HDFC Life : एचडीएफसी लाईफच्या पॉलिसीधारकांसाठी खुशखबर! कंपनीने जाहीर केला बोनस
HDFC Life Policyholders : HDFC लाइफ त्यांच्या 5.87 लाख पॉलिसीधारकांना 2465 कोटी रुपयांचा बोनस देणार आहे. या रकमेपैकी 1,803 कोटी रुपये पॉलिसीधारकांना या आर्थिक वर्षात पॉलिसीच्या परिपक्वतेवर रोख बोनसच्या रूपात दिले जातील.
HDFC Life Policyholders : एचडीएफसी लाइफ या खासगी क्षेत्रातील जीवन विमा कंपनीची जीवन विमा पॉलिसी घेतली असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. एचडीएफसी लाइफ त्यांच्या 5.87 लाख पॉलिसीधारकांना बोनस देणार आहे. HDFC लाइफकडून त्यांच्या योजनांवर दिलेला हा सर्वोच्च बोनस आहे. चडीएफसी लाइफचे एमडी-सीईओ विबा पडळकर यांनी याबाबतची घोषणा केली आहे.
पॉलिसीधारकांना मिळणार 2465 कोटींचा बोनस
HDFC लाइफ त्यांच्या 5.87 लाख पॉलिसीधारकांना 2465 कोटी रुपयांचा बोनस देणार आहे. या रकमेपैकी 1,803 कोटी रुपये पॉलिसीधारकांना या आर्थिक वर्षात पॉलिसीच्या परिपक्वतेवर रोख बोनसच्या रूपात दिले जातील. तर थकबाकी बोनस विमा पॉलिसीच्या मुदतपूर्तीवर किंवा पॉलिसीधारकांच्या मृत्यूनंतर किंवा पॉलिसी सरेंडर केल्यावर दिला जाईल, अशी माहिती पडळकर यांनी दिली आहे.
बोनसची घोषणा करताना, पडळकर म्हणाले, एचडीएफसी लाइफने पॉलिसीधारकांना देऊ केलेला हा सर्वोच्च बोनस आहे. आम्ही वर्षानुवर्षे पॉलिसीधारकांना बोनस देत आहोत. पॉलिसीधारकांच्या विश्वासावर उभे राहण्याचा प्रयत्न करत आहोत. अनेकांनी स्वतःला आणि त्यांच्या प्रियजनांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी कष्टाने कमावलेले पैसे पॉलिसींमध्ये गुंतवले आहेत. त्यामुळे या पॉलिसीधारकांना जास्तीत जास्त लाभ देण्याचा कंपनी प्रयत्न करत आहे.
एचडीएफसी लाइफने 2000 मध्ये विमा क्षेत्रात प्रवेश केला. एटडीएफसी जीवन संरक्षण, बचत, गुंतवणूक, वार्षिकी आणि आरोग्य योजना ऑफर करत आहे. एचडीएफसी लाइफ देखील स्टॉक एक्स्चेंजवर लिस्टेड आहे. सध्या एचडीएफसी लाईफचा शेअर 554 रुपयांवर व्यवहार करत आहे. शेअरनेही 775 रुपयांचा उच्चांक गाठला होता. परंतु, या स्तरावरून बाजारातील घसरणीमुळे शेअरमध्ये जवळपास 29 टक्क्यांनी घसरण झाली आहे.
महत्वाच्या बातम्या
LIC चं गृहकर्ज महागलं, आजपासून खर्च करावे लागणार अधिक पैसे, पाहा नवे दर
AC Price Hike: जुलैपासून 5 स्टार रेटेड एसी-फ्रिज खरेदी करण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागतील, जाणून घ्या काय आहे कारण