Aadhaar Card Without Biometric : सरकारची मोठी घोषणा! बायोमेट्रिक्सशिवाय बनवा आधार कार्ड, जाणून घ्या कसा करायचा अर्ज
Aadhaar Card Without Biometric : बायोमेट्रिक तपशीलाशिवाय 29 लाख लोकांना आधार कार्ड जारी करण्यात आल्याची माहिती सरकारने दिली आहे. याचाच अर्थ तुम्ही फिंगरप्रिंट आणि आयरिश स्कॅनशिवाय आधार कार्ड बनवू शकता.
Aadhar Card : केंद्र सरकारने आधार कार्डबाबत (Aadhar Card) मोठी घोषणा केली आहे. बायोमेट्रिक तपशीलाशिवाय 29 लाख लोकांना आधार कार्ड जारी करण्यात आल्याची माहिती सरकारने दिली आहे. याचाच अर्थ तुम्ही फिंगरप्रिंट आणि आयरिश स्कॅनशिवाय आधार कार्ड बनवू शकता.लोकसभेत केंद्र सरकारने ही माहिती दिली होती.
बायोमेट्रिक्सशिवाय आधार कार्डसाठी कोण अर्ज करू शकतो?
बायोमेट्रिक्सशिवाय आधार कार्डसाठी अर्ज करण्यासाठी, तुमच्याकडे वैध वैद्यकीय कारण असणे आवश्यक आहे. जर तुमचे बोटांचे ठसे अस्पष्ट असतील किंवा हात नसतील तर तुम्ही वैद्यकीय प्रमाणपत्र देऊन आधार कार्डसाठी अर्ज करू शकता. त्याचप्रमाणे तुमचे डोळे खराब असतील किंवा तुमचे डोळे नसतील तर अशा परिस्थितीतही तुम्ही आधार कार्डसाठी अर्ज करू शकता.
आधार केंद्राला सूचना दिल्या
अस्पष्ट बोटांचे ठसे किंवा डोळे आणि हात असणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना आधार कार्ड देण्याची सूचना सरकारने आधार सेवा केंद्राला केली आहे, अशी घोषणा मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी केली आहे. सरकारने म्हटले आहे की जर एखाद्याच्या बोटांचे ठसे अस्पष्ट असतील तर तो फक्त IRIS स्कॅनद्वारे आधार कार्ड बनवू शकतो. त्याचप्रमाणे लोकांकडे आयरिश स्कॅन नसेल तर ते फिंगरप्रिंटद्वारे आधारसाठी अर्ज करू शकतात.
बायोमेट्रिक्सशिवाय आधार कार्डसाठी अर्ज कसा करावा?
सरकारने स्पष्ट केले की जे फिंगरप्रिंट आणि आयरिस बायोमेट्रिक्स दोन्ही देऊ शकत नाहीत तेदेखील आधारसाठी अर्ज करू शकतात. अशा व्यक्ती नाव, लिंग, पत्ता आणि तारखेनुसार आधारसाठी अर्ज करू शकतात, परंतु त्यांना त्यांच्या हाताचे आणि डोळे सक्षम नसल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र द्यावे लागेल. तसेच तुमच्या अपंगत्वाचा फोटो आधार कार्डवर जमा करावा लागेल.
मोफत आधार अपडेट करण्याची मुदत वाढवली
14 मार्च 2024 पर्यंत कोणतेही शुल्क न भरता My Aadhaar पोर्टलद्वारे आधार अपडेट केले जाऊ शकतात. माय आधार पोर्टलवर आधार तपशील अपडेट करण्याची मोफत सुविधा उपलब्ध होती. जर एखाद्या वापरकर्त्याने ऑनलाीन ऐवजी आधार केंद्रावर जाऊन आधार ऑफलाईन अपडेट केला तर त्याला 25 रुपये शुल्क भरावे लागेल. आता मुदत वाढवून दिल्यावरही तीच व्यवस्था कायम राहणार आहे. म्हणजेच मोफत आधार अपडेटची सुविधा फक्त ऑनलाइन बाबतीतच उपलब्ध होईल.