Gold Rate Today : दिलासादायक! सोन्या-चांदीच्या दरात 200 रूपयांनी घसरण; वाचा तुमच्या शहरातील आजचे दर
Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.30 टक्क्यांनी कमी होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 54,220 रूपयांवर आला आहे.
Gold Rate Today : जागतिक बाजारातील चलनवाढीची आकडेवारी आणि फेडरल रिझर्व्हच्या धोरणात्मक निर्णयापूर्वी गुंतवणूकदारांनी सोने-चांदी खरेदी करणे टाळले होते. मात्र, आता सोन्या-चांदीच्या दरात (Gold-Silver Rate) घसरण सुरु झाली आहे. कालच्या तुलनेत आज सोन्याचे दर 200 रूपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांना सोने खरेदीसाठी थोडासा दिलासा मिळाला आहे. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.30 टक्क्यांनी कमी होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 54,220 रूपयांवर आला आहे. तर, एक किलो चांदीचा दर 68,030 रुपये आहे.
तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे दर :
मुंबईतील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 54,220
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 49,702
1 किलो चांदीचा दर - 68,030
पुण्यातील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 54,220
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 49,702
1 किलो चांदीचा दर - 68,030
नाशिकमधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 54,220
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 49,702
1 किलो चांदीचा दर -68,030
नागपूरमधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 54,210
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 49,693
1 किलो चांदीचा दर - 68,030
दिल्लीमधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 54,120
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम - 49,610
1 किलो चांदीचा दर - 67,910
कोलकत्तामधील सोन्याचे दर
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 54,160
22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम- 49,647
1 किलो चांदीचा दर - 67,900
जागतिक बाजारपेठेतील दर :
स्पॉट गोल्ड 0302 GMT नुसार 0.3% वाढून $1,785.78 प्रति औंस झाले. US सोने फ्युचर्स 0.3% वाढून $1,796.50 वर होते. स्पॉट सिल्व्हर 0.6% वाढून $23.44 वर, प्लॅटिनम 0.4% वाढून $1,005.88 वर आणि पॅलेडियम 0.1% वाढून $1,889.50 वर पोहोचले.
तुमच्या शहराचे दर तपासा (Check Gold Rate In Your City) :
तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिए शनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल.
महत्त्वाच्या बातम्या :
Share Market Opening Bell: आयटी सेक्टरमध्ये खरेदीचा जोर, शेअर बाजारात तेजीसह सुरुवात, पण...