जगातील 'या' 8 देशात आयकर आकारला जात नाही, कारण....
जगातील बहुतेक देशांमध्ये आयकर (Income Tax) हा उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. या माध्यमातून सरकार (Govt) मोठ्या प्रमाणात भांडवल जमा करते. पण जगात असे काही देश आहेत जिथे आयकर अजिबात लावला जात नाही.
Income Tax : जगातील बहुतेक देशांमध्ये आयकर (Income Tax) हा उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. या माध्यमातून सरकार (Govt) मोठ्या प्रमाणात भांडवल जमा करते. पण जगात असे काही देश आहेत जिथे आयकर अजिबात लावला जात नाही. या देशात नेमका आयकर काल लावा जात नाही? आयकर न आकारणारे देश कोणते? याबद्दल जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
जगातील बहुतेक देशांमध्ये आयकर हा उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत आहे. विविध देशांतील लोकांवर अनेक प्रकारचे कर लादले जातात. कोणत्याही देशाचा आयकरदाता कोणत्याही मार्गाने जास्तीत जास्त पैसे वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतो. पण, जगातील काही देशांमध्येआयकर अजिबात लावला जात नाही.
आयकर न आकारणारे देश कोणते?
संयुक्त अरब अमिराती (UAE)
संयुक्त अरब अमिराती म्हणजेच UAE हा आखाती देशांच्या गटातील सर्वात श्रीमंत देश आहे. कच्च्या तेलाचे उत्पादन आणि पर्यटनामुळं या देशाची अर्थव्यवस्था खूप मजबूत आहे. त्यामुळं येथील सर्वसामान्य नागरिकांकडून सरकार आयकर वसूल करत नाही.
कुवेत, बहारिन, ओमान
UAE प्रमाणेच कुवेत, बहारिन आणि ओमान हे देखील आखाती देश आहेत. या दोन्ही देशांची अर्थव्यवस्था पूर्णपणे तेल उत्पादनावर अवलंबून आहे. सरकारच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत म्हणजे तेलावरील कर. येथेही सर्वसामान्यांना कर भरावा लागत नाही.
ब्रुनेई
ब्रुनेई हा दक्षिण पूर्व आशियाई देश आहे. या देशात कच्चे तेल आणि वायूचे प्रचंड साठे आहेत. येथेही नागरिकांकडून आयकर घेतला जात नाही.
सोमालिया
सोमालिया हा पूर्व आफ्रिकन देश आहे. या देशाची गरिबी आपल्या सर्वांना माहीत आहे. म्हणूनच इथल्या लोकांकडून आयकर घेतला जात नाही.
बहामास
बहामास हे पर्यटकांसाठी नंदनवन मानले जाते. हा देश पश्चिम गोलार्धात आहे. या देशाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य स्त्रोत पर्यटन आहे. इथेही लोकांकडून इन्कम टॅक्स घेतला जात नाही.
मालदीव
केवळ भारतातूनच नव्हे तर जगभरातून पर्यटक मालदीवला भेट देण्यासाठी येतात. या देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे परदेशातून येणाऱ्या पर्यटकांवर अवलंबून आहे. त्यामुळे मालदीव आपल्या नागरिकांकडून कर वसूल करत नाही.
ज्या व्यक्तीचं उत्पन्न सरकारनं घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा म्हणजे बेसिक एक्झेम्पशन लिमिटपेक्षा जास्त आहे, त्यांना इन्कम टॅक्स रिटर्न भरायला हवा. तुम्ही नोकरी किंवा व्यवसाय करत असाल, तर आयटीआर भरणं गरजेचं असतं. तुमचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल म्हणजे तुमचं उत्पन्न करपात्र नसेल, तरीही रिटर्न भरलेला चांगला.
महत्वाच्या बातम्या:
तुम्ही घरात किती रोख रक्कम ठेऊ शकता? आयकर विभागाचा नेमका नियम काय?