एक्स्प्लोर

Hindenburg : हिंडनबर्गचा मोर्चा आता सेबीच्या अध्यक्षांकडे, माधवी पुरी यांच्यावर गंभीर आरोप, वाचा नेमकं प्रकरण काय?

Hindenburg Research alleges SEBI chief : हिंडनबर्ग रिसर्चने सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच (SEBI chief Madhavi Puri Buch) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Hindenburg Research alleges SEBI chief : हिंडनबर्ग रिसर्चने सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच (SEBI chief Madhavi Puri Buch) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अदानी (Adani) घोटाळ्याशी संबंध असलेल्या कंपन्यांमध्ये त्यांची गुंतवणूक (Investment) असल्याचा आरोप हिंडनबर्गने केला आहे. मात्र, माधवी पुरी यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. सर्व आरोप बिनबुडाचे आणि नाराधार असल्याचे पुरी यांनी म्हटलं आहे. दरम्यान, हिंडनबर्ग रिसर्चच्या म्हणण्यानुसार, माधवी पुरी आणि त्यांचे पतीने मॉरिशस आणि बर्म्युडामधील ऑफशोअर फंडामध्ये गुंतवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

फंडातील 772762 डॉलर एवढी रक्कम विनोद अदानी यांनी वापरल्याचा आरोप

हिंडनबर्गने अहवालात दिलेल्या माहितीनुसार, माधवी पुरी बुच यांनी दाम्पत्याकडे अस्पष्ट ऑफशोअर फंड बर्म्युडा अॅन्ड मॉरिशस फंडमध्ये छुपी भागीदारी होती. या फंडातील 772762 डॉलर एवढी रक्कम विनोद अदानी यांनी वापरल्याचा दावा करण्यात आला आहे. आयआयएफएल प्रकटीकरणातून बुच दाम्पत्याची एकूण संपत्ती ही 10 दशलक्ष डॉलर असल्याचे स्पष्ट होते. यापूर्वीही हिंडनबर्गने अदानी समुहावर आरोप केले होते. मात्र, अदानी समुहानं ते फेटाळून लावले होते. 

नेमका काय आहे दावा?

सिंगापूर येथील अगोरा पार्टनर्स नावाने एका कन्सल्टिंग फर्ममध्ये माधवी यांचा 100 टक्के वाटा होता. सेबीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर माधवी पुरी यांनी धवल यांच्या नावाने सर्व शेअर्स हस्तांतरीत केल्याचा दावा या अहवालात करण्यात आला आहे. सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी यांची ऑफशोर कंपन्यांमध्ये भागीदारी होती, ज्यांचा वापर अदानी समूहाच्या कथित आर्थिक अनियमिततेसाठी केला गेला होता असा आरोप यामध्ये करण्यात आला आहे. सेबीच्या अध्यक्षांच्या या हितसंबंधांमुळे बाजार नियामकाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचं हिंडनबर्गनं आपल्या अहवालात म्हटलं आहे. त्यामुळं सेबीच्या नेतृत्वाबाबत या रिपोर्टमध्ये चिंता व्यक्त केली गेलीय. यावर बोलताना पुरी म्हणाल्या की, आमचं आयुष्य आणि आर्थिक व्यवहार एका खुल्या पुस्तकासारखे आहेत. गेल्या काही वर्षात सेबीला सर्व आवश्यक माहिती दिली गेलीय. कुठलेही आर्थिक कागदपत्र उघड करण्यात आम्हाला अडचण नाही असं त्या म्हणाल्या.

माझ्या सर्व गुंतवणुकीचा तपशील पहिल्यापासूनच सेबीकडे, माधवी पुरी यांची माहिती

दरम्यान, माझ्या सर्व गुंतवणुकीचा तपशील पहिल्यापासूनच सेबीकडे असल्याची माहिती माधवी पुरी यांनी दिली आहे. हिंडनबर्गवर कारवाईचे आदेश दिल्यामुळं हिंडनबर्ग चारित्र्यहणन करत असल्याचं पुरी यांनी म्हटलं आहे.  

महत्वाच्या बातम्या:

Supreme Court on Adani Group : अदानी उद्योगसमूहाला मोठा दिलासा, हिंडनबर्ग प्रकरणी पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Sharad Pawar : 'पवार'फुल खेळीची इनसाईड स्टोरी! 2014 सालची रणनीती काय होती?Special Report Mahayuti CM  Post : महायुतीच्या गोटात नेमकं काय सुरुय? पुढील मुख्यमंत्री कोण होणार?Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?Rahul Gandhi On Amit Shah Sabha : राहुल गांधींचा मोदी-शाहांवर गंभीर आरोप; धारावीच्या जमिनीसाठी..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget