एक्स्प्लोर

Gold Rate Today: 48 तासांत सोन्याच्या भावात 8000 रुपयांची घसरण, एका बातमीने सर्व वातावरण चेंज झालं, 10 ग्रॅमचा भाव काय?

Gold Rate Today: रविवारी साधारण 4000 रुपयांनी घसरलेल्या सोन्याचा भाव आज सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा 4000 रूपयांनी घसरलाय. सोन्याच्या दरात कमालीचा चढउतार सुरु आहे.

 Gold Rate Today: भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबल्यानंतर सोन्याच्या दरात मोठे चढउतार दिसत आहेत.  गेल्या 48 तासांत सोन्याचा भाव तब्बल 8000 रुपयांनी घसरला आहे. भारत पकिस्तान युद्धानंतर 4000 रुपयांनी घसरलेले सोने सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा 4000 रुपयांनी खाली आले.  रविवारी(11 मे)  96 हजार 710 रुपयांवर आलेल्या सोन्याचा भाव आता आणखी 4 हजार रुपयांनी घसरलाय. आता प्रति 10 ग्रॅम सोन्याचा भाव 92 हजार 910 रुपयांवर आला आहे. (Gold Rate)

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अमेरिका चीनच्या टॅरीफ कराच्या चर्चेनंतर सोन्याच्या किमतींवर परिणाम होत असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, सोन्याच्या भावाने गेल्या आठवड्यात लाखांच्या घरात मुसंडी मारल्यामुळे ग्राहकांमध्ये सोने खरेदीबाबत साशंकता दिसून आली.  गेल्या दोन दिवसांचे उतरते भाव पाहता अनेकजण पुन्हा सोने खरेदीचा विचार करू लागले आहेत.

सोन्याचा आजचा भाव किती (What is the price of gold today)?

इंडियन बुलियन ज्वेलर असोसिएशनच्या आजच्या आकडेवारीनुसार, 12 मे रोजी, मुंबई, पुण्याच्या सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याची किंमत 92 हजार 710 एवढी झालीय. तर 22 कॅरेट सोन्याला प्रति 10 ग्रॅम 85,287 रुपयांचा भाव सुरु आहे.  गेल्या आठवड्यात 1 लाख 500 रुपये असणाऱ्या सोन्याचा भाव रविवारी 96,710 रुपयांवर आला. तर सोमवारी तो आणखी 4000 रुपयांनी घसरला असून प्रति 10 ग्रॅम सोन्यामागे 92 910- 93010 रुपये भाव झाला आहे. दरम्यान, सोन्याच्या भावात काहीसा चढउतार सुरु असल्याने अनेकजण सोनेखरेदीबाबत वेट ॲन्ड वॉचच्या भूमिकेत असल्याचं दिसत आहे.

सोन्याच्या भावात (Gold Price) सलग दुसऱ्या दिवशी घसरण कशाने?

अमेरिकेच्या टॅरिफ धोरणानंतर संपूर्ण आंतरराष्ट्रीय  बाजारपेठेत खळबळ उडाली. जगभरातील शेअरमार्केट गडगडल्यानंतर सोन्याच्या भावाने आतापर्यंतचा सर्वाधिक भाव गाठला. देशांतर्गत सोन्याच्या किमतीही वाढल्या. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी संघर्षाला सुरुवात झाली.

  • भारत-पाकिस्तान संघर्ष आणि बँक ऑफ इंग्लंडच्या चलनविषयक धोरण निर्णयांमुळे गेल्या आठवड्यात दोन्ही धातूंच्या किमतीत लक्षणीय चढ-उतार दिसून आले. भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरमुळे शेजारील देशांमधील तणाव वाढला, ज्यामुळे मौल्यवान धातूंमध्ये सुरक्षित गुंतवणूक वाढली. 
  • एकीकडे भारत पाकिस्तान तणाव परिस्थिती निवळण्याची स्थिती असतानाच अमेरिकेने चीनमधील वस्तूंवरील आयात शुल्क 145 टक्क्यांवरून कमी करून  30 टक्क्यांपर्यंत केले आहे. हे बदल 90 दिवसांसाठी करण्यात आले असून चीननेही अमेरिकन वस्तूंवरील शुल्क 125 टक्क्यांवरून 10 टक्क्यांपर्यंत 90 दिवसांसाठी कमी केले आहेत. या निर्णयाचा परिणामही आजच्या सोन्याच्या दरघसरणीत झाल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा:

दिलासादायक! 48 तासात सोन्याच्या दरात 2 हजार रुपयांची घसरण, सध्या सोन्याचा दर काय?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग!एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Video: महिलेचा हिजाब काढला, नितीश कुमारांच्या व्हिडिओने नवा वाद; विरोधकांचा संताप, काँग्रेसने मागितला राजीनामा
Embed widget