Gold Silver Rate : सोन्या-चांदीच्या किंमती वधारल्या, जाणून घ्या आजचे दर
Gold Silver Price : सोन्याच्या किंमती कमी होताना सध्याचा काळ हा त्यातील गुंतवणुकीसाठी योग्य मानला जातोय. येत्या काळात सोन्याच्या किंमती परत वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केलीय.
![Gold Silver Rate : सोन्या-चांदीच्या किंमती वधारल्या, जाणून घ्या आजचे दर Gold Silver Price Today MCX Mumbai Pune gold hike by 60 rs and Silver by 600 on 4th july 2021 Gold Silver Rate : सोन्या-चांदीच्या किंमती वधारल्या, जाणून घ्या आजचे दर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/28/f12850389c60a73386b8a2a0af448eab_original.gif?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Gold Silver Price : शनिवारी संध्याकाळी बाजार बंद होताना सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाल्याचं दिसून आलंय. सोन्याच्या किंमतीत 60 रुपयांची किरकोळ वाढ झाली आहे. मुंबई आणि पुण्यात आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 47,300 रुपये इतका आहे तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 46,300 रुपये इतका आहे. तर चांदीच्या भावात 700 रुपयांची वाढ झाली असून एक किलो चांदीसाठी आता 69,200 रुपये मोजावे लागणार आहेत.
सोन्याच्या तुलनेत चांदीच्या भावात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. रविवारीही चांदीच्या भावात 700 रुपयांची वाढ होऊन ती एक किलोसाठी 69,200 रुपये इतकी झाली.
सध्या सोन्याच्या किंमती आवाक्यातील असून त्यामध्ये गुंतवणूक करण्याचा हाच योग्य काळ असल्याचं मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. येत्या काळात सोन्याच्या किंमती पुन्हा वाढण्याची शक्यता आहे असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्यामधील गुंतवणूक कमी झाली आहे, तसेच डॉलरच्या किंमतीच्या बळकटीकरणाचा परिणाम सोन्याच्या मागणीवर नकारात्मक झाला असून त्यामुळे सोन्याच्या किंमतीत सातत्याने घट होत आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये सोन्याच्या भावात घसरण झाल्याचं पहायला मिळतंय. पण येत्या काळात ही किंमत वाढण्याची शक्यता आहे असा अंदाज व्यक्त केला जातोय.
मुंबईतील सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही प्रभाव टाकतात. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडून मुंबईतील सोन्याचा दर ठरवला जातोय. त्यामध्ये स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो.
कोरोनाच्या प्रादुर्भावाचा फटका सोन्याच्या किंमतीला बसल्याचं दिसत आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या भावाने प्रती 10 ग्रॅमसाठी 56 हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यानंतर सोन्याच्या भावामध्ये आता जवळपास दहा हजार रुपयांची घसरण झाल्याची पहायला मिळतंय.
महत्वाच्या बातम्या :
- पदासाठी चळवळ करणं कोणाच्याच मनात येऊ नये; संभाजीराजेंच्या मुख्यमंत्री पदाच्या वक्तव्यावर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया
- जळगावात राष्ट्रवादी पाठोपाठ शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर; आमदाराचे स्वपक्षीय मंत्र्यावरच गंभीर आरोप
- 'MPSC मायाजाल' म्हणत मुख्य परीक्षा पास तरुणाची पुण्यात आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लिहिलं धक्कादायक कारण
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)