(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भारत-पाकिस्तानचा व्यापार किती? प्रत्येक भारतीयांच्या घरात 'या' आहेत पाकिस्तानी वस्तू
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशादरम्यान मोठा व्यापार होतो. पाकिस्तानमधील अनेक वस्तू भारतीय लोक वापरतात.
India pakistan trade : उद्या (14 ऑक्टोंबर) भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेटचा सामना (india pakistan Match) होणार आहे. याकडं संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. हा सामना प्रेक्षकांच्या संख्येचे सर्व विक्रमही मोडेल अशी शक्यता आहे. या सामन्यादरम्यान कोट्यवधी रुपयांची कमाई होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज आपण दोन्ही देशांमधील व्यापाराबद्दल माहिती पाहणार आहोत. विशेषत: पाकिस्तानमध्ये ज्या वस्तू तयार होतात त्या भारतातील प्रत्येक घरात वापरल्या जातात. पाकिस्तानकडे अशा काही गोष्टी आहेत, ज्या प्रत्येक भारतीयांच्या घरात वापरल्या जातात. भारतातील लोकांना पाकिस्तानचा कोणता माल आवडतो आणि दोन्ही देशांमध्ये किती व्यापार चालतो याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत.
एप्रिल 2022 ते डिसेंबर 2022 पर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्ये 11 हजार कोटी रुपयांचा म्हणजेच 1.35 अब्ज डॉलरचा व्यापार झाला आहे. तर आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये हा व्यवसाय 516.36 दशलक्ष डॉलर्स होता. तर आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये हा व्यवसाय 329.26 दशलक्ष डॉलर्स होता. मोठ्या प्रमाणावर दोन्ही देशांमध्ये व्यापार होतो. पाकिस्तानमध्ये तयार होणाऱ्या अनेक वस्तू भारतामध्ये वापरल्या जातात.
पाकिस्तानातील 'या' वस्तू भारतात वापरल्या जातात
बिनानी सिमेंटचे नाव तुम्हाला माहित असेल. भारतात विकले जाणारे हे सिमेंट पाकिस्तानमध्ये तयार होते. विशेष बाब म्हणजे भारतात उपवासासाठी वापरण्यात येणारे मीठही पाकिस्तानातून आयात केले जाते. त्याची भारतात मोठ्या प्रमाणात विक्री होते. तसेच मुलतानी माती देशातील प्रत्येक घरात उपलब्ध आहे. नावाप्रमाणेच ते पाकिस्तानमधूनही आयात केली जाते. ही माती सौंदर्य उत्पादनांमध्ये वापरली जाते. बरेच लोक याचा वापर फेस पेस्ट म्हणून करतात.
कुर्त्यापासून ते चप्पलपर्यंत पाकिस्तानच्या वस्तू भारतात
भारत पाकिस्तानकडून कुर्त्यापासून चप्पलपर्यंत सर्व काही आयात करतो. लाहोरचा कुर्ता आणि पेशावरी चप्पल भारतातील लोकांना खूप आवडतात. ज्या भारतात मोठ्या प्रमाणात आयात केल्या जातात. त्याचबरोबर साखरेपासून बनवलेल्या कन्फेक्शनरीशी संबंधित काही उत्पादने केवळ पाकिस्तानमधून येतात. भारतही पाकिस्तानातून कापूस आयात करतो. काही वैद्यकीय उपकरणे आणि चष्म्यांमध्ये वापरले जाणारे ऑप्टिक्सही पाकिस्तानमधून आयात केले जातात. भारत पाकिस्तानमधून चामड्याच्या वस्तू मोठ्या प्रमामात आयात करतो.
11 हजार कोटींहून अधिक उलाढाल
वर्षाच्या सुरुवातीला सरकारकडून संसदेत माहिती देण्यात आली होती की पाकिस्तान आणि भारतामध्ये किती व्यापार होतो? भारत आणि पाकिस्तानमधील व्यापार अधिकृतपणे बंद असला तरीही, त्यानंतर एप्रिल 2022 ते डिसेंबर 2022 या काळात दोन्ही देशांमध्ये 11 हजार कोटी रुपयांचा म्हणजेच 1.35 अब्ज डॉलरचा व्यापार झाला आहे. तर आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये हा व्यवसाय 516.36 दशलक्ष डॉलर्स होता. तर आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये हा व्यवसाय 329.26 दशलक्ष डॉलर्स होता. भारताने जम्मू-काश्मीरमधून ज्यावेळी कलम 370 हटवले होते त्यावेळी पाकिस्तानने भारतासोबतचा व्यापार बंद केला होता.
महत्त्वाच्या बातम्या: