पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कीला भारताची मोठी गरज, दोन्ही देशात कोणत्या वस्तुंचा होतो व्यापार?
भारत आणि तुर्की यांच्यात मजबूत द्विपक्षीय व्यापार संबंध आहेत. 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान पाकिस्तानच्या समर्थनार्थ बाहेर पडलेल्या तुर्कीसोबतच्या भारताच्या व्यापारावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

India Turkey Trade Relationship : भारत आणि तुर्की यांच्यात मजबूत द्विपक्षीय व्यापार संबंध आहेत. 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान पाकिस्तानच्या समर्थनार्थ बाहेर पडलेल्या तुर्कीसोबतच्या भारताच्या व्यापारावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दोन्ही देशांमधील व्यापार आणि राजनैतिक पातळीवर अनिश्चितता असली तरी, भारताचा तुर्कीसोबतचा व्यापार लक्षणीय राहिला आहे. एप्रिल 2024 ते फेब्रुवारी 2025 दरम्यान भारताने तुर्कीला 5.2 अब्ज अमेरिकन डॉलर्सची निर्यात तर तुर्कीतून 2.84 अब्ज अमेरिकन डॉलर्सची आयात केली आहे.
भारत आणि तुर्की हे दोन्ही देश एकमेकांकडून मोठ्या प्रमाणात विविध गोष्टींची आयात निर्यात आणि करतात. 2025 मध्ये अंदाजे 1.46 अब्ज लोकसंख्या असलेला भारत अजूनही नैसर्गिक संसाधनांच्या बाबतीत तितकासा समृद्ध नाही, म्हणून त्याला इतर देशांकडून तेल आणि वायूसारख्या गोष्टी आयात करुन आपल्या गरजा पूर्ण कराव्या लागतात.
भारत तुर्कीकडून काय खरेदी करतो?
खनिज इंधन, तेल, ऊर्धपातन उत्पादने
इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक मशीन्स, न्यूक्लियर रिअॅक्टर, बॉयलर
अजैविक रसायने, मौल्यवान धातू संयुगे, समस्थानिके
मीठ, सल्फर, जिप्सम, चुना, सिमेंट, लोखंड आणि स्टील
प्राणी आणि वनस्पती तेल, चरबी
अनेक प्रकारची फळे आणि भाज्या
तुर्की भारताकडून कोणत्या वस्तुंची खरेदी करतो?
सेंद्रिय रसायने
यंत्रे, अणुभट्ट्या, बॉयलर
रेल्वे आणि ट्राम व्यतिरिक्त इतर वाहने
खनिज इंधन, तेल
इलेक्ट्रॉनिक मशीन्स
रंगकामात वापरले जाणारे रंग
यावरून भारत आणि तुर्कीमधील व्यापारी संबंध मजबूत असल्याचे दिसून येते. परंतू, तुर्कीच्या एका चुकीमुळे आता त्यात दरी निर्माण होत आहे. आता हे पाहणे बाकी आहे की ते दोघेही एकमेकांच्या ऊर्जा आणि औद्योगिक गरजा कशा पूर्ण करतात.
भारतातून कोणत्या देशांमध्ये सर्वाधिक निर्यात होते?
अमेरिका - 71.51 अब्ज डॉलर
संयुक्त अरब अमिराती - 25.45 अब्ज डॉलर
चीन - 23.04 अब्ज डॉलर
बांगलादेश - 14.09 अब्ज डॉलर
हाँगकाँग - 11.29 अब्ज डॉलर
भारताविरुद्धच्या युद्धात तुर्कीचा पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारताने जोरदार कारवाई करत पाकिस्तान (Pakistan) आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये (POK) ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवले. भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून 7 मे रोजी दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. यानंतर पाकिस्तानने भारतावर (India) हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताने पाकिस्तानचा प्रत्येक डाव हाणून पाडला. या सर्व घडामोडींमध्ये तुर्कीने (Turkey) भारतासोबत झालेल्या तणावात पाकिस्तानला जाहीरपणे पाठिंबा दिला होता. भारताविरुद्धच्या युद्धात पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा देणाऱ्या तुर्कीने (Turkey Support for Pakistan) पुन्हा एकदा दहशतवादाला आश्रय देणाऱ्याला पाठिंबा दिला आहे. तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगन यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या नुकसानीचा विचार न करता तुर्की पाकिस्तानला मदत करतच राहणार असल्याचे म्हणत पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले होते.
महत्वाच्या बातम्या:























