Indians Earning : देशात श्रीमंतांची संख्या वाढली! कोट्यावधी भारतीय वर्षाला कमवतायेत पाच लाख रुपये
दिवसेंदिवस देशात श्रीमंत लोकांची संख्या वाढत आहेत. गेल्या काही वर्षात देशात वर्षाला पाच लाख रुपयांपेक्षा अधिक पैसे कमवणाऱ्यांची संख्येत पाच पटीनं वाढ झाली आहे.
Indians Earning : दिवसेंदिवस देशात श्रीमंत लोकांची संख्या वाढत आहेत. गेल्या काही वर्षात देशात वर्षाला पाच लाख रुपयांपेक्षा अधिक पैसे कमवणाऱ्यांची संख्येत पाच पटीनं वाढ झाल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे. देशातील लोकांच्या उत्पन्नातही वाढ होताना दिसत आहे.
सध्या 1.8 कोटी लोक वर्षाला पाच लाख रुपयांपेक्षा अधिक पैसे
बीएनपी परिबाने आयटी विभागाच्या डेटाचे विश्लेषण केले आहे. त्यानुसार वार्षिक 5 लाख रुपये कमावणारे लोक 2012 च्या आर्थिक वर्षात 38 लाख होते. मात्र, आर्थिक वर्ष 2021 मध्ये त्यात पाच पटीने वाढ झाली आहे. सध्या 1.8 कोटी लोक वर्षाला पाच लाख रुपयांपेक्षा अधिक पैसे कमवत आहेत. गेल्या दशकभरात त्यांचे उत्पन्न वाढले असून, कर्ज फेडण्याची क्षमताही सुधारली आहे. याशिवाय उपभोग आणि गुंतवणुकीच्या पातळीवरही सुधारणा दिसून आली आहे. आयटी विभागाने 2021 पर्यंतचा डेटा दिला आहे. मात्र, हे आकडे त्याहूनही जास्त असू शकतात, असा विश्वास अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. अहवालानुसार, कोविड महामारीच्या काळात लोकांच्या उत्पन्नात घट झाली होती. परंतू, त्यानंतरच्या काळात लोकांच्या उत्पन्नात पाच पटीनं वाढ झाली आहे. आर्थिक पुनर्प्राप्ती दरम्यान ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.
उच्च उत्पन्न लोकांमध्ये वाढ कशामुळे झाली?
आयटी सेवा आणि वित्तीय सेवांसह सेवा क्षेत्राच्या ताकदीमुळं भारतातील उच्च-उत्पन्न कुटुंबांचे प्रमाण गेल्या दशकात वाढले आहे. अहवालानुसार, हा भाग भारतातील श्रीमंत कुटुंबांचा एक छोटासा भाग आहे. त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
कोणत्या क्षेत्रांना फायदा होतोय?
अहवालात असे दिसून आले आहे की वाढत्या उत्पन्नामुळं ऑटोमोबाईल, वित्तीय सेवा, दागिने, हॉटेल्स, रिअल इस्टेट, सिगारेट, मल्टिप्लेक्स आणि रुग्णालये यासारख्या क्षेत्रांचा महसूल FMCG, मीडिया ब्रॉडकास्टिंग सारख्या क्षेत्रांपेक्षा वेगाने वाढत आहे. त्याचवेळी, या क्षेत्रांशी संबंधित कंपन्यांच्या वापरातही वाढ दिसून येत आहे.
करदात्यांची संख्या वाढली
दुसरीकडे, पाच लाख रुपये कमावणाऱ्यांची संख्या वाढत असली तरी, 5 लाख रुपयांपेक्षा कमी कमाई करणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. 5 ते 10 लाख रुपये, 10 ते 20 लाख आणि 20 ते 50 लाख पगार असलेल्या करदात्यांची संख्या आर्थिक वर्ष 2012-21 दरम्यान अनुक्रमे 17.6 टक्के, 20.8 टक्के आणि 21.6 टक्क्यांनी वाढली आहे. 5 लाखांपेक्षा कमी पगार असलेल्या करदात्यांची संख्या 7 टक्क्यांच्या सीएजीआरने वाढली आहे. याशिवाय, 5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या व्यक्तींची संख्या आर्थिक वर्ष 2021 मध्ये 72.2 टक्क्यांवर घसरली आहे, जी आर्थिक वर्ष 2012 मध्ये 86.8 टक्के होती.
महत्त्वाच्या बातम्या:
Forbes Billionaires List : जगात सर्वात जास्त 10 श्रीमंत व्यक्ती कोण? फोर्ब्सच्या यादीतून माहिती समोर