एक्स्प्लोर

Mukesh Ambani : अंबानींची मोठी घोषणा; Jio आणि रिलायन्स रिटेलसाठी आयपीओची तयारी 

Jio, Reliance Retail IPO : रिलायन्सही आता आयपीओ आणण्याच्या तयारीत असून या वर्षाच्या अखेरपर्यंत त्याचे लॉन्चिंग केलं जाणार असल्याची माहिती आहे.

मुंबई: जिओ 5G ची घोषणा केल्यानंतर आता मुकेश अंबानी (Mukesh Ambani) लवकरच जिओचा आयपीओ आणण्याच्या तयारीत असल्याची बातमी एका अहवालानुसार हाती आली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेल व्हेंचर्ससाठी प्रारंभिक सार्वजनिक ऑफरिंग अर्थात आयपीओ लॉन्च करण्याच्या तयारीत आहेत. कंपनीच्या पुढील वार्षिक सर्वसाधारण सभेत उद्योगपती मुकेश अंबानी याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

अंबानींच्या योजनेत त्यांची दूरसंचार फर्म रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म (RJPL) आणि RIL उपकंपनी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (RRVL) साठी स्वतंत्र आयपीओ समाविष्ट आहेत. हिंदू बिझनेस लाइनच्या अहवालानुसार, या दोन्ही कंपन्यांच्या आयपीओच्या माध्यमातून अंबानी प्रत्येकी 50,000 कोटी ते 75,000 कोटी रुपयांची मोठी रक्कम उभारण्याचा विचार करतील.

जर हे आकडे गाठले गेले तर या दोन्ही सार्वजनिक ऑफर भारतातील आतापर्यंतचे सर्वात मोठे आयपीओ असतील. रिलायन्स जिओचा स्टॉक यूएस स्टॉक मार्केट Nasdaq वर देखील सूचीबद्ध केला जाऊ शकतो, जो टेक दिग्गजांसाठी जगातील सर्वात मोठा शेअर बाजार आहे.

रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडचे शेअर्स सूचीबद्ध झाल्यानंतर रिलायन्स जिओचा आयपीओ लॉन्च केला जाऊ शकतो. हे डिसेंबर 2022 मध्ये होण्याची शक्यता आहे.

आत्तापर्यंत, 2021 मधील Paytm IPO हा भारतातील रु. 18,300 कोटींचा सर्वात मोठा आयपीओ ठरला आहे. तर दुसरा सर्वात मोठा आयपीओ 2010 मध्ये कोल इंडियाचा ठरला होतो ज्याची रक्कम सुमारे 15,500 कोटी रुपये होती आणि तिसरा सर्वात मोठी रिलायन्स पॉवर 2008 मध्ये 11,700 कोटी रुपये आहे.

दरम्यान एलआयसी आयपीओ मागील सर्व विक्रमांना मागे टाकेल आणि देशाच्या इतिहासातील सर्वात मोठी सार्वजनिक ऑफर बनेल अशी गुंतवणुकदार आणि तज्ज्ञांना अपेक्षा आहे. एलआयसी आयपीओ 4 मे रोजी उघडेल दरम्यान LIC आयपीओद्वारे सरकारला सुमारे 21,000 कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO

मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत

''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''

शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEOZero Hour Seg Full : ठाकरे निमित्त, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निशाणा महायुतीवरचRaj Thackeray Full Speech : अटक, मटक चवळी चटक...जुनी आठवण सांगतं स्फोटक भाषण ABP MajhaSpecial Report Ramtek Constituency : रामटेक मतदारसंघात ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
Shrikant Shinde Sada Sarvankar : श्रीकांत शिंदे सदा सरवणकरांच्या मंचावर येताच काय घडलं? FULL VIDEO
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले

स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली

लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले

त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा

Embed widget