WPI: घाऊक महागाई दरात घट, सप्टेंबर महिन्यात 10.70 टक्के नोंद
WPI: सप्टेंबर महिन्यात घाऊक महागाई दर हा 10.70 टक्क्यांवर आला आहे. ऑगस्ट महिन्यात हा दर 12.41 टक्क्यांवर होता.

Wholesale Inflation: सप्टेंबर महिन्यात सामान्यांना महागाईत काही प्रमाणात दिलासा मिळाला. सप्टेंबर महिन्यात घाऊक महागाईचा दर (Inflation Rate)घटला आहे. मागील महिन्यात घाऊक महागाईचा दर 10.70 टक्के (Wholesale Inflation Rate) इतका नोंदवण्यात आला. ऑगस्ट महिन्यात हा महागाई दर 12.41 टक्क्यांवर होता. सप्टेंबर महिन्यात घाऊक महागाईचा दर 11 टक्क्यांहून अधिक राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता.
खाद्यपदार्थांच्या दरात घसरण
घाऊक महागाईच्या दरात घसरण झाल्याने सरकारला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. खाद्यपदार्थांच्या किंमतीत किंचित घट झाल्याने घाऊक महागाईचा दर घटला असल्याचे समोर आले आहे. घाऊक महागाईचा दर 11 टक्क्यांपेक्षा कमी झाल्याने महागाईत काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.
सप्टेंबर महिन्यात 11 टक्क्यांहून अधिक महागाई दर
वर्ष 2021 मध्ये सप्टेंबर महिन्यात घाऊक महागाईचा दर 11.8 टक्क्यांवर होता. त्यानंतर आता या वर्षी घाऊक महागाईचा दर 10.70 टक्के एवढा झाला. या वर्षी मे महिन्यात घाऊक महागाई दराने 15.88 टक्के एवढा आकडा गाठला होता. सप्टेंबरपासून सलग 10 महिने घाऊक महागाईचा दर हा 10 टक्क्यांहून अधिक राहिला आहे.
सप्टेंबर महिन्यात खाद्य महागाई दरदेखील कमी झाला आहे. हा दर 8.08 टक्क्यांवर आला आहे. ऑगस्ट महिन्यात 9.93 टक्क्यांवर होता. भाज्यांच्या महागाई दरात मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. सप्टेंबर महिन्यात महागाई दर 39.66 टक्के इतका होता. तर, ऑगस्टमध्ये हा दर 22.29 टक्के इतका होता. सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने भाज्यांचे दर वाढले. सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सप्टेंबर महिन्यात घाऊक महागाई दरात मुख्यत: खाद्यान्न, कच्चे तेल, पेट्रोलियम पदार्थांसह नैसर्गिक वायू, केमिकल आणि केमिकल उत्पादने, बेस मेटल्स, इलेक्ट्रिकसिटी, टेक्साइल आदींचा समावेश होता.
किरकोळ महागाईच्या दरात वाढ
सप्टेंबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर 7.41 टक्क्यांवर गेला. ऑगस्ट महिन्यात हा दर 7 टक्के इतका होता. त्याशिवाय, खाद्य पदार्थांचा महागाई दर 7.62 टक्क्यांवरून 8.60 टक्क्यांवर पोहोचला आहे. शहरी आणि ग्रामीण महागाई दरातही वाढ झाली असल्याचे नोंदवण्यात आले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:























