Google Pay : आता Gpay वर क्रेडिट कार्डद्वारे UPI पेमेंट करता येणार, जाणून घ्या सर्व स्टेप्स
Google Pay : गूगल पे द्वारे आता अतिशय सोप्या पद्धतीने क्रेडिटसह UPI पेमेंट देखील करता येणार आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला क्रेडिट कार्ड घेऊन फिरण्याची आवश्यकता भासणार नाही.
UPI पेमेंटचा वापर आता वाढताना दिसत आहे. हा पेमेंट करण्याचा सगळ्यात सुरक्षित मार्ग समजला जातो. त्यामुळे आजकाल प्रत्येक जण कॅश सोबत न ठेवता UPI पेमेंटचा वापर करतात. पाणीपुरीच्या गाड्यापासून ते मोठ्या-मोठ्या दुकानांमध्येही UPI पेमेंटचा वापर आता सर्रास केला जातो. UPI पेमेंटसाठी लोक गूगल पे, फोन पे आणि पेटीएम जास्त वापरतात. याच Gpay वर आतापर्यंत डेबिट कार्ड आणि बँक अकाऊंटच्या साहाय्याने पेमेंट करता येऊ शकत होते. मात्र Gpay ने क्रेडिट कार्ड सेवा काही बँकांसाठी सुरु केली आहे. म्हणजेच तुम्ही क्रेडिट कार्ड हा पर्याय सिलेक्ट करुन UPI पेमेंट करु शकणार आहात.
काही काळापूर्वी NPCI (National Payments Corporation Of India) ने Google Pay सोबत भागीदारी केली आहे, ज्या अंतर्गत कंपनीने UPI पेमेंटसाठी रुपे क्रेडिट कार्ड एनेबल केले आहे. सध्या, Google Pay वर क्रेडिट कार्ड पेमेंटची सुविधा केवळ अॅक्सिस बँक, इंडियन बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, एचडीएफसी बँक, पंजाब नॅशनल बँक, कोटक महिंद्रा बँक आणि युनियन बँकेच्या ग्राहकांसाठी सुरु आहे. जर तुमचे क्रेडिट कार्ड बँकांचं असेल तर तुम्ही ते Google Pay शी लिंक करु शकता.
असे अॅड करा तुमचे क्रेडिट कार्ड (How To Add Your Credit Card)
- प्रथम तुमच्या फोनवर Google Pay अॅप उघडा आणि सेटिंग्ज मेनूवर जा.
- आता 'सेटअप पेमेंट मेथड' वर क्लिक करा आणि add rupay क्रेडिट कार्ड पर्यायावर क्लिक करा.
- क्रेडिट कार्डचे शेवटचे 6 अंक, एक्सपायरी डेट आणि पिन टाका.
- आता कार्ड सुरु करण्यासाठी Rupay क्रेडिट कार्ड पर्यायावर क्लिक करा.
- बँक निवडा आणि एक वेगळा UPI पिन निवडा, जो तुम्हाला प्रत्येक वेळी पेमेंट करताना टाकावा लागणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Gpay : खुशखबर! आता 'आधार कार्ड'ने करा UPI पेमेंट, गुगल पे वापरण्यासाठी डेबिट कार्डची गरज नाही