एक्स्प्लोर

ITR Filing Process: फक्त पाचच मिनिटं काढा अन् ITR फाईल करा; स्टेप बाय स्टेप संपूर्ण प्रोसेस जाणून घ्या

ITR Filing Process: आज-आज, उद्या-उद्या करत करत 31 जुलै जवळ येईल आणि आयटीआर भरण्यासाठी घाईगडबड होईल. त्यामुळे वेळत आयटीआर भरा, संपूर्ण प्रोसेस जाणून घ्या...

ITR Filing Process: आर्थिक वर्ष 2022-23 आणि मूल्यांकन वर्ष 2023-24 (Assessment Year) साठी ITR दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2023 आहे. विभागानं आयटीआर भरण्यासाठी ऑनलाईन फॉर्म (Online Form) जारी केला आहे. अशा परिस्थितीत 31 जुलैपर्यंत वेळ आहे, असं समजून आयटीआर दाखल करण्यास अजिबात उशीर करू नका. आज-आज, उद्या-उद्या करत करत 31 जुलै जवळ येईल आणि आयटीआर भरण्यासाठी घाईगडबड होईल. त्यामुळे वेळत आयटीआर भरा. आयटीआर भरणं तसं फारसं अवघड नाही. तुम्ही अगदी सोप्या पद्धतीनं झटपट केवळ पाच मिनिटांतच आयटीआर भरू शकता. कसं ते जाणून घ्या...   

आयटीआर भरण्यासाठी 'हे' करणं अत्यंत महत्वाचं...

जरी तुम्ही कराच्या कक्षेत येत नसाल, तरीही तुम्ही आयटीआर भरला पाहिजे. दरम्यान, नोकरदार वर्गाला त्यांच्या कंपनीकडून आयटीआर फाईल करण्यासाठी फॉर्म-16 उपलब्ध करून दिला जातो. अशातच, ITR दाखल करण्यापूर्वी, फॉर्म-16 आणि एन्युअल इन्फॉरमेशन स्टेटमेंट (AIS) मध्ये दिलेला डेटा एकमेकांशी जुळवून पाहा. यामुळे प्राप्तिकर विभागाला दिलेला डेटा बरोबर आहे, याची खात्री करता येईल.

फॉर्म-16 मध्ये उत्पन्नाचा तपशील, तसेच कर कपातीचाही उल्लेख असतो. याआधारावर करदाते क्लेम करु शकतात. कर्मचाऱ्यांनी फॉर्म 16 मधील अनेक बाबी तपासणं गरजेचं असतं. तुमच्या पगारातील तपशीलांशी हे तपशील जुळतात का? हे पाहवं. टॅक्स रिटर्न आणि AIS मध्ये दिलेल्या तपशिलांमध्ये फरक नसावा, अन्यथा करदात्याला नोटीस मिळू शकते.

दरम्यान, अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी 2023 चा अर्थसंकल्प सादर करताना नव्या कर प्रणाली अंतर्गत करदात्यांना दिलासा दिला. मात्र, सरकारनं जुन्या करप्रणालीत कोणताही बदल केलेला नाही.

तुम्ही घरी बसून ITR कसा फाईल करू शकता, कसा ते जाणून घेऊयात... 

  • आयकर विभागाचं ई-फायलिंग पोर्टल (https://eportal.incometax.gov.in/) वर जा. 
  • त्यानंतर होमपेजवर तुमचा युजर ID आणि पासवर्ड टाकून लॉग-इन करा. 
  • डॅशबोर्डवर ई-फाईल > आयकर रिटर्न > 'आयकर रिटर्न सबमिट करा' वर क्लिक करा. 
  • त्यानंतर एसेसमेंट ईयर (Assessment Year) वर क्लिक करा, जसं की, 2023-2024 आणि 'कंटीन्यू'वर क्लिक करा. 
  • आता आयटीआर फाईल करण्याची पद्धत निवडा आणि ऑनलाईन ऑप्शन निवडा. 
  • आता तुम्ही तुमचं कर उत्पन्न (Tax Income) आणि TDS कॅलक्युलेशनच्या हिशोबानं तुमचा ITR फॉर्म निवडा. 
  • आयटीआर फॉर्म निवडल्यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रं एकत्र करा आणि स्टार्ट ऑप्शनवर क्लिक करा. 
  • आता स्क्रिनवर काही प्रश्न येतील, त्यांच्या चेकबॉक्सवर मार्क करुन कंटीन्यूवर क्लिक करा. 
  • कागदपत्रांनुसार, तुमचं उत्पन्न आणि कपातीचा तपशील वेगवेगळ्या विभागांमध्ये भरा. 
  • जर टॅक्सलायबिलिटीचं प्रकरण असल्यास, तुमच्या तपशीलांवर आधारित टॅक्स-कॅलक्युलेशन दिसेल.  
  • कॅलक्युलेशनच्या हिशोबानं टॅक्सलायबिलिटी असते, त्यानंतर 'आता पैसे भरा' आणि 'नंतर पैसे भरा' हे पर्याय निवडू शकता. 
  • जर कोणतीही टॅक्सलायबिलिटी नसेल, तर पुन्हा टॅक्स भरल्यानंतर 'प्रीव्यू रिटर्न' वर क्लिक करावं लागेल. 
  • त्यानंतर 'प्रिव्यू आणि रिटर्न जमा करा' डिक्लेरेशन चेकबॉक्सवर क्लिक करुन 'वॅलिडेशनसाठी पुढे जा' हा पर्याय निवडा. 
  • प्रीव्यू पाहा आणि 'रिटर्न जमा करा' पेजवर, व्हेरिफायसाठी पुढे जा. रिटर्नची पडताळणी आणि ई-व्हेरिफाय करणं बंधनकारक आहे.
  • ई-व्हेरिफाय पेजवर ज्या पर्यायावर क्लिक करा, ज्याचं ई-व्हेरिफिकेशन करायंच आहे, त्यावर क्लिक करा आणि 'कंटीन्यू' वर क्लिक करा. 
  • एकदा का तुम्ही रिटर्नवर ई-व्हेरिफाय केलंत की, तुम्हाला तुम्ही फॉर्म यशस्वीरित्या भरल्याची सूचना तुमच्या स्क्रिनवर दिसेल. 
  • ट्रान्झॅक्शन ID आणि एक्नॉलेजमेंट नंबर स्क्रिनवर मिळेल, ज्यामुळे तुम्ही भविष्यात आपल्या ITR फॉर्मचं स्टेटस चेक करु शकता. 
  • ई-फायलिंग पोर्टलवर तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी रजिस्टर्ड आहे, फॉर्म यशस्वीरित्या भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मेसेज येईल. 

स्वतःच निवडा नवी किंवा जुनी कर प्रणाली 

आयटीआर भरताना, लक्षात ठेवा की, यावेळी नवी कर प्रणाली डिफॉल्टमध्ये ठेवण्यात आली आहे. जर तुम्हाला जुन्या कर प्रणाली अंतर्गत आयटीआर फाईल करायचा असेल, तर तुम्हाला तो पर्याय स्वतःच निवडावा लागेल. नव्या कर प्रणालीमध्ये कर सूट मिळविण्यासाठी खूप मर्यादित पर्याय आहेत. दरम्यान, 7 लाखांपर्यंतचं उत्पन्न प्रभावीपणे करमुक्त करण्यात आलं आहे. तसेच, जुन्या कर प्रणालीमध्ये कर सूट मर्यादा वाढविण्यात आलेली नाही. परंतु तिथे तुम्ही विविध सरकारी योजनांमध्ये आणि इतर मार्गांनी गुंतवणूक करून कर सवलतीचा दावा करू शकता.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

TDS vs TCS: टीसीएस आणि टीडीएस मध्ये फरक काय? ITR फाईल करण्यापूर्वी जाणून घ्या संपूर्ण माहिती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget