कमाईची आणखी एक संधी; सोलर पॅनल मॉड्यूल्स बनवणाऱ्या मोठ्या कंपनीचं आयपीओचं कामकाज पूर्ण
विक्रम सोलर ( Vikram Solar) ही देशातील आघाडीची सोलर मॉड्युल उत्पादक कंपनी आहे. ही कंपनी सौर फोटोव्होल्टाइक (पी व्ही) मॉड्यूल तयार करते
Vikram Solar IPO : सोलर फोटो-व्होल्टेइक पॅनेल निर्माता विक्रम सोलरने (Vikram Solar) बाजार नियामक सेबीकडे आयपीओ कागदपत्रे सादर केली आहेत. कंपनीने एका निवेदनात ही माहिती दिली. आयपीओ अंतर्गत 1,500 कोटी रुपयांचे नवीन शेअर जारी करण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त, कंपनीचे विद्यमान भागधारक 50,00,000 इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल (OFS) आणतील. जेएम फायनान्शियल आणि कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी या इश्यूसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर असल्याची माहिती विक्रम सोलरच्या कंपनी प्रशासनाने दिली आहे.
यूएसएमध्ये विक्री कार्यालय
विक्रम सोलर ही देशातील आघाडीची सोलर मॉड्युल उत्पादक कंपनी आहे. ही कंपनी सौर फोटोव्होल्टाइक (पी व्ही) मॉड्यूल तयार करते. कंपनीचं अमेरिकेत विक्री कार्यालयं आहे तर चीनमध्ये खरेदी कार्यालय आहे. कंपनीने 31 डिसेंबर 2021 पर्यंत 32 देशांतील ग्राहकांना पी व्ही मॉड्यूल्सचा पुरवठा केला आहे.
कंपनीच्या भारतातील ग्राहकांमध्ये NTPC, Rays Power Infra, & Energy India, Solar Energy Corporation of India आणि Hindustan Petroleum Corporation Ltd यांचा समावेश आहे. कंपनीचे शेअर्स BSE आणि NSE वर लिस्ट केले जातील.
कंपनीचे भारतातील आणि बाहेरील ग्राहक
भारतात ग्राहकांमध्ये नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन (NTPC), रेज पॉवर इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड, एम्प एनर्जी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, अझुर पॉवर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, पश्चिम बंगाल स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन कंपनी लिमिटेड, सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, पश्चिम बंगाल पॉवर डेव्हलपमेंट यांचा समावेश आहे. , हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, केव्हेंटर अॅग्रो लिमिटेड हे ही यांचे ग्राहक आहेत
आंतरराष्ट्रीय ग्राहकांमध्ये Amp Solar Development Inc. (2019 पासूनचे ग्राहक), Safari Energy LLC, Standard Solar Inc. आणि Southern Current यांचा समावेश आहे.
संबंधित बातम्या :
New IPO : कृष्णा डिफेन्सचा आयपीओ लवकरच; तारीख, लॉट आणि किंमत जाणून घ्या सविस्तर
LIC IPO : एलआयसी आयपीओबाबत मोठी अपडेट, सेबीच्या मजूरीनंतरही सरकारने उचलले महत्त्वाचे पाऊल
हायड्रोकार्बन पाइपलाइन टाकणाऱ्या 'या' कंपनीचा आयपीओ लवकरच, जाणून घ्या कंपनीची माहिती
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha