Investment Plan : चहा सोडा, करोडपती व्हा! नेमकं काय आहे गणित? सविस्तर माहिती एका क्लिकवर
तुम्हाला जर एखादी गोष्ट मिळवायची असेल किंवा काही साध्य करायंच असेल तर त्यांसाठी कष्ट करावे लागतात. काही गोष्टी टाळाव्या लागतात. तुम्ही दररोज दोन कप चहाचे पैसे वाचवून करोडपती होऊ शकता.
Investment Plan : असं म्हणतात की कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है, असं म्हटलं जातं. हे वाक्य अत्यंत खरं आहे. कारण, तुम्हाला जर एखादी गोष्ट मिळवायची असेल किंवा काही साध्य करायंच असेल तर त्यांसाठी कष्ट करावे लागतात. काही गोष्टी टाळाव्या लागतात. तुम्हाला जर श्रीमंत कोट्याधीश (Millionaire) व्हायचं असेल तर काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. गुंतवणुकीचं योग्य नियोजन करावं लागतं. आज आपण कोट्याधीश होण्याचा आणि चहाचा (Tea) काय संबंध आहे, याबाबतची माहिती पाहुयात.
प्रत्येकाला वाटते की करोडपती असावं. पण तुम्ही जर पैशाचं योग्य नियोजन केलं तर तुम्ही देखील करोडपती होऊ शकता. कमी गुंतवणूक करुन देखऱी पण तुम्हाला माहित आहे का की चहाचेही करोडपती होण्याशी कनेक्शन आहे. अनेक लोक दिवसातून एक किंवा दोन नव्हे तर चार पाच वेळा चहा पितात. पण तुम्ही जर फक्त दोन कप चहाचे पैसे दररोज वाचवले तर तुम्ही लवकरच करोडपती होऊ शकता. जर तुम्हालाही करोडपती व्हायचे असेल, तर योग्य गुंतवणूक धोरण, दृढनिश्चय आणि ध्येय आवश्यक आहे. तुम्हाला यात जास्त काही करण्याची गरज नाही, तुम्हाला फक्त दिवसातील दोन वेळचा चहा बंद करावा लागेल. यामुळं तुमचे आरोग्य तर चांगले राहीलच, पण तुमचे आर्थिक स्वास्थ्यही मजबूत होऊ शकते.
महिन्याला 600 रुपये वाचवा
अनेकजण दिवसाची सुरुवात चहाने करतात. दोन कप चहा विकत घेतला तर त्यावर किमान 20 रुपये खर्च होतात. फक्त हे 20 रुपये वाचवून तुम्ही करोडपती होऊ शकता. आता तुम्हाला एक खास सूत्रानुसार दिवसातून फक्त दोन कप चहा सोडून वाचवलेली रक्कम गुंतवावी लागेल. जर तुम्ही दररोज दोन चहासाठी पैसे वाचवले तर ही रक्कम महिन्याला 600 रुपये होते. ती योग्य ठिकाणी गुंतवून केली तर तुम्ही करोडपती होण्याच्या मार्गानं पुढे जाऊ शकता.
चहा सोडून कसे व्हाल करोडपती? काय आहे फॉर्म्युला?
तुम्ही म्युच्युअल फंडात दरमहा 600 रुपयांची एसआयपी करू शकता. हे लक्षात घेण्यासारखे आहे की SIP गुंतवणुकीमुळे दीर्घकालीन फायदे मिळतात. त्याचा परतावा 12 ते 18 टक्क्यांपर्यंतचा आहे. अशा परिस्थितीत ही गुंतवणूक जितक्या लवकर सुरू केली जाते तितकीच ती अधिक फायदेशीर ठरते. ही गुंतवणूक जर 20 वर्षांच्या तरुणाने एका महिन्यात दोन चहाचे पैसे वाचवून 600 रुपये वाचवले आणि ते म्युच्युअल फंडात SIP मध्ये गुंतवले. तर ही गुंतवणूक 480 महिने किंवा 40 वर्षे सातत्याने केली तर एकूण 2,88,000 रुपये जमा होतील. चक्रवाढ लाभासोबत, जर तुम्हाला या कालावधीत 15 टक्के परतावा मिळाला, तर तुम्हाला या रकमेवर 1,85,54,253 रुपये व्याज मिळेल. यामध्ये तुम्हाला एकूण रक्कम ही 1,88,42,253 रुपये मिळेल. जर समजा तुमच्या ठेवीवर 18 टक्के परतावा मिळाला तर ,चक्रवाढीने मिळणारे व्याज हे 5,12,21,120 असणार आहे. म्हणजे एकूण निधीहा 5.15 कोटींपेक्षा जास्त मिळेल.
छोटीशी गुंतवणूकही दीर्घ मुदतीसाठी मोठा फंड होऊ शकते
दरम्यान, म्युच्युअल फंडातील एसआयपीमध्ये केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरते. कारण यामध्ये चक्रवाढ व्याज मिळते. तुम्ही केलेली छोटीशी गुंतवणूकही दीर्घ मुदतीसाठी मोठा फंड बनते. लक्षाधीश होण्याचा हा फॉर्म्युला प्रभावी आहे. दुसरीकडे म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताना धोकाही असतो. शेअर बाजारातील गोंधळाचा तुमच्या गुंतवणुकीवरील परताव्यावरही परिणाम होऊ शकतो.
महत्वाच्या बातम्या: