फक्त 5000 रुपयांची SIP अन् करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण होणार, जाणून घ्या नेमकं कसं?
अनेकांना कोट्यधीश व्हावसं वाटतं. एसआयपीच्या मदतीनेत तुमचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकते. कोट्यधीश होण्यासाठी एसआयपीचा नेमका कोणता फॉर्म्यूला वापरायला हवा, ते समजून घ्या..
Mutual Fund : तुमच्याकडे असलेल्या पैशांचे मूल्य वाढले तरच तुम्ही श्रीमंत होऊ शकता. योग्य ठिकाणी हे पैसे गुंतवून तुमचं श्रीमंत होण्याचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. आजघडीला गुंतवणुकीचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. शेअर मार्केट, एफडी, सोन्यात गुंतवणूक यासारखे गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत. मात्र म्युच्यूअल फंडाच्या माध्यमातूनही तुम्ही तुमच्या गुंतवणुकीवर चांगले रिटर्न्स मिळवू शकता. अगदी 5000 रुपयांच्या एसआयपीने म्युच्यूअल फंडात गुंतवणूक करून तुम्ही तुमचे कोट्यधीश होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता. हे कसे शक्य आहे, ते समजून घेऊ या...
म्युच्यूअल फंडात दीर्घकालीन गुंतवणूक तुम्हाला हमखास फायदेशीर ठरू शकते. दीर्घकालीन गुंतवणुकीवर साधारम 12 ते 15 टक्क्यांनी रिटर्न्स मिळतात असे गृहित धरले जाते. हाच हिशोब पकडून तुम्ही काही वर्षे 5000 रुपयांची एसआयपी केली तर तुम्ही करोडपती होऊ शकता.
10000 रुपयांच्या एसआयपीवर करोडपती कधी व्हाल?
अगोदर 10000 रुपयांची एसआयपी केल्यास तुम्ही करोडपती कसे व्हाल हे समजून घेऊ. तुम्ही करत असलेल्या एसआयपीवर साधारण 12 टक्क्यांनी रिटर्न्स मिळतात असे गृहीत धरू. तुम्ही प्रत्येक महिन्याला 10000 रुपयांची एसआयपी केली, तसेच या एसआयपीत प्रत्येक वर्षाला 10 टक्क्यांनी वाढ (Step Up SIP) केली, तर तुम्ही अवघ्या 16 वर्षांत करोडपती होऊ शकता. तुम्हाला एकूण 1,03,20,589 कोटी रुपये मिळू शकतात. प्रत्येक महिन्याला 10 हजार रुपयांची एसआयपी आणि या एसआयपीत प्रत्येक वर्षाला 10 टक्क्यांनी स्टेप अप एसआयपी केल्यास तुम्ही एकूण 43,14,180 रुपयांची गुंतवणूक कराल. या गुंतवणुकीवर तुम्हाला 60,06,409 रुपये व्याज मिळेल.
5000 रुपयांची एसआयपी केल्यास कधी होणार करोडपती?
तुम्ही महिन्याला 5000 रुपयांची एसआयपी करत असाल आणि या एसआयपीत प्रत्येक वर्षाला 10 टक्क्यांनी वाढ केली तर 21 वर्षांत तुम्हाला एक कोटी रुपये मिळतील. 21 वर्षांत तुम्हाला 1,16,36,770 रुपये मिळतील. तुम्ही 21 वर्षांत 38,40,300 रुपयांची गुंतवणूक कराल. तर तुम्ही गुंतवलेल्या रकमेवर 21 वर्षांत तुम्हाला 77,96,470 रुपयांचे व्याज मिळेल.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
स्विगी सोबतच 'या' जबरदस्त कंपनीचा आयपीओ आला, बम्पर कमाईसाठी पैसे ठेवा तयार!
'ही' महारत्न कंपनी झाली 50 वर्षांची, एका वर्षात गुंतवणूकदारांना दिले 50 टक्के रिटर्न्स!