(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीनं दिला धक्का, पुन्हा दरात वाढ, जाणून घ्या प्रमुख शहरातील दर
सोन्या चांदीची (Gold Silver) खरेदी करणाऱ्यांसाठी थोडी निराशाजनक बातमी आहे. कारण, पुन्हा एकदा सोन्या चांदीच्या दरात (Gold Silver Rate) वाढ झाली आहे.
Gold Silver Price: सोन्या चांदीची (Gold Silver) खरेदी करणाऱ्यांसाठी थोडी निराशाजनक बातमी आहे. कारण, पुन्हा एकदा सोन्या चांदीच्या दरात (Gold Silver Rate) वाढ झाली आहे. वाढत्या दरांमुळं सोनं चांदी खरेदी करणाऱ्यांना धक्का बसला आहे. उद्या देशभरात अक्षय्य तृतीयेचा (Akshaya Tritiya) सण साजरा केला जाणार आहे. त्यापूर्वीच सोन्या चांदीच्या दरात वाढ झालीय. जाणून घेऊयात कोणत्या शहरात किती वाढ झालीय.
गेल्या अनेक दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात वाढ होत आहे. यामुळं सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. या वाढत्या दरामुळं सोनं खरेदी करावं की नको असा प्रश्न ग्राहकांसमोर आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. अशातच सोन्या चांदीच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळं नागरिक सोन्या चांदीच्या खरेदीकडे पाठ फिरवत असल्याचंही चित्र काही भागात पाहायला मिळत आहे.
सोने 71,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 82,250 रुपये प्रति किलोग्रॅम
उद्या देसभरात अक्षय तृतीयाचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीची खरेदी केली जाते. या दिवी सोनं चांदीच्या खरेदीचं विशेष महत्व देखील आहे. वायदे बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ दिसून येत आहे. आज सोने 71,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 82,250 रुपये प्रति किलोग्रॅमच्या वर आहे. तर दुसरीकडे MCX वर सोनं थोडे यापेक्षाही महाग आहे. MCX वर 10 ग्रॅम सोन्याची खरेदी 71,236 रुपये खऱ्च करावे लागत आहेत. काल (बुधुवार) हाच सोन्याचा भाव 71,127 रुपये होता. आज यामध्ये 109 रुपयांची वाढ झालीय. वायदे बाजारात चांदी 436 रुपयांनी महागली आणि 83,430 रुपये प्रति किलोवर पोहोचली.
कोणत्या शहरात सोन्या चांदीला किती दर?
दिल्ली - 24 कॅरेट सोने - 72,310 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी - 85,200 रुपये प्रति किलो
मुंबई - 24 कॅरेट सोने - 72,160 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी - 85,200 रुपये प्रति किलो
कोलकाता - 24 कॅरेट सोने - 72,160 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी - 85,200 रुपये प्रति किलो
चेन्नई - 24 कॅरेट सोने - 72,160 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी - 88,700 रुपये प्रति किलो
जयपूर - 24 कॅरेट सोने 72,310 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी - 85,200 रुपये प्रति किलो
पाटणा - 24 कॅरेट सोने 72,210 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी - 85,200 रुपये प्रति किलो
पुणे - 24 कॅरेट सोने 72,160 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी - 85,200 रुपये प्रति किलो
नोएडा - 24 कॅरेट सोने 72,310 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी - 85,200 रुपये प्रति किलो
लखनौ - 24 कॅरेट सोने 72,310 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी - 85,200 रुपये प्रति किलो
गुरुग्राम - 24 कॅरेट सोने 72,310 रुपये प्रति 10 ग्रॅम, चांदी - 85,200 रुपये प्रति किलो
दरम्यान, देशांतर्गत बाजारात सोन्या चांदीच्या दरात वाढ होत असताना दुसऱ्या बाजूला आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोने आणि चांदी महाग होत आहे. आज COMEX वर सोने 9.63 डॉलरने महागले आहे.
महत्वाच्या बातम्या:
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी का करतात? यामागचं नेमकं कारण जाणून घ्या