एक्स्प्लोर

7th Pay Commission: EPFO ने व्याज दर वाढवले, केंद्र सरकार देणार आणखी एक 'गुड न्यूज'

7th Pay Commission: मोदी सरकार 2024 च्या पहिल्या सहामाहीसाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांना DA वाढीची भेट देऊ शकतं. पुढील महिन्यात मार्चमध्ये महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ अपेक्षित आहे. असे झाल्यास डीए 46 टक्क्यांवरून 50 टक्के होईल.

7th Pay Commission: पीएफ खातेधारकांना (PF Account Holder) मोठं गिफ्ट देत, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं (Employees Provident Fund Organisation) शनिवारी व्याजदरात मोठी वाढ करण्याची घोषणा केलेली. त्या घोषणेनुसार, पीएफच्या व्याजदर (PF Interest Rate) 8.25 टक्के करण्यात आला आहे. यंदाचं वर्ष निवडणूक वर्ष आहे, या वर्षात पीएफवरील व्याज वाढ झाल्यानंतर आता सरकार महागाई भत्त्यात (DA Hike) वाढीची घोषणा कधी होणार याची अनेकजण वाट पाहत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकार मार्च 2024 मध्ये महागाई भत्त्याबाबत मोठा निर्णय घेऊ शकतं. असं झालं तर केंद्रीय कर्मचाऱ्यांची चांदी असेल, कारण त्यांना येणारा महागाई भत्ता तब्बल 50 टक्के होईल. 

पीएफवरील व्याज वाढलं, डीएची अपेक्षा वाढली

EPFO च्या केंद्रीय विश्वस्त मंडळानं (CBT) 2023-24 या आर्थिक वर्षासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) खात्यासाठी नवा व्याजदर जाहीर केला आहे. EPFO नं देशातील 7 कोटी कर्मचाऱ्यांना भेट दिली असून व्याजदरात वाढ करुन 8.25 टक्के केला आहे. पीटीआयनुसार, पीएफ खातेधारकांना आता पूर्वीपेक्षा 0.10 टक्के जास्त व्याज मिळणार आहे. गेल्या वर्षी 28 मार्च रोजी EPFO ​नं 2022-23 साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) खात्यांसाठी 8.15 टक्के व्याजदर जाहीर केला होता. पीएफ व्याजदरात वाढ झाल्यानं केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्येही डीए वाढीची अपेक्षा वाढली आहे.

मार्चमध्ये 4 टक्क्यांच्या महागाई भत्त्याची अपेक्षा

सरकार कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वर्षातून दोनदा वाढवतं आणि जानेवारी-जून सहामाहीसाठी महागाई भत्ता मार्च 2024 मध्ये जाहीर होण्याची अपेक्षा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यावेळी सरकार निवडणुकीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना 4 टक्के महागाई भत्त्याची घोषणा करू शकते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारकडून लवकरच यासंदर्भात घोषणेची शक्यता आहे. 

दरम्यान, लवकरच केंद्र सरकार कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्याची घोषणा करणार असल्याचं बोललं जात आहे. परंतु, सरकारकडून अद्याप यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होणार आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्के आहे, केंद्र सरकारनं जर महागाई भत्त्यात वाढ केली, तर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढून 50 टक्के होऊ शकतो. 

महत्त्वाच्या बातम्या

Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget