एक्स्प्लोर

Gold Price Hike : रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर सोन्याच्या दरात मोठी उसळी, जाणून घ्या

रशियाने युक्रेनवर (Russia-ukarine) केलेल्या हल्ल्याच्या वृत्तामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी (Gold Price Hike) पाहायला मिळत आहे.

Gold Prices At Record High : रशियाने युक्रेनवर (Russia-ukarine) केलेल्या हल्ल्याच्या वृत्तामुळे सोन्याच्या दरात मोठी उसळी (Gold Price Hike) पाहायला मिळत आहे. जाणून घ्या सविस्तर

सोने प्रति 10 ग्रॅम 60,000 रुपयांपर्यंत भाव वाढू शकतात
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव प्रति औंस 1935 डॉलरच्या पुढे गेला आहे. त्यामुळे भारतीय बाजारपेठांमध्ये (MCX) वर सोन्याच्या किमती 1400 रुपये प्रति ग्रॅमने वाढल्या असून सोन्याचा भाव 51,750 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे गेला आहे. किंबहुना, जागतिक तणावामुळे सर्वच वस्तूंच्या किमतीत वाढ होताना दिसत आहे.कच्च्या तेलाने प्रति बॅरल 100 डॉलरचा टप्पा ओलांडला तर त्यासोबतच सोन्याच्या किंमतीही भडकल्या आहेत. रशिया आणि युक्रेनमधील तणाव वाढल्यास सोन्याच्या दरात आणखी वाढ होईल,असे सांगण्यात येत आहे. तज्ज्ञांच्या मतानुसार, सोने लवकरच 60,000 रुपये प्रति 10 ग्रॅमची पातळी गाठू शकते. 

सोने महाग का होत आहे?
जगभरात आधीच  महागाई वाढली आहे आणि आता कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्यामुळे महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर विविध देशांच्या केंद्रीय बँका महागाई रोखण्यासाठी व्याजदर वाढवू शकतात.यानंतर आरबीआयकडूनही (RBI) व्याजदर वाढवण्याचे संकेत मिळत आहेत. अशा परिस्थितीत शेअर बाजारात घसरण दिसू शकते, त्यानंतर गुंतवणूकदार आपली गुंतवणूक वाचवण्यासाठी सोन्यात गुंतवणूक करू शकतात.त्यामुळे सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे.

 रशियाने युक्रेनच्या डोन्बास प्रांतावरच हल्ला का केला?

युक्रेनविरोधात लष्करी कारवाई करत असल्याची घोषणा रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांनी केल्यानंतर रशियन फौजांनी युक्रेनमधील डोन्बास प्रांतावर हल्ला केला आहे. युक्रेनची राजधानी कीवमध्ये ही स्फोटाचे मोठे आवाज ऐकू आल्याचे वृत्त आहे. रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांनी युक्रेनविरोधात लष्करी कारवाईची घोषणा केली. त्यानंतर रशियन फौजांनी डोन्बासकडे कूच केली. युक्रेन पूर्वमधील डोनेस्तक (Donetsk) आणि लुहान्स्क (Luhansk) हे प्रांत रशियाने स्वतंत्र देश म्हणून जाहीर केले आहेत. या दोन्ही भागांना डोन्बास असे म्हणतात. डोन्बासमध्ये रशियाचा पाठिंबा असलेल्या फुटीरतावाद्यांचे वर्चस्व आहे. वर्ष 2014 पासून हा भूभाग युक्रेन सरकारच्या नियंत्रणाबाहेर असून त्यांनी स्वत: ला स्वतंत्र प्रजासत्ताक घोषित केले आहे. या भूभागाला रशिया आणि बेलारूसने मान्यता दिली आहे. डोन्बासमध्ये सुरू असलेल्या संघर्षात आतापर्यंत 15000 लोकांचा मृत्यू झाला असल्याचा युक्रेन सरकारने दावा केला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

 

महत्त्वाच्या बातम्या

India America Trade Deal: भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ

व्हिडीओ

Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत कोल्हापूर ते मुंबई एकत्र प्रवास!
तिकडं शरद पवारांचे खासदार उद्याच दिल्लीत पीएम मोदींची भेट घेणार असतानाच इकडं आजच जयंत पाटलांचा सीएम फडणवीस आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसोबत कोल्हापूर ते मुंबई एकत्र प्रवास!
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
मी आता रस्ता पाहिला, सगळीकडे माती, काळजी घ्या नाहीतर...; मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी केल्यानंतर राज ठाकरे अधिकाऱ्याला काय काय म्हणाले?
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
पुण्यात SIR फॉर्ममध्ये चूक म्हणत ज्येष्ठ नागरिकाला गंडा; सायबर चोरट्यांनी 4 लाख 43 हजार रुपये लुबाडले
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
'काॅकरोच म्हणणाऱ्यांच्या हातून डिग्री घ्यायची का?' सरन्यायाधीश सूर्यकांत यांना दीक्षांत समारंभाचे आमंत्रण दिल्याने विद्यार्थ्यांचा संताप, कोणत्या विद्यापीठात घडला प्रकार?
Raj Thackeray On Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
मुंबई-गोवा महामार्ग का रखडला?, राज ठाकरेंनी फोन करताच नितीन गडकरींनी सांगितलं नेमंक कारण
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
Rahul Gandhi: नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
नोटबंदी आणि चुकीच्या जीएसटीने आमची मॅन्युफॅक्चरिंग व्यवस्था संपवली, हजारात फक्त 12 तरुणांना कायमची नोकरी; 'छात्रों की गूंज'मध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
तामिळनाडूच्या 21 खासदारांचा मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला कडाडून विरोध! सीएम विजय यांनी बोलावलेल्या बैठकीला DMK आणि AIADMK खासदारांनी पाठ फिरवली
Embed widget