एक्स्प्लोर

देशात नोकऱ्या वाढल्या, 15 लाखांहून अधिक सदस्य EPFO ​​मध्ये सामील, सर्वाधिक संख्या कोणत्या राज्यात? 

देशात नोकऱ्यांची (Jobs) संख्या वाढत असल्याचं चित्र दिसत आहे.  कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) याबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे.

EPFO Members Data: देशात नोकऱ्यांची (Jobs) संख्या वाढत असल्याचं चित्र दिसत आहे.  कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) याबाबतची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार, डिसेंबर 2023 मध्ये 15.62 लाख सदस्य EPFO ​​मध्ये सामील झाले आहेत. गेल्या तीन महिन्यांतील हा उच्चांक आहे. त्यामुळं देशात नोकऱ्या वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. डिसेंबर 2022 च्या तुलनेत या आकडेवारीत 4.62 टक्क्यांची वाढ झाली आहे.

डिसेंबर 2023 मध्ये 8.41 लाख नवीन सदस्य EPFO ​​मध्ये सामील

कामगार मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर 2023 मध्ये 8.41 लाख नवीन सदस्य EPFO ​​मध्ये सामील झाले आहेत. नोव्हेंबर 2023 च्या तुलनेत हा आकडा 11.97 टक्क्यांनी वाढला आहे. EPFO पेरोल डेटानुसार, या कालावधीत जोडलेल्या एकूण नवीन सदस्यांमध्ये 18 ते 25 वयोगटाचा वाटा 57.18 टक्के होता. यावरुन असे दिसून येते की देशातील संघटित क्षेत्रातील कार्यशक्तीमध्ये सामील होणारे बहुतांश सदस्य हे तरुण आहेत. तरुणांना नोकऱ्या देण्यात कंपन्या पुढे आहेत. आकडेवारीनुसार, डिसेंबर 2023 मध्ये EPFO ​​योजनांमधून बाहेर गेलेले सुमारे 12.02 लाख सदस्य परत आले. 

महिलांच्या संख्येत कमालीची वाढ

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, दर महिन्याला नवीन सदस्यांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. त्यापैकी बहुतेकांना पहिल्यांदाच नोकरी मिळाली आहे. 8.41 लाख नवीन सदस्य जोडले गेले, त्यापैकी सुमारे 2.09 लाख महिला आहेत. ती पहिल्यांदाच ईपीएफओमध्ये सामील झाली आहे. डिसेंबर 2023 मध्ये एकूण 2.90 लाख महिला EPFO ​​च्या सदस्य झाल्या आहेत. नोव्हेंबर 2023 च्या तुलनेत 3.54 टक्के वाढ झाली आहे.

कोणत्या राज्यात सर्वाधिक सदस्य?

महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, कर्नाटक आणि हरियाणामधून सर्वाधिक म्हणजे 58.33 टक्के सदस्य सहभागी झाले होते. नोव्हेंबर 2023 च्या तुलनेत EPFO ​​मध्ये पुन्हा सामील झालेल्या लोकांची संख्या देखील 12.61 टक्क्यांनी वाढली आहे. जास्तीत जास्त EPFO ​​सदस्य लोह आणि पोलाद, इमारत आणि बांधकाम, मनुष्यबळ पुरवठा, सुरक्षा सेवा आणि सामान्य विमा क्षेत्राशी संबंधित आहेत. EPFO दर महिन्याला हा डेटा जारी करते. सप्टेंबर 2017 पासून त्याची सुरुवात झाली. EPFO सदस्यांना आधारद्वारे युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) द्वारे क्रमांकित केले जाते. दरम्यान, यामध्ये मिळालेल्या माहितीनुसार, देशातील संघटित क्षेत्रातील कार्यशक्तीमध्ये सामील होणारे बहुतांश सदस्य हे तरुण आहेत. तरुणांना नोकऱ्या देण्यात कंपन्या पुढे आहेत.

महत्वाच्या बातम्या:

7th Pay Commission: EPFO ने व्याज दर वाढवले, केंद्र सरकार देणार आणखी एक 'गुड न्यूज'

 

महत्त्वाच्या बातम्या

Ramdas Athawale : लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्या, पैसे कमी पडत असले तर दिल्लीवरुन आणतो : रामदास आठवले
लाडक्या बहिणींना 2100 रुपये द्या, पैसे कमी पडत असले तर दिल्लीवरुन आणतो : रामदास आठवले
Multibagger Stock : एअर कंप्रेसर मल्टीबॅगर स्टॉककडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, विक्रीत 23 टक्क्यांची वाढ; शेअरमध्ये तेजी
एअर कंप्रेसर मल्टीबॅगर स्टॉककडून पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर, विक्रीत 23 टक्क्यांची वाढ; शेअरमध्ये तेजी
NEET मध्ये अपयशी झाली, तरीही जिद्द नाही सोडली, वयाच्या 21 व्या वर्षीच मिळवल्या पाच सरकारी नोकऱ्या, शुभांगीवर कौतुकाचा वर्षाव
NEET मध्ये अपयशी झाली, तरीही जिद्द नाही सोडली, वयाच्या 21 व्या वर्षीच मिळवल्या पाच सरकारी नोकऱ्या, शुभांगीवर कौतुकाचा वर्षाव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis: महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
महाराष्ट्राची येणारी पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला संकल्प; म्हणाले, महाराष्ट्र आपल्या देशाचं ग्रोथ इंजिन
Tapsee Pannu Movie: डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
डोळ्यांवर पट्टी, हातात शस्त्र अन् खतरनाक अ‍ॅक्शन! महाभारतापासून प्रेरित आहे तापसी पन्नूची ‘ गांधारी’? OTTवर घालणार धुमाकूळ
IND vs SL 1st Test DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
IND vs SL DAY-1 Live : गॉलच्या चक्रव्यूहात शुभमन गिलचा पहिला डाव! नाणेफेक जिंकली अन् घेतला मोठा निर्णय; Playing XI मध्ये कोणाला संधी?, प्रत्येक घडामोडीचे LIVE अपडेट्स
PM Modi Independence Day speech: पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
पंतप्रधान मोदींनी मांडला सेमीकंडक्टर चीप, अणुउर्जेचा मास्टरप्लॅन, पुढच्या 10 वर्षात काय करणार?
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींना लागणार लॉटरी; नोकरीत मिळणार प्रमोशनची संधी? वाचा लकी राशी
Nana Patekar on Independence Day: आपल्याला स्वातंत्र्य खूप सहजपणे मिळाल्याने त्याची जाणीव नाही: नाना पाटेकर
आपल्याला स्वातंत्र्य खूप सहजपणे मिळाल्याने त्याची जाणीव नाही: नाना पाटेकर
Indonesia Earthquake: इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
इंडोनेशियात 7.7 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा अलर्ट, नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आदेश
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
फाळणीच्या भयावह वास्तवाची कहाणी सांगणारे हे चित्रपट- सीरिज; ‘बटवारा 1947’ पाहण्याआधी नक्की पाहा हे 5 मास्टरपीस
Embed widget