तुम्ही घरात किती रोख रक्कम ठेऊ शकता? आयकर विभागाचा नेमका नियम काय?
घरात रोकड ठेवण्याची नेमकी मर्यादा किती आहे? याबाबत योग्य ती माहिती तुम्हाला आहे का? जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.
Cash Limit : अलिकडच्या काळात सगळीकडे ऑनलाईनचा (online) वापर केला जातोय. आजचे युग डिजिटलचं युग आहे असं म्हटलं जातं. या काळात अनेक लोक रोख रक्कम जवळ ठेवण्याऐवजी ऑनलाइन व्यवहार करतात. तर काही लोक असेही आहेत की, जे बँकांऐवजी घरातच रोख रक्कम ठेवण्यास प्राधान्य देतात. याबद्दल प्रत्येकाची स्वतःची वैयक्तिक कारणे असू शकतात. मात्र, घरात रोकड ठेवण्याची नेमकी मर्यादा किती आहे? याबाबत योग्य ती माहिती तुम्हाला आहे का? जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती.
तुम्ही घरात किती रोकड ठेऊ शकता?
आलिकडच्या काळात लोकांनी रोखीचा वापर खूपच कमी केला आहे. विशेषतः, बरेच लोक आपली बचत फक्त रोखीत ठेवतात. गृहिणी आपली बचत बँकेत ठेवण्यापेक्षा घरी ठेवण्यास प्राधान्य देतात. इतर अनेक लोक बँकांवर जास्त विश्वास ठेवत नाहीत. त्यांचे पैसे स्वतःकडे ठेवतात. पण घरी पैसे ठेवायला काही मर्यादा आहे का (Cash Limit at Home)? दररोज छापे मारताना लोकांच्या घरातून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केलेली आपण पाहतो. मी मर्यादेपेक्षा जास्त रोख ठेवल्यास मला आयकर विभागाकडून नोटीस मिळेल का? तर याचे उत्तर आहे, नाही. तुम्ही कितीही रोख रक्कम घरी ठेवू शकता आणि त्यावर कोणतेही बंधन नाही.
पैशांचा स्रोत काय? हे सांगावं लागणार
आयकर नियमांनुसार, तुम्ही तुमच्या घरात कितीही रोकड ठेवू शकता. मात्र, एखादी व्यक्ती आयकर विभागाच्या कचाट्यात आली, तर त्याला सांगावे लागेल की, या पैशाचा स्रोत काय आहे? जर तपासाधीन व्यक्तीकडे त्या पैशाचा कायदेशीर स्रोत असेल तर त्याची कागदपत्रे दाखवावी लागतील. जर सर्व काही ठीक असेल तर काळजी करण्याची गरज नाही. जर तुम्ही रोख रकमेचा हिशेब ठेवला नाही तर तुमच्या समस्या वाढू शकतात. जर तुमच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकला आणि मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली. याशिवाय, जर तुम्ही त्या रोखीची योग्य माहिती देऊ शकत नसाल तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. तुमच्याकडून वसूल केलेल्या रोख रकमेच्या 137 टक्क्यांपर्यंत कर आकारला जाऊ शकतो. म्हणजे तुमच्याकडे असलेली 37 टक्के रोकड निघून जाईल आणि तुम्हाला ती भरावी लागेल.
बँकेत एकावेळी किती रक्कम भरु शकता?
बँकेत एकावेळी 50,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी तुम्हाला पॅन कार्ड दाखवावे लागेल. खरेदी करताना, या प्रकरणात 2 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम भरता येणार नाही. यासाठी तुम्हाला पॅन आणि आधार देखील दाखवावा लागेल. जर तुम्ही एका वर्षात तुमच्या बँक खात्यात 20 लाख रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम जमा केली, तरीही तुम्हाला बँकेत पॅन आणि आधार दाखवावा लागेल.
महत्वाच्या बातम्या: