Basmati Rice: बासमती तांदळाबाबत सरकारचा मोठा निर्णय, महागाईपासून मिळणार दिलासा
आगामी काळात तांदळाच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. या स्थितीत सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. सरकारनं तांदळाच्या निर्यात मूल्यात घट करण्याचा निर्णय घेतला आहे.
Basmati Rice Price : जगात तांदूळ आणि इतर खाद्यपदार्थांच्या किंमती वाढल्या आहेत. आगामी काळात त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या स्थितीत सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. सरकारनं तांदळाच्या निर्यात मूल्यात घट करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारनं तांदळाचे मूल्य प्रतिटन 900 डॉलरने कमी केलं आहे. सध्या निर्यात मूल्य 1 हजार 200 डॉलर प्रति टन ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. अशा स्थितीत जागतिक पातळीवर बासमती तांदळाच्या किमतीत वाढ झाल्याने दिलासा मिळणार आहे.
अलीकडेच, पाकिस्तानने बासमती तांदळाची किमान निर्यात किंमत 1,050 डॉलर प्रति टन केली होती. अशा स्थितीत निर्यातदारांनी सांगितले की, जागतिक बाजारपेठेत पाकिस्तान भारताच्या वाट्याला खीळ घालू शकतो. दरम्यान, सरकारने किमान निर्यात मूल्यात कपात केली आहे. ऑल इंडिया राईस एक्सपोर्टर्स असोसिएशन (AIREA) राइसने आपल्या सदस्यांना बासमती तांदूळ खरेदी आणि इन्व्हेंटरी होल्डिंगमध्ये अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. पुढील आदेशापर्यंत एमईपी 1,200 डॉलर प्रति टन राखण्याचा सरकारचा निर्णय आहे. बासमती तांदूळ निर्यात करण्याच्या क्षमतेवर लक्षणीय परिणाम होणार असल्याचे सांगितले.
25 सप्टेंबर रोजी निर्यातदारांसोबत समितीची बैठक झाली. यामध्ये केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल उपस्थित होते. अशा परिस्थितीत, AIREA चे माजी अध्यक्ष विजय सेटिया यांच्या मते, निर्यातदारांना अपेक्षा होती की बासमतीसाठी MEP 850 ते 900 डॉलर प्रति टनापर्यंत कमी होईल.
बासमती तांदळाच्या नावानं गैर-बासमती पांढर्या तांदळाची बेकायदेशीर निर्यात झाल्याची प्रकरणे समोर आल्याची माहिती सरकारमधील काही लोकांनी दिली आहे. देशांतर्गत बाजारपेठेतील भाव कमी करण्यासाठी सरकारने 20 जुलैपासून या श्रेणीतील तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. अशी कोणतीही शंका दूर करण्यासाठी आणि अवैध निर्यात रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. म्हणूनच प्रति टन 1,200 डॉलरच्या खाली असलेल्या बासमती तांदळाच्या निर्यातीला परवानगी न देण्याचा आदेश पारित करण्यात आला.