एक्स्प्लोर

UPI Transaction: गुगल पे, फोन पे, युपीआयवर ऑनलाईन पेमेंट करताय? 'या' मर्यादा तुमच्या लक्षात आहेत का?

UPI Transaction: आजकाल बहुतेक लोक रोख रकमेऐवजी UPI द्वारे पैसे देतात. तुम्हीही UPI द्वारे पेमेंट करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे.

UPI Transaction: आजकाल बहुतेक लोक रोख रकमेऐवजी UPI द्वारे पैसे देतात. तुम्हीही UPI द्वारे पेमेंट करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. कारण तुमची बँक तुमच्यावर व्यवहार मर्यादा घालते हे तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही UPI अॅपद्वारे फक्त मर्यादेपर्यंत पेमेंट करू शकता. युपीआय व्यवहारांसाठी प्रत्येक बँकेची दैनंदिन मर्यादा असते. याचाच अर्थ असा की तुम्ही एका दिवसात ठराविक रकमेपर्यंत पैसे पाठवू किंवा मिळवू शकता. याशिवाय, युपीआयद्वारे एकाच वेळी किती पैसे काढता येतील याच्या वेगवेगळ्या बँकांच्या मर्यादा आहेत.

एनपीसीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार तुम्ही युपीआयद्वारे एका दिवसात 1 लाख रुपयांपर्यंतचे व्यवहार करू शकाल. ही मर्यादा बँकेनुसार बदलू शकते. कॅनरा बँकेत दैनंदिन मर्यादा फक्त 25,000 रुपये आहे तर एसबीआयमध्ये दैनंदिन मर्यादा 1 लाख रुपये आहे.

दैनंदिन व्यवहारांच्या संख्येवर मर्यादा

मनी ट्रान्सफर मर्यादेसोबतच एका दिवसात किती UPI ट्रान्सफर करता येतील यावरही मर्यादा आहे. दैनिक UPI हस्तांतरण मर्यादा 20 व्यवहारांवर सेट केली आहे. मर्यादा संपल्यानंतर, मर्यादेचे नूतनीकरण करण्यासाठी 24 तास प्रतीक्षा करावी लागेल. पण मर्यादा बँकेनुसार भिन्न असू शकते.

पेटीएम UPI व्यवहार मर्यादा

Paytm UPI ने युपीआय वापरकर्त्यांसाठी प्रतिदिन 1 लाख रुपयांची कमाल मर्यादा निश्चित केली आहे. दुसरीकडे आता तुम्ही पेटीएमसह एका तासात फक्त 20,000 रुपयांचे व्यवहार करू शकाल. या अॅपद्वारे तुम्ही एका तासात 5 व्यवहार करू शकता आणि दिवसातून फक्त 20 व्यवहार करू शकता.

गुगल पे UPI व्यवहार मर्यादा

गुगल पे एका दिवसात 10 ची कमाल व्यवहार मर्यादा देखील निश्चित केली आहे. वापरकर्ते या अॅपवरून एका दिवसात फक्त 10 व्यवहार करू शकतील. त्याचवेळी या अॅपद्वारे एका दिवसात एक लाख रुपयांपर्यंतची रक्कम हस्तांतरित केली जाऊ शकते. पण गुगल पे या कंपनीने दर तासाला व्यवहारांसाठी कोणतीही मर्यादा सेट केलेली नाही.

फोन पे UPI व्यवहार मर्यादा

फोन पे कंपनीने UPI द्वारे एका दिवसात 1 लाख रुपयांची कमाल मर्यादा देखील निश्चित केली आहे. ज्यामध्ये आता कोणीही या अॅपद्वारे एका दिवसात जास्तीत जास्त 10 किंवा 20 व्यवहार करू शकतो. फोनपेने देखील प्रति तास व्यवहार मर्यादा निश्चित केलेली नाही.

अॅमेझॉन पे UPI व्यवहार मर्यादा

अॅमेझॉन पे कंपनीने UPI द्वारे एका दिवसात पेमेंट करण्यासाठी 1 लाख रुपयांची कमाल मर्यादा देखील निश्चित केली आहे. त्याचवेळी अॅमेझॉन पे कंपनीने  दररोज 20 व्यवहारांची मर्यादा ठेवली आहे.  अॅमेझॉन पे  पहिल्या 24 तासात UPI वर नोंदणी केल्यानंतर नवीन वापरकर्त्यांसाठी 5,000 रुपयांची व्यवहार मर्यादा निश्चित केली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India Champions Trophy : सगळे फॉर्ममध्ये तरी गौतम गंभीर टेन्शनमध्ये, चॅम्पियन्स ट्रॉफीआधी टीम इंडियाची दुखरी बाजू आली समोर!
सगळे फॉर्ममध्ये तरी गौतम गंभीर टेन्शनमध्ये, चॅम्पियन्स ट्रॉफीआधी टीम इंडियाची दुखरी बाजू आली समोर!
कोटक महिंद्रा बँकेला 6 महिन्यानंतर RBI चा दिलासा; आता क्रेटीड कार्ड जारी करता येणार
कोटक महिंद्रा बँकेला 6 महिन्यानंतर RBI चा दिलासा; आता क्रेटीड कार्ड जारी करता येणार
मी उद्या अजित पवारांची भेट घेणार, आका अन् आकाचा मुलगा म्हणत पुन्हा इशारा, बाहेर काढला घोटाळा
मी उद्या अजित पवारांची भेट घेणार, आका अन् आकाचा मुलगा म्हणत पुन्हा इशारा, बाहेर काढला घोटाळा
काँग्रेस अध्यक्षपदासाठी 4 जण रेसमध्ये, देशमुख अन् पाटलांमध्ये चूरस; पण, सरप्राईज देणारी दोन नावं उघड
काँग्रेस अध्यक्षपदासाठी 4 जण रेसमध्ये, देशमुख अन् पाटलांमध्ये चूरस; पण, सरप्राईज देणारी दोन नावं उघड
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajan Salvi Resigned Shivsena: मातोश्रीशी इमान राखलेल्या निष्ठावंताचा रामराम, राजन साळवींचा राजीनामाABP Majha Headlines : 05 PM : 12 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Superfast News : राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 12 Feb 2025ABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 02 PM 12 February 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Champions Trophy : सगळे फॉर्ममध्ये तरी गौतम गंभीर टेन्शनमध्ये, चॅम्पियन्स ट्रॉफीआधी टीम इंडियाची दुखरी बाजू आली समोर!
सगळे फॉर्ममध्ये तरी गौतम गंभीर टेन्शनमध्ये, चॅम्पियन्स ट्रॉफीआधी टीम इंडियाची दुखरी बाजू आली समोर!
कोटक महिंद्रा बँकेला 6 महिन्यानंतर RBI चा दिलासा; आता क्रेटीड कार्ड जारी करता येणार
कोटक महिंद्रा बँकेला 6 महिन्यानंतर RBI चा दिलासा; आता क्रेटीड कार्ड जारी करता येणार
मी उद्या अजित पवारांची भेट घेणार, आका अन् आकाचा मुलगा म्हणत पुन्हा इशारा, बाहेर काढला घोटाळा
मी उद्या अजित पवारांची भेट घेणार, आका अन् आकाचा मुलगा म्हणत पुन्हा इशारा, बाहेर काढला घोटाळा
काँग्रेस अध्यक्षपदासाठी 4 जण रेसमध्ये, देशमुख अन् पाटलांमध्ये चूरस; पण, सरप्राईज देणारी दोन नावं उघड
काँग्रेस अध्यक्षपदासाठी 4 जण रेसमध्ये, देशमुख अन् पाटलांमध्ये चूरस; पण, सरप्राईज देणारी दोन नावं उघड
Amravati News : मोर्शीचे तहसीलदार राहुल पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई; खासदार अनिल बोंडेंच्या तक्रारीवरुन कारवाईचा बडगा 
तहसीलदार राहुल पाटील यांच्यावर निलंबनाची कारवाई; खासदार अनिल बोंडेंच्या तक्रारीवरुन कारवाईचा बडगा 
धक्कादायक! पुण्यातील गोळीबार प्रकरणाला नवं वळण; चुलत भावानेच रचला कट, दिली हत्येची सुपारी
धक्कादायक! पुण्यातील गोळीबार प्रकरणाला नवं वळण; चुलत भावानेच रचला कट, दिली हत्येची सुपारी
Video: राहुल सोलापूरकरांच्या दोन्ही व्हिडिओत आत्तापर्यंत गुन्ह्याचा प्रकार दिसून येत नाही; अमितेशकुमार यांनी सांगितलं पुढं काय?
Video: राहुल सोलापूरकरांच्या दोन्ही व्हिडिओत आत्तापर्यंत गुन्ह्याचा प्रकार दिसून येत नाही; अमितेशकुमार यांनी सांगितलं पुढं काय?
Samay Raina : India's Got Latent फेम समय रैनाचे इन्स्टाग्रामवर 60 लाख फॉलोअर्स, पण एकाच व्यक्तीला करतो फॉलो, 'ती' नेमकी कोण?
India's Got Latent फेम समय रैनाचे इन्स्टाग्रामवर 60 लाख फॉलोअर्स, पण एकाच व्यक्तीला करतो फॉलो, 'ती' नेमकी कोण?
Embed widget