success story : शेतकऱ्याच्या पोराची कमाल, लाखोंची नोकरी सोडून आज करतोय 'हे' काम
शेतकऱ्याच्या मुलाने एक स्टार्टअप सुरु केलं आहे. या माध्यमातून तो मुलगा आज मोठ्या उंचीवर पोहोचला आहे.
success story : जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असण्यासोबतच स्टार्टअपच्या बाबतीत भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो. देशात सध्या स्टार्टअपची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज आपण अशाच एका फिनटेक स्टार्टअपबद्दल माहिती पाहणार आहोत. मध्य प्रदेशातील लेपा या गावातील एका शेतकऱ्याच्या मुलाने एक स्टार्टअप सुरु केलं आहे. आज ते खूप उंचीवर पोहोचले आहे. अल्पावधीत या पदापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले आहे.
हिंमत असेल तर कोणतेही काम सोपे होते, हेच मध्य प्रदेशातील एका खेड्यातील शेतकऱ्याचा मुलगा ललित केशरे याने सिद्ध करुन दाखवलं आहे. Groww नावाचं हे स्टार्टअप त्याने सुरु केलं आहे. या ब्रोकिंग फर्मने आता Zerodha या स्टार्टअपला देखील मागे टाकले आहे. 2016 मध्ये मध्य प्रदेशातील एका खेड्यातील शेतकऱ्याचा मुलगा ललित केशरे याने त्याचे तीन कार्यकारी सहकारी हर्ष जैन, इशान बन्सल आणि नीरज सिंह यांच्यासह फ्लिपकार्टमधील नोकरी सोडली. त्यानंतर Groww स्टार्टअप सुरू केले. आज, सक्रिय वापरकर्त्यांच्या बाबतीत Groww दिवसेंदिवस वाढत असल्याचे समोर आले आहे.
भारतातील सर्वोच्च ब्रोकरेज कंपनी
बंगळुरु स्थित फिनटेक स्टार्टअप ग्रोच्या सक्रिय गुंतवणूकदारांची संख्या आजपर्यंत देशातील सर्वात मोठी ब्रोकिंग फर्म असलेल्या Zerodha पेक्षा जास्त झाली आहे. या प्रकरणात ती भारतातील सर्वोच्च ब्रोकरेज कंपनी ठरली आहे. 2022-2023 आर्थिक वर्षाच्या शेवटी, GROWW चे 53.7 लाख ग्राहक होते. परंतु NSE डेटानुसार, 2023-24 आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर अखेरीस, ही संख्या 66.3 लाख वापरकर्त्यांपर्यंत वाढली. नफ्याच्या बाबतीत झिरोधा अजूनही देशातील सर्वात मोठी ब्रोकिंग फर्म आहे.
वर्षानुवर्षे वापरकर्त्यांची संख्या वाढतेय
Groww च्या सक्रिय गुंतवणूकदारांच्या संख्येत वर्षानुवर्षे लक्षणीय वाढ होत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. शेअर बाजाराचा मुख्य निर्देशांक नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (NSE) च्या डेटावर नजर टाकली तर, आर्थिक वर्ष 2021 मध्ये Groww सक्रिय वापरकर्त्यांची संख्या केवळ 7.8 लाख होती. जी पुढील काळात 38.5 लाख होईल. आर्थिक वर्ष 2022 आणि आर्थिक वर्ष 2023 मध्ये 38.5 लाख. ती वाढून 53.7 लाख झाली. सप्टेंबर 2023 पर्यंत, हा आकडा 66.3 लाखांच्या पातळीवर पोहोचला आणि झिरोधाच्या 64.8 लाख वापरकर्त्यांना मागे टाकले.
ब्रोकिंग फर्म ग्रो या सेवा पुरवते
ब्रोकिंग फर्म ग्रो च्या हे त्यांच्या वापरकर्त्यांना स्टॉक, म्युच्युअल फंड, एक्सचेंज ट्रेडेड फंड, आयपीओ, यूएस स्टॉक्स, फ्युचर्स प्रदान करते. मुदत ठेव (एफडी) आणि गुंतवणूकीसाठी सुलभ व्यासपीठ प्रदान करते. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला, सेक्वोया कॅपिटल आणि टायगर ग्लोबल सारख्या दिग्गजांची या कंपनीत गुंतवणूक आहे.
शेतकऱ्याच्या मुलाची कल्पना कामी
सक्रिय वापरकर्त्यांच्या बाबतीत अधिकृतपणे झिरोधाला मागे टाकणाऱ्या ग्रो या ब्रोकिंग फर्मच्या सुरुवातीबद्दल बोलताना ललित केशरे म्हणाले की, मित्रांच्या साथीनं याची सुरुवात केली. ललितने स्थानिक शाळेतून बारावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर आयआयटी उत्तीर्ण केले. यानंतर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर काम केले. प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करत असताना स्वतःचा स्टार्टअप सुरू करण्याचा विचार त्यांच्या मनात आला आणि इथूनच ग्रोची सुरुवात झाली.
2016 मध्ये सोडली होती नोकरी
ललित केशरे यांनी आपली नोकरी सोडली आणि 2016 मध्ये ग्रो सुरू केले. 2016 मध्ये, ललित केश्रे यांनी त्यांचे तीन कार्यकारी सहकारी हर्ष जैन, इशान बन्सल आणि नीरज सिंग यांच्यासह फ्लिपकार्टमधील नोकरी सोडली आणि हा स्टार्टअप सुरू केला. सुरुवातीच्या टप्प्यात केशेरे यांच्या कंपनीला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. कारण झिरोधासारखे मोठे नाव त्यांच्या स्पर्धेत होते. मात्र गेल्या काही वर्षांत ती झपाट्याने वाढून आज या टप्प्यावर पोहोचली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: