search
×

LIC IPO: ठरलं! 'या' दिवशी LIC होणार शेअर बाजारात सूचीबद्ध

LIC IPO Updates : सध्या एलआयसीच्या आयपीओची जोरदार चर्चा सुरू आहे. शेअर बाजारात पुढील महिन्यात एलआयसीची लिस्टिंग होणार आहे.

FOLLOW US: 
Share:

LIC IPO Updates : एलआयसी आयपीओबाबत बुधवारी अधिकृतपणे माहिती देण्यात आली. एलआयसीचा आयपीओ 4 मे रोजी खुला होणार आहे. एलआयसी पॉलिसीधारक आणि कर्मचाऱ्यांसाठी विशेष सवलतही देण्यात आली आहे. एलआयसीची शेअर बाजारात लिस्टिंग (सूचीबद्ध) कधी होणार याचीही माहिती समोर आली आहे. 

एलआयसीचा आयपीओ 4 मे रोजी खुला होणार आहे. तर, 9 मेपर्यंत गुंतवणुकदारांना आयपीओसाठी अर्ज करावे लागणार आहे. 9 मे रोजी सोमवार आहे. त्यानंतर पुढील तीन दिवस कंपनी आयपीओसाठी आलेल्या बोलींची पडताळणी करतील. त्यानंतर शुक्रवारी 13 मे रोजी एलआयसी शेअर अलॉटमेंट करण्याची शक्यता आहे. शनिवारी आणि रविवारी शेअर अलॉटमेंट होणार नाही. 

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, एलआयसीचे शेअर मिळालेल्या गुंतवणूकदारांना 16 मेपर्यंत डिमॅट खात्यात शेअर जमा होतील. सरकार एलआयसीचे 21.13 कोटी शेअर विक्री करत आहे. 

एलआयसी शेअर बाजारात 17 मेपर्यंत लिस्ट होण्याची शक्यता आहे. त्यानंतर यामध्ये ट्रेडिंग सुरू होईल. एलआयसीच्या आयपीओत प्रति शेअर 902 रुपये ते 949 रुपये प्रति शेअर इतकी किंमत ठरवण्यात आली आहे. आयपीओच्या एका लॉटमध्ये 15 शेअर असणार आहेत.  

केंद्र सरकार एलआयसीचा 3.5 टक्के हिस्सा बाजारात विक्री करणार असून त्या माध्यमातून 21 हजार कोटी रुपये उभा करणार आहे. एलआयसीच्या पॉलिसीधारकांना आयपीओ किंमतीवर प्रति समभाग 60 रुपये किंवा 6 टक्क्यांची सूट मिळणार आहे. तर, कर्मचारी, रिटेल गुंतवणूकदारांना प्रति समभाग जवळपास ५ टक्के किंवा ४५ रुपयांची सवलत मिळणार आहे.  

दरम्यान, DIPAM चे सचिव तुहीनकांता पांडे यांनी सांगितले की, सरकारकडून एलआयसीचा भागविक्री बाजारात आणण्यासाठी मोठे प्रयत्न करण्यात आले. एलआयसीचा हा शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठा आयपीओ आहे.  एलआयसीचा आयपीओ ही सुरुवात असून गुंतवणुकदारांसाठी ही मोठी संधी असल्याचे त्यांनी सांगितले. गुंतवणुकीसाठी एलआयसी प्रयत्न करत होती. आता एलआयसी स्वतः गुंतवणूकदारांसाठी एक संधी निर्माण होते असल्याचे त्यांनी सांगितले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

Published at : 28 Apr 2022 10:56 AM (IST) Tags: bse nse lic LIC IPO LIC IPO news

आणखी महत्वाच्या बातम्या

पैसे घेऊन तयार राहा, आता आला 'हा' नवा आयपीओ, देणार तगडे रिटर्न्स!

पैसे घेऊन तयार राहा, आता आला 'हा' नवा आयपीओ, देणार तगडे रिटर्न्स!

Traditional And Unified KYC : पारंपरिक आणि युनिफाईड केवायसीमध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या...

Traditional And Unified KYC : पारंपरिक आणि युनिफाईड केवायसीमध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या...

Adani Group IPO : गुंतवणूकदारांना मोठी संधी! अदानी समूहातील आणखी एका कंपनीचा IPO येणार

Adani Group IPO : गुंतवणूकदारांना मोठी संधी! अदानी समूहातील आणखी एका कंपनीचा IPO येणार

Tata IPO : गुंतवणूकदारांनो पैसे तयार ठेवा! टाटा समूहातील आणखी एका कंपनीचा आयपीओ येणार

Tata IPO :  गुंतवणूकदारांनो पैसे तयार ठेवा! टाटा समूहातील आणखी एका कंपनीचा आयपीओ येणार

सचिन तेंडुलकरला 'या' आयपीओनं केलं मालामाल, तब्बल 360 टक्के रिटर्न, 5 कोटींचे झाले 23 कोटी

सचिन तेंडुलकरला 'या' आयपीओनं केलं मालामाल, तब्बल 360 टक्के रिटर्न, 5 कोटींचे झाले 23 कोटी

टॉप न्यूज़

Mirzapur Season 3 Review : गुड्डू पंडितची सीरिजवर छाप, कसा आहे मिर्झापूरचा तिसरा सीझन? वाचा रिव्ह्यू

Mirzapur Season 3 Review :   गुड्डू पंडितची सीरिजवर छाप, कसा आहे मिर्झापूरचा तिसरा सीझन? वाचा रिव्ह्यू

Virat Kohli: वानखेडेवरील जल्लोषानंतर विराट मुंबई विमानतळावर पोहोचला,कोहली अचानक लंडनला रवाना? पाहा व्हिडीओ 

Virat Kohli: वानखेडेवरील जल्लोषानंतर विराट मुंबई विमानतळावर पोहोचला,कोहली अचानक लंडनला रवाना? पाहा व्हिडीओ 

विधान परिषद निवडणुकीत मविआचा कोणता उमेदवार पाडायचा हे आम्ही ठरवू, उदय सामंतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

विधान परिषद निवडणुकीत मविआचा कोणता उमेदवार पाडायचा हे आम्ही ठरवू, उदय सामंतांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Mirzapur 3 Online Leaked : 'मिर्झापूर'च्या निर्मात्यांना धक्का; रिलीजच्या काही तासांतच सगळेच एपिसोड ऑनलाईन लीक

Mirzapur 3  Online Leaked :   'मिर्झापूर'च्या निर्मात्यांना धक्का; रिलीजच्या काही तासांतच सगळेच एपिसोड ऑनलाईन लीक