(Source: ECI/ABP News/ABP Majha)
म्युच्युअल फंडसाठी प्रसिद्ध असणाऱ्या या कंपनीचा IPO येणार; 2,400 कोटी रुपयांच्या आयपीओला मंजुरी
KFin Technologies कंपनीला या आयपीओच्या माध्यमातून 2400 कोटी रुपये उभे करायचे आहेत.
मुंबई: वित्तीय सेवा प्लॅटफॉर्म KFin Technologies कंपनी आपला आयपीओ (KFin Technologies IPO) बाजारात आणणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. या कंपनीच्या आयपीओला बाजार नियामक सेबीची (SEBI) मंजुरी मिळाली आहे. कंपनीला या आयपीओच्या माध्यमातून 2400 कोटी रुपये उभे करायचे आहेत. कंपनीने या वर्षी 31 मार्च रोजी सेबीकडे आयपीओ कागदपत्रे दाखल केली होती. ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) नुसार, हा आयपीओ पूर्णपणे ऑफर फॉर सेल (OFS) वर आधारित आहे. ऑपर फॉर सेलचा भाग म्हणून प्रवर्तक जनरल अटलांटिक सिंगापूर फंड Pte Ltd चे शेअर्स विकतील.
या आयपीओमधून कंपनीला कोणतेही उत्पन्न मिळणार नाही कारण ते सर्व प्रवर्तकाला विकणाऱ्या भागधारकाकडे जाईल. सेबीने केफिन टेक्नॉलॉजीजच्या (KFin Technologies) प्रारंभिक शेअर विक्रीला मान्यता दिली आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
आयपीओ संबंधित तपशील
केफिनची मालकी जनरल अटलांटिकद्वारे व्यवस्थापित केलेल्या निधीची आहे. कंपनीचा 74.94 टक्के हिस्सा आहे. गेल्या वर्षी कोटक महिंद्रा बँकेने कंपनीतील 9.98 टक्के भागभांडवल विकत घेतले होते. कंपनीचे शेअर्स बीएसई आणि एनएसईवर सूचिबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे. कंपनी भारतातील मालमत्ता वर्गांमध्ये मालमत्ता व्यवस्थापक आणि कॉर्पोरेट जारीकर्त्यांना सेवा प्रदान करते. हे मलेशिया, फिलीपिन्स आणि हाँगकाँगमधील म्युच्युअल फंड आणि खाजगी सेवानिवृत्ती योजनांसाठी व्यवहाराची उत्पत्ती आणि प्रक्रिया यासह निराकरणे देखील प्रदान करते.
कंपनीबद्दल विस्तृत माहिती
31 जानेवारी 2022 रोजी सेवा दिलेल्या अॅसेट मॅनेजमेंट कंपनी (AMC) ग्राहकांच्या संख्येनुसार KFin ही भारतीय म्युच्युअल फंडांसाठी देशातील सर्वात मोठी गुंतवणूकदार समाधान प्रदाता आहे. कंपनी भारतातील 42 AMC पैकी 25 ला सेवा पुरवते, जे 60 टक्के बाजाराचे प्रतिनिधित्व करते. डिसेंबरअखेर संपलेल्या नऊ महिन्यांसाठी, कॅफिनचा ऑपरेशन्समधून महसूल 458 कोटी रुपये आणि निव्वळ नफा 97.6 कोटी रुपये होता. कंपनीच्या महसुलात वार्षिक 35 टक्के आणि नफ्यात 313 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ICICI सिक्युरिटीज, कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी, जेपी मॉर्गन इंडिया, IIFL सिक्युरिटीज आणि जेफरीज इंडिया या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत.
ही बातमी देखील वाचा :