Cement Rate : बंगला बांधण्याचं स्वप्न महागलं! सिमेंटच्या दरात मोठी वाढ, दर वाढण्याचं कारण काय?
. देशात बांधकामाला पुन्हा वेग आला आहे. अशा स्थितीत सिमेंटच्या मागणीत चांगली वाढ होताना दिसत असून त्यासोबतच सिमेंटच्या दरातही वाढ (Cement Rate Hike) झाली आहे.
Cement Rate Hike : देशातला मान्सूनचा (Monsoon) हंगाम संपत आला आहे. जवळपास सर्वच भागातून मान्सूनचे ढग दूर झाले आहेत. त्याचाच थेट परिणाम आता बांधकाम व्यवसायांवर (construction trades) होताना दिसत आहे. देशात बांधकामाला पुन्हा वेग आला आहे. अशा स्थितीत सिमेंटच्या मागणीत चांगली वाढ होताना दिसत असून त्यासोबतच सिमेंटच्या दरातही वाढ (Cement Rate Hike) झाली आहे. त्यामुळं तुमच्या स्वप्नातील घरं बांधणं महाग झालं आहे.
सिमेंटच्या दरात वाढ झाल्यानं घर बांधणे महाग झाले आहे. कारण पावसाळा संपताच सिमेंटच्या किमती वाढल्या आहेत. बांधकाम कामांमध्ये झालेली वाढ हे दर वाढण्याचे कारण आहे. सिमेंटची मागणी वाढली असून भावही वाढले आहेत. मात्र, या वाढत्या दराचा बांधकाम करणाऱ्यांना मोठा फटका बसत आहे.
सिमेंटच्या किंमतीत नेमकी किती वाढ?
मिळालेल्या माहितीनुसार, सिमेंटच्या दरात प्रति पोती 10 ते 30 रुपयांची वाढ झाली आहे. ही वाढ 50 किलोच्या सिमेंटच्या पोत्यावर झाली असून, त्यामुळं घर बांधण्याचा खर्चही वाढत असल्याचे दिसून येत आहे. घर बांधण्यासाठी सिमेंट हा सर्वात मोठा घटक आहे. सिमेंटच्या दरात वाढ झाल्याने घर बांधण्याचा खर्च वाढण्याची परिस्थिती दरवर्षी दिसून येते. देशातील 3 राज्यांमध्ये आजपासून सिमेंट महाग होणार आहे. हिमाचल प्रदेशात सिमेंटच्या किमतीत वाढ झाली आहे.
लोकसभा निवडणुकीवेळी सिमेंटच्या किंमती स्थिर होत्या
यंदा देशात लोकसभा निवडणुका झाल्यानंतर अनेक ठिकाणी बांधकामे काही महिने बंदच होती. त्यामुळे देशात बांधकामाची कामे वेगाने होऊ शकली नाहीत. त्यामुळं सिमेंटच्या मागणीत घट झाली होती. याचा परिणाम सिमेंटच्या दरांवर झाला आणि वर्षाच्या पहिल्या सहामाहीत सिमेंटच्या किमती वाढल्याचा धक्का सर्वसामान्यांना जाणवला नाही. मात्र, आता पुन्हा बांधकामांच्या कामाला वेग आला आहे. त्यामुळं सिमेंटच्या दरात वाढ होत आहे.
शेअर बाजारातील घसरणीचा फटका सर्व सिमेंट कंपन्यांना
आज शेअर बाजारातील घसरणीचा फटका सर्व सिमेंट कंपन्यांनाही बसला आहे. अंबुजा सिमेंटमध्ये सर्वाधिक 2.18 टक्के घसरण झाली आहे. ACC मध्ये 2.07 टक्के घट झाली आहे. याशिवाय शेअर बाजारातील घसरणीचा परिणाम अनेक सिमेंट कंपन्यांवर दिसून येत असून आज दिवाळखोरीत निघालेल्या 4 सिमेंट कंपन्या आहेत. इंडिया सिमेंट्स, जेके लक्ष्मी सिमेंट्स, सागर सिमेंट्स आणि उदयपूर सिमेंट्स अशी त्यांची नावे आहेत.
महत्वाच्या बातम्या: