गुगलला मोठा धक्का! कोर्टानं ठोठावला 70 कोटी डॉलरचा दंड, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?
जगातील सर्वात मोठी टेक कंपनी गुगलला (Google) आणखी एक मोठा धक्का बसला आहे. एका अमेरिकन कोर्टाने कंपनीला सुमारे 700 दशलक्ष डॉलरचा दंड ठोठावला आहे.
Google Lost Another Case : जगातील सर्वात मोठी टेक कंपनी गुगलला (Google) आणखी एक मोठा धक्का बसला आहे. एका अमेरिकन कोर्टाने कंपनीला सुमारे 700 दशलक्ष डॉलरचा दंड ठोठावला आहे. यापैकी 630 दशलक्ष डॉलर 100 दशलक्ष लोकांमध्ये वितरित केले जाणार आहेत. तर 70 दशलक्ष डॉलर निधीमध्ये जमा केले जातील. कंपनीवर अँड्रॉइड प्ले स्टोअरचा गैरवापर करून वापरकर्त्यांकडून जास्त पैसे वसूल केल्याचा आरोप करण्यात आला होता.
जास्त पैसे वसूल केल्याचा आरोप
अल्फाबेटच्या मालकीच्या Google Inc. वर ग्राहकांकडून जास्त शुल्क आकारल्याचा आरोप होता. अँड्रॉईड प्ले स्टोअरवर अॅपमधील खरेदी आणि इतर निर्बंध लादून कंपनी हे पैसे गोळा करत होती. मात्र, गुगलने असे कोणतेही अन्यायकारक माध्यम वापरल्याचा इन्कार केला आहे. पण, तिने लोकांना दंड भरण्याचे मान्य केले. तसेच प्ले स्टोअरवर चांगली सुविधा देण्याचे मान्य केले आहे.
50 राज्यांतील 10 कोटी लोकांमध्ये पैसे वितरित केले जाणार
वॉशिंग्टन पोस्टनं दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयाने कंपनीला 700 दशलक्ष डॉलर भरण्यास सांगितले आहे. यापैकी, 630 दशलक्ष डॉलर अमेरिकेच्या 50 राज्यांमध्ये पसरलेल्या 10 कोटी लोकांमध्ये वितरित केले जातील. याशिवाय डीसी, पोर्तो रिको आणि यूएस व्हर्जिन आयलंडमध्येही पैसे दिले जातील. सप्टेंबरमध्येच हा करार झाला होता. पण, ही बातमी नुकतीच समोर आली आहे. सध्या हा तोडगा न्यायाधीशांच्या अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.
कोणत्याही प्रकारची कागदपत्रे देण्याची गरज नाही
अहवालात दिलेल्या माहितीनुसार, एकूण 10 कोटी वापरकर्त्यांपैकी 7 कोटी लोकांना गुगलकडून पैसे घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची कागदपत्रे करण्याची गरज भासणार नाही. त्यांना आपोआप नुकसान भरपाईची रक्कम मिळेल. 16 ऑगस्ट 2016 ते 30 सप्टेंबर 2023 दरम्यान ज्या लोकांनी हे अॅप्स खरेदी केले आहेत किंवा प्ले स्टोअरवरून कोणतेही अॅप खरेदी केले आहे त्यांना नुकसानभरपाई दिली जाणार आहे.
गुगलवर स्पर्धा संपवल्याचा आरोप
गुगलचे अॅप व्यवसाय स्पर्धेच्या विरोधात असल्याचे न्यायालयाने मान्य केले आहे. मात्र, गुगलने अमेरिकन ग्राहकांसाठी चॉइस बिलिंग सुरु केल्याचे म्हटले आहे. आम्ही ग्राहकांना हे अॅप्स गेम आणि इतर प्लॅटफॉर्मवर खरेदी करण्याचा पर्याय दिला आहे. गुगलवर डेव्हलपरला प्ले स्टोअर वापरण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे.
महत्त्वाच्या बातम्या: