Silicon Valley Bank Crisis: अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँक दिवाळखोरीत; 116 वर्ष जुन्या भारतीय बँकेला फटका!
Silicon Valley Bank Crisis: अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली बँकेला टाळं लावण्यात आलं आहे. त्याचा परिणाम मुंबईतील एका बँकेवर झाला आहे. जाणून घ्या काय आहे प्रकरण...
Silicon Valley Bank Crisis: जागतिक आर्थिक संकटाला सामोरे जाणाऱ्या जगाला आणखी एक धक्का बसला. अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या सिलिकॉन व्हॅली बँकेला (Silicon Valley Bank - SVB) टाळं लावण्यात आलं आहे. त्यामुळे अमेरिकेत बँकिंग क्षेत्रावर संकट निर्माण झाले आहे. एसव्हीबी बँक ही अमेरिकेतील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक महत्वाची बँक आहे. अमेरिकन बॅंकेवर ओढवलेल्या या संकटाचा परिणाम अमेरिकेपासून 13 हजार किमी अंतरावर असलेल्या मुंबईतील (Mumbai)116 वर्ष जुन्या बँकेवर झाला आहे.
मुंबईतील या बँकेवर अनपेक्षितपणे सिलिकॉन व्हॅली बँकेवर ओढवलेल्या संकटाचा परिणाम दिसू लागला आहे. हे प्रकरण इतके गंभीर झाले की या बँकेलाही त्यांच्यावतीने स्पष्टीकरण द्यावे लागले आहे.
मुंबईतील सहकारी बँकेचे नाव एसव्हीसी बँक आहे. अमेरिकन सिलिकॉन व्हॅली बँक म्हणजेच एसव्हीबीच्या शटडाउनच्या बातमीने मुंबईतील एसव्हीसी बँकेच्या ग्राहकांना त्रास झाला. चिंताग्रस्त ग्राहकांनी बँकेत जमा केलेल्या पैशांची चिंता करण्यास सुरवात केली आणि त्यांनी बँकेत चौकशी करण्यास सुरवात केली.
एसव्हीसीने स्पष्टीकरण दिले (Mumbai SVC Bank)
मुंबईच्या एसव्हीसी को-ऑपरेटिव्ह बँकेने ट्विटरवर स्पष्टीकरण दिले. आपल्या स्पष्टीकरणात बँकेने म्हटले आहे की, “कॅलिफोर्नियामध्ये असलेल्या सिलिकॉन व्हॅली बँक (एसव्हीबी) चा एसव्हीसी बँकेशी काही संबंध नाही. आम्ही आमच्या सदस्यांना, ग्राहकांना आणि इतर भागधारकांनी निराधार अफवांकडे लक्ष देऊ नये अशी विनंती करतो. "
Important announcement#HumSeHaiPossible #SVCBank #Banking #SVC #Importantannouncement pic.twitter.com/p05lHBJm9w
— SVC Bank (@SVC_Bank) March 11, 2023
बँकेने सांगितले की, त्यांच्या ब्रँड प्रतिमेला कलंकित करण्यासाठी अफवा पसरविणाऱ्याविरूद्ध योग्य कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. एसव्हीसी को-ऑपरेटिव्ह बँकेचे पूर्ण नाव शामराव विठ्ठल कोऑपरेटिव्ह बँक आहे. ही बँक 116 वर्षांपूर्वी स्थापित केली गेली होती. बँक फक्त भारतात व्यवसाय करते.
सिलिकॉन व्हॅली बँक (Silicon Valley Bank)
सिलिकॉन व्हॅली बँक ही अमेरिकेतील 16 व्या क्रमांकाची रिटेल बँक आहे. बँकेकडे खातेदारांच्या 175 अब्ज डॉलरच्या ठेवी आहेत. फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशनने (एफडीआयसी) फेडरल डिपॉझिट इन्शुरन्स कॉर्पोरेशन (एफडीआयसी) कडून बँक ठेवींवर नियंत्रण ठेवले आहे. सर्व बँक शाखा सोमवारी उघडतील, अशी अपेक्षा अमेरिकन प्रशासनाने व्यक्त केली आहे.