एक्स्प्लोर

Silicon Valley Bank : अमेरिकेसह जगाचं टेन्शन वाढवणारी सिलिकॉन व्हॅली बँक बुडाली कशी? वाचा सविस्तर

Silicon Valley Bank : अमेरिकेतील 15 मोठ्या बॅंकांपैकी एक असलेली सिलिकॉन व्हॅली बॅंक बुडाली आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Silicon Valley Bank : वर्ष 2008 मध्ये लेहमन ब्रदर्स बँकेमुळे जागतिक मंदीचा फटका अनेक देशांना बसला होता. अमेरिकेतील चौथ्या क्रमांकाची बॅंक लेहमन ब्रदर्स पत्त्यासारखी कोसळली होती. लेहमन ब्रदर्स बुडाल्यानं अनेक गुंतवणूकदारांना रस्त्यावर यावं लागलं होतं.  जागतिक मंदीचा फटका बसला आणि अनेकांवर बेरोजगाराची कुऱ्हाड कोसळली होती. या मंदीची झळ काही प्रमाणात भारतालादेखील बसली होती. अशात पुन्हा 2008 नंतरचे सर्वात मोठे संकट अमेरिकेसमोर आणि तुलनेनं जगासमोर उभं राहिलं आहे. अमेरिकेतील 15 बलाढ्य बॅंकांपैकी एक असलेली सिलिकॉन व्हॅली बॅंक बुडाली आहे. त्यामुळे अमेरिकेतील आर्थिक संकट तुलनेनं जगासमोरचं संकट निर्माण झालं आहे. त्याचे परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर देखील बघायला मिळाले.  

कशी बुडाली सिलिकॉन व्हॅली बॅंक? 

सिलिकॉन व्हॅली बॅंक नवे स्टार्टअप, कॅपिटल व्हेंन्चर्सला कर्ज पुरवठा करत होती. मात्र, मागील दीड वर्षात आयटी स्टार्टअप कंपन्यांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यातच अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेड रिझर्व्हकडून व्याज दरात वाढ करण्यात आली होती. या व्याज दरवाढीचा फटका बँकेलाही बसला.  मोठ्या दरवाढीमुळे बॅंकेला गंगाजळीच्या तुटवड्याचा सामना करावा लागला. 

बँकेने ग्राहकांच्या ठेवींचा वापर करून अब्जावधींचे बॉण्ड खरेदी केले होते. मात्र व्याजदर वाढल्याने त्याचे मूल्य घसरले. आयटी स्टार्टअप कंपन्या आणि ग्राहकांना घरघर लागल्यावर त्यांनी बॅंकेकडे आपल्या ठेवींची मागणी केली. आपल्याला पैशांची गरज असल्याचा तगादा त्यांनी लावला. त्याशिवाय, खातेदारांनी आपल्या ठेवी बँकेमधून काढण्यास सुरुवात केली. मात्र, एकीकडे गंगाजळी कमी असताना, दुसरीकडे बॉण्डचे मूल्य घसरल्याने बँक तोट्यात गेली. बँकेला बॉण्ड विक्री करून पैसे परत द्यावे लागले आणि अशातच दिवाळखोरीचं संकट ओढवलं. 

सामान्यतः बॅंकां दीर्घकालीन बॉण्डमध्ये गुंतवणूक करत असल्यानं ते सुरक्षित असतात. मात्र आणीबाणीच्या परिस्थिती ते विकावे लागले तर परिस्थिती बदलू शकते. असाच प्रकार सिलिकॉन व्हॅली बँकेबाबत घडलं. 

अनेक आयटी स्टार्टअप कंपन्यांचा पैसा ह्या बॅंकेत होता. प्रामुख्याने आयटी क्षेत्र कोविडमध्ये चांगली कामगिरी करत असताना बॅंक देखील चांगली कामगिरी करत होती. अशात बॅंकेकडून अनेक स्टार्टअप कंपन्यात गुंतवणूक केली गेली. मात्र, आता ह्या आयटी कंपन्या देखील अडचणीत आल्या आहेत. भारतातील काही बड्या नामांकित स्टार्टअप कंपन्यांचा देखील यात समावेश आहे. 

फेडरल डिपॉझिट इन्श्योरन्स कॉर्पोरेशनकडून बॅंकेच्या ग्राहकांना 2.5 लाख डॉलर्स परत केले जाणार आहे. भारतीय चलनात याचे मूल्य जवळपास 2 कोटी रुपये आहे. मात्र, अनेक आयटी कंपन्याच ग्राहक असल्यानं बॅंकेतील ह्या कंपन्यांच्या ठेवी अधिक असणार आहेत. अशात ह्या बँकेत खाते असलेल्या स्टार्टअप कंपनीत जे कर्मचारी काम करत होते, त्यांच्यावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे 

भारतावर परिणाम?

भारतात स्टार्टअप चालना देण्यासाठी केंद्र सरकारकडून पुढाकार घेतला जात आहे. गुंतवणूक केलेल्या कंपन्या अडचणी आल्यानं भारतातील स्टार्टअप इकोसिस्टिमवर देखील त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. अशात केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी स्टार्टअप कंपन्यांच्या प्रतिनिधींची भेट घेणार असल्याचं सांगितलं आहे. मात्र, तरीही आज शेअर बाजारात आयटी कंपन्यांचे समभाग कोसळताना दिसले. सोबतच बॅंकिंग क्षेत्र देखील गडगडले. मात्र, ही पडझड तात्पुरती असली तरी मंदीचे सावट या धक्कानं अधिक गडद झाले असल्याची चर्चा सुरू आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot Vs Sharad Pawar | सदाभाऊ आधी बरळले, आज दिलगिरीची भाषा Special ReportBharat Jodo Yatra Congress | भारत जोडो अभियानात 197 संघटना असल्याची माहिती Special ReportDonald Trump |  ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special ReportShah Rukh Khan Threat | आधी भाईजान आणि आता किंग खान, शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget