीपी येत नसल्याने समस्या निर्माण होत आहे. आता सरकार यावर काय तोडगा काढते ही पाहणे गरजेचे आहे.

केवायसी करताना अडचणी (Ladki Bahin Yojana EKYC)

लाडकी बहीण योजनेसाठी ईकेवायसी पूर्ण करावी लागणार आहे. परंतु लाडकी बहीण योजनेची वेबसाईट ठप्प झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतेय. कारण केवायसी करताना एरर येत आहे. तर काही जणांना ओटीपी येत नाही. त्यामुळे लाडक्या बहि‍णींना केवायसी करताना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहे.

यासोबत केवायसी करताना पती किंवा वडिलांचे आधार नंबर बंधनकारक करण्यात आले आहे. पंरतु बऱ्याच लाभार्थ्यांना पती हयात नाहीत. किंवा वडील देखील नाही. त्यामुळे त्यांना आता प्रश्न पडलाय की, केवायसी करताना आधार नंबर कुणाचा टाकायचा.

ओटीपी येण्यास अडचण (OTP Problems Ladki Bahin Yojana EKYC)

लाडकी बहीण योजेनेसाठी केवायसी (Ladki Bahin Yojana Ekyc Problem) करताना अनेक अडचणी येत आहे. त्यात काही जणांना ओटीपी येत नसल्याने समस्या निर्माण होत आहे. आता सरकार यावर काय तोडगा काढते ही पाहणे गरजेचे आहे. 

Ladki Bahin Scheme E Kyc: लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया कशी पूर्ण कराल?

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या e-KYC साठी https://ladakibahin.maharashtra.gov.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी.

मुखपृष्ठावर असलेल्या e-KYC बॅनरवर क्लिक केल्यावर e KYC फॉर्म उघडेल.

या फॉर्ममध्ये लाभार्थ्याने आपला आधार क्रमांक आणि पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करून, आधार प्रमाणीकरणासाठी संमती देत Send OTP या बटणावर क्लिक करावे. त्यानंतर लाभार्थ्याच्या आधार-लिंक मोबाईल क्रमांकावर OTP येईल. हा OTP टाकून Submit बटणावर क्लिक करावे.

यानंतर प्रणाली तपासेल की लाभार्थ्याची KYC आधीच पूर्ण झाली आहे की नाही.

* जर आधीच पूर्ण झाली असेल, तर “e-KYC आधीच पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.

* जर पूर्ण झाली नसेल, तर आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र यादीत आहे की नाही हे तपासले जाईल.

जर आधार क्रमांक पात्र यादीत असेल, तर पुढील टप्प्याला जाता येईल.

यानंतर लाभार्थ्याने पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक तसेच पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करावा. संमती दर्शवून Send OTP वर क्लिक करावे. OTP संबंधित मोबाईलवर प्राप्त झाल्यावर तो टाकून Submit बटणावर क्लिक करावा.

त्यानंतर लाभार्थ्याला आपला जात प्रवर्ग निवडावा लागेल आणि खालील बाबी प्रमाणित (Declaration) कराव्या लागतील:

1. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत.

2. माझ्या कुटुंबातील केवळ १ विवाहित आणि १ अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे. वरील बाबींची नोंद करून चेक बॉक्सवर क्लिक करावे व Submit बटण दाबावे.

शेवटी, “Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT
Amit Thackeray on Balasaheb Sarvade MNS Solapur : बाळासाहेबांच्या हत्येप्रकरणी अमित ठाकरे आक्रमक
Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
Embed widget