एक्स्प्लोर

Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 

Investment Tips : गुंतवणूक सुरु केल्यानंतर अनेकांना लगेचच श्रीमंत व्हायचं असतं किंवा कमी वेळात जास्त पैसे कमवायचे असतात. राकेश झुनझुनवाला यांचं गुंतवणुकीचं तंत्र फायदेशीर ठरु शकतं. 

नवी दिल्ली: भारतात गेल्या काही वर्षांमध्ये शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गुंतवणक सुरु केल्यानंतर कमी काळात अधिक परतावा मिळावा अशी अनेकांची अपेक्षा असते. गुंतवणूक करत असताना राकेश झुनझुनवाला यांचे गुंतवणुकीचे 10 मंत्र गुंतवणूकदारांसाठी फायदेशीर ठरू शकतात.  राकेश झुनझुनवाला यांचा आज स्मृतिदिन आहे. 14 ऑगस्ट 2022 ला  ह्रदयविकाराच्या धक्क्यानं राकेश झुनझुनवाला यांचा मृत्यू झाला.  

राकेश झुनझुनवाला यांचे गुंतवणुकीचे 10 मंत्र

गुंतवणुकीत धैर्य आवश्यक 

गुंतवणूक करताना अधिक कमाई करण्यासाठी धैर्य ठेवणं आवश्यक असतं. शेअरच्या किमतीमध्ये चढ उतार होत असतात. गुंतवणूकदारांनी दररोजच्या तेजी आणि घसरणीपेक्षा दीर्घकालीन परताव्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. 


गुंतवणुकीसाठी बॉटमची वाट पाहू नये

राकेश झुनझुनवालांच्या मते गुंतवणुकीसाठी प्रत्येक वेळ योग्य असते. काही गुंतवणूकदार गुंतवणूक करण्यासाठी मार्केटच्या बॉटमची वाट पाहतात. 


गुंतवणूक करण्यापूर्वी मूल्य पाहा

काही गुंतवणूकदार शेअर बाजारात गुंतवणूक करत असताना ज्या शेअरच्या किमतीत वेगानं वाढ होत असते त्यात गुंतवणूक करत असतात. झुनझुनवालांच्या मते कोणत्याही शेअरमध्ये हाय वॅल्यूएशनवर गुंतवणूक करणं समजूतदारपणाचं नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदारानं तो ज्या किमतीला शेअर खरेदी करतोय ती योग्य आहे की नाही याचा विचार केला पाहिजे. 

जोखीम आणि गुंतवणुकीचं नातं

झुनझुनवाला यांच्या मते शेअरमध्ये गुंतवणूक करुन पैसे कमवायचे असल्यास जोखीम स्वीकारावी लागते. जर तुम्ही शेअरमध्ये गुंतवणूक करत असाल तर तोटा सहन करण्यास तयार असलं पाहिजे. गुंतवणुकीपूर्वी तो किती जोखीम स्वीकारु शकतो हे गुंतवणूकदाराला माहिती असणं आवश्यक आहे. क्षमतेपेक्षा अधिक जोखीम घेणं धोकादायक ठरु शकतं, असं मत राकेश झुनझुनवाला यांचं होतं. 


चुकांमधून शिकणं आवश्यक 

गुंतवणूक करताना चूक होणं स्वाभाविक असतं. राकेश झुनझुनवालांच्या मते ज्याच्याकडून चूक झालेली नाही असा गुंतवणूकदार सापडणार नाही. चुकांमधून शिकलं पाहिजे, एकदा केलेली चूक दुसऱ्यांदा करु नये. पैसे बुडाल्यास गुंतवणूकदार अडचणीत सापडू शकतात. 

कमी वेळात अधिक कमाईचा विचार करु नये

शेअर मार्केट गुंतवणुकीतून खूप पैसे उभे केले जाऊ शकतात. मात्र, ते एका दिवसात होणार नाही. शेअर मार्केटमधून कमी वेळात अधिक पैसे कमावण्याची अपेक्षा गुंतवणूकदारांना अडचणीत आणू शकते. काही महिन्यात किंवा काही वर्षात पैसे दुप्पट करण्याचं लक्ष्य ठेवत शेअरमध्ये गुंतवणूक केली जाऊ शकत नाही. 

मार्केट आणि गुंतवणुकीबाबत अभ्यास वाढवा

शेअरमध्ये गुंतवणूक करताना ज्ञान असणं आवस्यक आहे. तुमचं ज्ञान जितकं अधिक असेल त्यानुसार गुंतवणुकीबाबत निर्णय घेणं सोपं ठरेल. फायनान्शिअल स्टेटमेंट, वॅल्यूएशन, पीई रेशो, बुक वॅल्यू यासारख्या गोष्टी गुंतवणूकदारांना माहिती असं आवश्यक आहे. 

शेअरच्या किमतीचा सन्मान 

राकेश झुनझुनवालांच्या मते शेअरची किंमत सर्वात महत्त्वाची असते तुम्ही ज्या किमतीला शेअर खरेदी करत असता ती फार महत्त्वाची ठरते. तुम्ही जादा दराला शेअर खरेदी करत असाल तर अधिक परताव्यासाठी दीर्घकाळ वाट पाहावी लागू शकते. 

दुसरे विक्री करत असताना खरेदी करावी

जेव्हा शेअर बाजारात खरेदी सुरु असते तेव्हा शेअर खरेदी करण्याकडे गुंतवणूकदारांचा कल असतो. मात्र, ज्यावेळी बाजारात घसरण सुरु असते तेव्हा गुंतवणूकदार शेअर विक्री करत असतात. मात्र, बाजारात तेजी असते तेव्हा शेअरची किंमत वाढते, अशा वेळी गुंतवणूक केल्यानं अधिक परतावा मिळण्याची शक्यता कमी होते.  झुनझुनवालांच्या मते जेव्हा इतर लोक विक्री करत असतात तेव्हा तुम्हाला खरेदी करता येणं आवश्यक आहे.
 

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

LPG Refill Booking : ग्रामीण भागातील एलपीजी ग्राहकांना दिलासा, गॅस सिलेंडर बुकिंगच्या 45 दिवसांच्या नियमात बदल, नवी अपडेट जाणून घ्या
ग्रामीण भागातील एलपीजी ग्राहकांना दिलासा, गॅस सिलेंडर बुकिंगच्या 45 दिवसांच्या नियमात बदल, नवी अपडेट जाणून घ्या
Gold Silver Price: सोने-चांदीचे दर अवघ्या एका महिन्यात भिडले गगनाला; तब्बल 'इतक्या' हजारांची झाली वाढ; जाणून घ्या कारणं अन् पुढील काळात बाजारात कशी असेल परिस्थिती
सोने-चांदीचे दर अवघ्या एका महिन्यात भिडले गगनाला; तब्बल 'इतक्या' हजारांची झाली वाढ; जाणून घ्या कारणं अन् पुढील काळात बाजारात कशी असेल परिस्थिती
SBI Recruitment: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरतीची तयारी सुरु, वर्षभरात 12 हजार नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती होणार, बँकेत सध्या किती कर्मचारी?
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये भरतीची तयारी सुरु, वर्षभरात 12 हजार नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती होणार
Bank of Baroda : गुड न्यूज, बँक ऑफ बडोदामध्ये 1100 जागांवर भरती, 67 हजारांपासून पगार सुरु 
गुड न्यूज, बँक ऑफ बडोदामध्ये 1100 जागांवर भरती, 67 हजारांपासून पगार सुरु 
Advertisement

व्हिडीओ

Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report
Rahul Gandhi on MPSC : MPSC वर भाजपचा ताबा? Special Report
OBC Vs Maratha : 2 सप्टेंबरचा GR रद्द करा, मनोज जरांगेंच्या अंतरवालीत ओबीसी आक्रमक
Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmveer Gad : 'धर्मवीर गड' आता राज्य संरक्षित स्मारक घोषित, याच ठिकाणी छत्रपती संभाजीराजेंना छळलं, पराक्रमाच्या स्मृतींचे संवर्धन होणार
'धर्मवीर गड' आता राज्य संरक्षित स्मारक घोषित, याच ठिकाणी छत्रपती संभाजीराजेंना छळलं, पराक्रमाच्या स्मृतींचे संवर्धन होणार
LPG Refill Booking : ग्रामीण एलपीजी ग्राहकांना दिलासा, गॅस सिलेंडर बुकिंगच्या 45 दिवसांच्या नियमात बदल, नवी अपडेट जाणून घ्या
ग्रामीण एलपीजी ग्राहकांना दिलासा, गॅस सिलेंडर बुकिंगच्या 45 दिवसांच्या नियमात बदल, नवी अपडेट जाणून घ्या
Radha Patil: नृत्यांगणा राधा पाटीलसह तिघांवर गुन्हा; पुण्यातील दहीहंडी कार्यक्रम अंगलट; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
नृत्यांगणा राधा पाटीलसह तिघांवर गुन्हा; पुण्यातील दहीहंडी कार्यक्रम अंगलट; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
IAS दिव्या मित्तल यांचा तडकाफडकी राजीनामा ताजा असतानाच आता आणखी एका महिला IAS अधिकाऱ्याने मनातील सल बोलून दाखवली; म्हणाल्या, 'आता फक्त 50 दिवसात, वर्षात चारवेळा ट्रान्सफर अन्..'
IAS दिव्या मित्तल यांचा तडकाफडकी राजीनामा ताजा असतानाच आता आणखी एका महिला IAS अधिकाऱ्याने मनातील सल बोलून दाखवली; म्हणाल्या, 'आता फक्त 50 दिवसात, वर्षात चारवेळा ट्रान्सफर अन्..'
मोठी बातमी! महापौर रितू तावडेंची घोषणा; ठाकरेंच्या शिवसेनेतील विशाखा राऊतांचे नगरसेवकपद रद्द
मोठी बातमी! महापौर रितू तावडेंची घोषणा; ठाकरेंच्या शिवसेनेतील विशाखा राऊतांचे नगरसेवकपद रद्द
Gold Silver Price: सोने-चांदीचे दर अवघ्या एका महिन्यात भिडले गगनाला; तब्बल 'इतक्या' हजारांची झाली वाढ; जाणून घ्या कारणं अन् पुढील काळात बाजारात कशी असेल परिस्थिती
सोने-चांदीचे दर अवघ्या एका महिन्यात भिडले गगनाला; तब्बल 'इतक्या' हजारांची झाली वाढ; जाणून घ्या कारणं अन् पुढील काळात बाजारात कशी असेल परिस्थिती
विशाखा राऊतांचे पद रद्द, मुंबईत 79 नगरसेवकांच्या निवडीला न्यायालयात आव्हान, सर्वाधिक नगरसेवक ठाकरेंच्या शिवसेनेचे
विशाखा राऊतांचे पद रद्द, मुंबईत 79 नगरसेवकांच्या निवडीला न्यायालयात आव्हान, सर्वाधिक नगरसेवक ठाकरेंच्या शिवसेनेचे
रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन घरी, पुन्हा जाणवला त्रास; शासकीय रुग्णालयात पती-पत्नीचा मृत्यू, परिसरात हळहळ
रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन घरी, पुन्हा जाणवला त्रास; शासकीय रुग्णालयात पती-पत्नीचा मृत्यू, परिसरात हळहळ
Embed widget